Posts

Showing posts from October 4, 2020

क्रांतीवीर

Image
 क्रांति वीर स्वप्न क्रांती वीरांचे  मुक्त  स्वातंत्र्य  भारताचे  सांडले रक्त त्यांनी  पांग फेडले धरणीचे....  बेजार केलं फिरंग्यानां  जहाल मवाळ वीर  मार्ग आपले धरून  सोडले स्वतंत्राचे तिर ...  पूर्ण केलं स्वप्न  दिलं लोकशाही देणं  मुक्त सर्वांचं वावरणं  सारे त्यांचेच ऋण....  देऊ मान  वंदना  सहन केल्या यातना  विसरू नका त्यांना  जातीपाती का बांधतां त्यांना ...  विव्हळत असतील आत्मे  वरून सारं पाहतांना  बल सागर भारत  असं वाहत जातांना...  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©®  

वारी माझी...

Image
वारी माझी. विठ्ठल मज अंतरी  नाम मुखी सदा  तीच माझी वारी  सोबत सदा सर्वदा...  देव देव्हाऱ्यात पूजा  रोजच वारीची मजा  खात्री कर्माने पावशील   येशील ठोकावत दरवाजा....  दिन दुखींना मदत  हिच करतो  पूजा   नसे  कुठं गाजावाजा  वेडा भक्त  तुझा....  रान हिरवं करुनी  करतो रोजच अन्नपूजा  घडवला सृष्टी संग  तूच माझा राजा....  सदोदित सोबतीला आहेस  राबतांना आधार तुझा  कष्ट पडतात रोज  शक्ती स्तोत्र तुझा....  धावा नित्याच्याच म्हणुनी  केलंस शेतकरी राजा  भेटतोस धरणी पंढरीत  धान्य  पिकवण्यात मजा....  जीवाला सुख शांती  समाधान देतोस तूच  तुझ्यात मी माझ्यात तूच  वारी माझी हिच....  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जळगाव  ©®

🚩काळ कलियुगी ✍️

Image
  काळ कलियुगी   लबाडांची येथे चांदी  खर्यांची आहे मंदी  चढली वाईट धुंदी  विकृत खोटी लफ़ंगी....  भ्रष्ट खुप दुनियामंदी  लुबाडून महाल बांधी  बहुत झालीत पाखण्डी  घरात लपवता हंडी...  जमवता लुटून गुंडी  खाता सोन्याचांदी भांडी  भरला  पापींचा  घडा   वाचला जातो पाढा....  जगजाहीर होतो लफडा  महालावर पडतो हातोडा  हरामी होतो वेडा  निपजता  लंगडा पांगडा....  भोगता सात पिढ्या पडत्तात बांधलेल्या माङया  भोगभोगता येथेच गड्या  उडतात रस्त्यावर चिंधड्या ....  काळ कलियुगी वाटतो  सत्य रस्त्यावर झटतो  चांगला येथे बाटतो  खोटारडा लोकात वावरतो....   क्षणिक सारं त्रिखंडी  खर्यांचीच उरते नांदी   शेवटी तेथेच  सुख शांती  लक्ष्मी सरस्वतीं नांदी....  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव    ©®