Posts

Showing posts from August 24, 2025

भाद्रपद ✍️

Image
 भाद्रपद  भाद्रपद श्रावण नंन्तर येणारा मराठी महिना . श्रावण महिना हा सृष्टी निर्माण करणाऱ्या पूर्वज यांचा महिना असं म्हटलं तर वावगं ठरू नये. श्रुष्टी निर्मिती करणारे देव यांच्या पूजनाचा महिना. लागता भाद्रपद सुरवात गणेशाय नमः करतं गणपती श्री गणेशाचं यांचं आगमन या महिन्यात होतं. याच महिन्यात सृष्टी निर्मिती करणारे देवी देव महादेव यांची अर्धांगिनी माता पार्वती यांनी आपला पहिलं बाळ गणेश रूपाने जन्मला घातलं. गणपती जन्म कथा आजपर्यंत आपण अनेक वाचल्या लिहल्या पहिल्या आयकल्या असतील पण माझ्या मनातील गणपती जन्म कथा मनात आहे ती कागदावर यायची बाकी आहे. मी जी कथा लिहणार आहे. त्यातून कदाचित सृष्टी निर्माण कार्याचं सूत्र कदाचित संशोधक यांना मिळून जाईल माझ्या लिहियचं बाकी असलेल्या पुस्तकातून असो. चला तर आराध्य दैवत "गणपती" यांच्या आगमन सोहळ्या नंन्तर. आपणास ज्यांनी सृष्टी दाखवली त्यांची आठवण काढण्यासाठी श्राद्ध पक्ष येतो. आपल्या पूर्वज्यांची आठवण करतं आपला हा महिना संपतो असं वाटतं. या महिन्यात आपण जसं जेष्ठ महिन्यात म्हणजे "जुन महिन्यात " बीज पेरणी हंगाम सुरवात करतो तशी सुरवात. आ...

पोळा ✍️

Image
!!पोळा!! तीन दिवसाचा सण  खांद्यावर नको काही  पहिला तो खानबैली  दुसरा पोळ्यात होई. तिसरा दिवस हाही  तान्हा हा साजरा राही  मान सन्मान सर्वाचा  गाय वासरू यांचाही. मुक प्राणी करी सेवा  ऋण त्यांचं हाच ठेवा खायलाहि गोड धोड पुरणपोळी चा मेवा. आनंदी आनंद असे हिरवळ सारं भासे भाद्रपद पशुनचा  सोहळाचं सारा दिसें.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

तान्हा पोळा

Image
 तान्हा पोळा  मातीच्या बैलांची पूजा लाकडी खेळणी राजा रंग लावण्याची मजा  आनंदात बाळराजा. धान्य नैवेद्य दाखवी  खेळणं बैलांचं असे  श्रद्धा साऱ्यांचीचं राही उमटवतचं ठसे. शिंग रंगवत सारी गाय वासरू पुजन गोड करी त्यांना आज करून मना वदन. गोठ्यातील साऱ्यांच्याचं अंगावर रंगी साज  गळ्यात गुंगरू वाजे सोहळा खळ्यात आज. कुटुंब बैलांचे असे ऋण फेडतांना दिसें सर्व आनंदात करी  तान्हा पोळा मनी ठसे.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

हाडं कातडी ✍️

Image
 हाडं कातडी  सुष्म निर्गुण मधून बी जीव घेई आकार  पंचत्व तून होतसे शरीर निर्मिती सार. त्यातचं पेशींची वाढ थर लावतात फार एकजीव करतात सजीवांचा कारभार. हाडं देतात आकार  सांगाडा होतो निर्माण  त्यावर वाढे कातडी  प्राणिमात्रा मिळे मान. मिळून होई निर्मिती सारी काही परिस्थिती  पशु पक्षी प्राणी जीव  जीवन त्यावर स्थिती. कॅल्शियम निर्मि हाड कातडी त्वचा आकार जीव निर्माण होतात सजीव सृष्टी साकार.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055