Posts

Showing posts from March 30, 2025

गुढी पाडवा. ✍️

Image
 गुढी पाडवा. उत्सव थांबवून नवं पर्वास  मशागत सुरवात करण्याचा दिवस. होळी पासून सुरु होणारा सण गुढी पाडव्याला मुहूर्त साधण्या साठी सर्वांचा आटापिटा असतो. आपण अगोदर होळी सुरवात पाहु.होळी सण थंडी जाऊन तप्त ऊन पडण्यास प्रारंभ होण्याचा सुरवातीचा काळ. थंड वातावरण जाऊन. उन्हाळा सुरवात आरंभ वेळ. होळी सण निमित्त अनेक कथा दंतकथा आहेत. त्यात आपल्याला पडायचं नाही. पण सणा विषयी माहिती जरूर घेऊ. पावसाळा नंन्तर मातीतील ओलाव्यात येणारी पिकं काढणी सुरवात होण्याचा काळ होळी. पेरलेली कणसं भरून गेलेली असतात. ज्वारी ,गहु, हरभरा ई सर्व पिकं यांची कापणी सुरवात होण्याचं पर्व नंन्तर उन्हाळा लागणार असतो. म्हणून पिकं चांगली येऊन साठवण करून आनंद साजरा करण्याची वेळ. वृक्ष्यांनी पण जुणी पालवी सोडुन नवं पालवी अंगिकारली असलेला काळ. आबे व निंब  तत्सम वृक्ष यांचा मोहर बहर येऊन गोड कडु सुरवात होण्याचं पर्व. तसेच पशु पक्षी आपली आपली रानात. खोपा बनवण्याची सुरवात करून उन्हा पासून संरक्षण करण्यासाठी खोपा बनवून उन्हाळा पुढे चालून येणारा पावसाळा या मधील काळात जीव वाचवून दुसरा जीव वाढवून संगोपन करून पावसाळा टिपे पर...