रंगात रंग जीवनाचा ✍️
रंगात रंग जीवनाचा खेळ सारा रंगांचा विविध अंगी जगण्याचा ऐकोप्यात सार्यांनी राहण्याचा आनंद हाच सणाचा. जातपात धर्म विसरण्याचा रंग संदेश ऐक्याचा लहान थोर सारे संग रंग साऱ्यांचा. विविध असती रंग साऱ्यात तोचि श्रीरंग मना मनात पांडुरंग फेर धरू संग. उधळण होई रंगाची आठवण साठवण मनाची भरती येई आनंदाची कीर्ती पसरे मानवाची. विविधता साधी एकता किमया साधे रंगसैहिता भरू साऱ्यात बंधुता संदेश यातून एकता. रंग विविध रूपात सार तोच जीवनात मिसळून सारे एकमेकात देखणं दृश्य वागण्यात.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता.चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055