Posts

Showing posts from April 13, 2025

दैवत आई वडील ✍️

Image
  आई वडील दैवत. आई वडील दैवत!त्यांचं घेत व्रत! देत घरी साथ! संसारात!!1 देह दिला त्यांनी! शिक्षण संस्कार! सांगत ते सार! जीवनाचा!!2 नीती धर्म कर्म ! भरलेत वारे! सद्विचार सारे! शिक्षणात!!3 त्यांच्यातून आलो! आई गर्भ वाढ! सोसत ते कळ! निर्मितीत!!4 रक्तातुन दुध! निर्मित ते दिले! संगोपन केले ! बालपणी!!5 हागणं मुतने! सहन केलेत! आनंदी झालेत! वाढवता!!6 समज शिक्षण! सारं कष्ट त्रास! घेत स्व जीवास! मजसाठी!!7 थोडी संधी दिली! ऋण फेडण्याची!  आठवण त्यांची!साठलेली!!8 प्रथम दैवत! आई वडील हे! सांगे प्रदीप हा!मुलगाच!!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

बाप ✍️

Image
  बाप  पोटात लपवी! हृदयात साठवी! दुःख ते पचवी! हसवत!!1 कष्ट करी खुप!सोसून त्या झळा! सोसत ते कळा!स्वतः साऱ्या!!2 ऊन वारा पाणी ! घेत अंगावर! चिंब घाम फार! ओले होतं!!3 सांभाळ साऱ्यांचा! आधार घरचा! खांब ते मायेचा! वडीलचं!!4  कुटुंब रक्षक!ते जीवनभर! आणी घर वर! कष्टातून!!5 डोळ्यात काळजी! साठवे आतंच! पिकवे शेतचं! बाप माझा!!6 राबे दिनरात!कष्ट जीवनात! सत्य मार्ग वात ! स्वमनात!!7 सांगे नं ते दुःख! आम्हा देत सुख! झाले तेच राख! गेल्यावर!!8 सांभाळत सारा ! सोडला पसारा! जमा केला सारा! संम्पतीत!!9 बाप माझा देव! नीती हिच ठेव! जीवनात भाव! मुलालाच !!10 त्याच्या मुळे जीव! येतो पृथ्वी वर! करतो तो घर! संसारात!!11 ©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव.

भारतरत्न ✍️

Image
  भारतरत्न  हिरा होते बाबा! तेज त्यांचं खुप! नीती धर्म रूप! जीवनात!!1 मार्ग तो बिकट ! संघर्ष करतं! जीवन जगत! हुशारीने!!2 धडा दिला जगी! झाले तेच त्यागी ! सत्य सारं वागी ! माणसात!!3 शिक्षण करतं!लिहलं साहित्य!  वाचत ते नित्य! सदोदित!!4 अभ्यास दांडगा! कर्म धर्म सांगे! शांती मार्ग वागे! धर्म ज्ञान!!5 कायदा लिहला!सर्वोच ठिकाणी! देश अभिमानी! झाले मानी!!6 सन्मान दिलाय! हो भारतरत्न! सारं कर्तृत्वानं! साहेबांना!!7 स्वतंत्र देशात!अध्यक्ष समिती! वापरली नीती!कायदयात!!8 सांगे संविधान !अंगीकार सारा!  चौफेर दरारा!देशभर!!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

महामानवाची गौरव गाथा ✍️

Image
  महामानवाची गौरव गाथा  डॉ बाबा साहेब! परदेशी गेले! नाव कमविले! स्वदेशाचे!!1 उच्च त्यांचे ज्ञान! लिही संविधान! कायदा सन्मान! शिकवला!!2 रूढी परंपरा! काही त्या अनिष्ट! संम्पवण्या कष्ट! घेतलेत!!3 दीन दलितांचा! वाली भीमराव! सर्व देत भाव! भारतात!!4 खोललं मंदिर! रुजव समता! विश्वात बधुता! शिकवण!!5 हक्क मान स्त्रीला! त्यांनी सांगितला! कायदा तो झाला ! या देशात!!6 मिटल्या त्या जाती! जनता हि भारी ! सारी अंगिकारी ! समानता!!7 शिकेल टिकेल! संदेश रुजला! पाया तो रचीला ! शिक्षणाचा!!8 गाथा ग्रन्थ खुप! साहित्य लिहलं! ज्ञानातून दिलं! समाजाला!!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

महामानवाची गौरव गाथा ✍️

Image
  महामानवाची गौरव गाथा  गाथा होई मोठी! म्हणून कविता! त्यात त्यांच्या कथा! जन्मदिनी!1 शिक्षण दुर्देशी! राहिले विदेशी! निष्ठा भु पायाशी! कष्टातून!!2 राखेतून घेत! कर्तृत्व भरारी! वागणं करारी! कर्तृत्वान!!3 व्यथा त्या जानिल्या! लढा उभारला!  मनु तो जाळला! सर्वासाठी!!4 मंदिर उघडं! सर्वा लोका साठी!  पाणवठ्या साठी! झुंझलेत !!5 मोडत बंधन!सारी जाती पाती ! जेवण संगती! मंडपात !!6 पुस्तकं साहित्य! शिकेल टिकेल! शिक्षण भेटेल! लेकरांना!!7 क्लिष्ट रूढी प्रथा  ! मोडीत काढल्या! एकीत वाढल्या! जातीधर्म!8 सांगे प्रदीप हे! गुण साहेबांचे!  महामानवांचे! अभंगात !!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव