संस्कृती
सं स्कृ ती संस्कृती म्हणजे काय तर आपण सारे मिळून सभोवतालचा समाज लोक जीवन जगत असतांना करत असलेली चांगली सुंदर कृती जी कृती आपल्याला आणि इतरांना छान वाटते मनाला भावते जीवन जगण्याची साधी सरळ आध्यात्मिक सत्य मार्ग पद्धत ती संस्कृती. त्यात वाईट असेल तर ती वाईट संस्कृती. मग त्यात आपलं राहणं घर घराची अंतर बाह्य सजावट कशी अंगण कसं पुर्वी अंगणात सडा रांगोळी दरवाज्यावर तोरण, समोर तुळस असं राहायचं. लोकांन बरोबर वागण, चालणं, बोलण कसं या वर आपली आणि आपल्या घरच्यांची संस्कृती इतरांना समजते. आपण आणी सभोवतालचा परिसर त्यात गावाचा रस्ता कसा गावातील लोकांचे सण उत्सव कश्या पद्धतीने साजरे करतात त्या वरून गावाचा लौकिक आणी गावाची संस्कृती कळत असते. तसंच देशाचं अन राज्याचे. त्या वरून आपली संस्कृती कशी हे ठरते. तसं पाहिलं तर आपल्या देशात विविध जातीधर्माचे विविध संस्कृती जोपासणारे लोक आहेत. प्रत्येकाची संस्कृती वेगळी. जीवन जगण्याची पद्धत वेगळी. पूर्वी सारी लोक प्रत्येक जण आपली संस्कृती जोपासुन दुसऱ्यांच्या संस्कृती बद...