Posts

Showing posts from September 21, 2025

नेसले मी नऊवारी ✍️लावणी 1

 नेसले मी नऊवारी  आज तुमच्या साठी नेसली मी नऊवारी साडी माझी भरजरी येणार ना सांगा घरी  नथ माझी सोन्याची, राणी तुमच्या मनाची  तिरीप पडलीय उन्हाची, सखी मी हो तुमची  वाट पाहतेय राणी तुमची, वेणी गुंफली गजऱ्याची सुगधं सुटलाय गजऱ्याचा,फुलराणी तुझ्या भुंग्याची. मर्द भासला गडी गाली पडली खळी  बघताच झाली वेडी खुळी या ना खेळू झिम्मा फुगडी  अलगद खेळ खेळू, होईल साडी चोळामोळा ह्या गळ्यात तुम्ही हो, सोनसाखळीचा मणी अलगद पोळा. नाजुक मी अजून, पोळी नका घेऊ भाजून सारं चाललंय चोरून, येता तुम्ही दुरून म्हणून सजलीय आज, मोडली आज साडीची घडी तुमच्या साठी होतेय वेडी, नाजुक मी हो भोळी. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा. जिल्हा. जळगाव 

लावणी ✍️कविता

 लावणी  नटरंगी नार करे शुंगार घालतं पैंजण करतं वार भरत गावात ती दरबार  डोळ्यानं करते मादक वार. नाचत मुरडत तालावर हासणे खुलवत गालावर तीळ खुणावत हृदयावर  वेडावे बघून लहान थोर. गाणं म्हणतात रात्रभर  नाचते घुंगरूच्या तालावर करते घाव तीच मनावर सूर कोकीळ गाणं मुखावर. चांदण्या रात्रीत धरते ठेका तरुण मनाला देतेस झोका पाहुन मोकार मारते चौका धुंदीत आणते साऱ्याच लोका. प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

माँ वैष्णोदेवी ✍️

 माँ वैष्णोदेवी  मॉं वैष्णोदेवी वसे धरती पर्वत रांगा  देशा वरती. पावन होई भक्ती पाहुन संकट बघे येते धावून. जम्मू काश्मीर क्रिकुट रांग वसली लांब फेडते पांग. गुफा प्राचीन  मंदिर माता संक्रांत खुले प्रवेश घेता. तल्लीन भक्त होतात व्यक्त वागते सक्त राही विरक्त. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो 9922239055

स्त्रीशक्ती ✍️2

 स्त्रीशक्ती  शक्ति रूप स्त्री  दुर्गा स्वरूप कालिका रूप चंडी प्रारूप. उमा गौरी ती सरस्वती हि लक्ष्मी देवता  पत्नी देवाची. सर्वांग विद्या गुण सारिणी रौद्र व सौम्य रूप वासिनी. अष्ट दश ते भुजा धारिणी खडग चक्र आयुधे जाणी. सर्व संपन्न ती गर्भधारी कुंकूम्मार्जन दिसें संसारी. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

स्त्री शक्ति ✍️1

 स्त्रीशक्ती  कारभारी ती नराची  सर्व गुणांनी सपन्न  स्वच्छ ठेवी तीच घर सांभाळी सारं उत्पन्न. विश्वाची तीच माय उदय उत्पती सर्व लेकराची रक्षितिच सुखदाती नवं पर्व. अष्टभुजा रूप धारी भगवती सरस्वती  मांगल्य ती मूर्ती भासे भोळ्याची तीचं पार्वती. धैर्यवती क्रोधावती दृष्टानां वाटते भीती सुजणांची माऊली तु जोडते सारीचं नाती. कणाकणात वसते विद्या लक्ष्मी दिसते गर्भ नवं रुजवते   शोषिक हिच असते. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

नवदुर्गा ✍️

 नवदुर्गा  आई माय माँ माऊली वसुंधरा ती धरणी नवं निर्माण कारिणी प्रतिभा मान देईणी. स्वयंभु मां अंतर्यामी सौदंर्य रूप धारिणी शक्ति भोळ्या त्या शिवाची  चैतन्य ऊर्जा वाहिणी. स्तोत्र शक्ति नर रक्षी इतिहास देई साक्षी देव जाई शरणात  मारते वृत्ती राक्षसी. मोहिनी कामिनी ऊर्जा मदन राजाचं सर्जा  रंभा उर्वशी ते परी भागवते साऱ्या गर्जा. साज शुंगार लावंण्य रंग ढंग करी संग जाणी निर्मिती प्रसंग रूप उधळणं रंग. कर्ता करवीती देवी अस्त्र शस्र शास्र जाणी कलाकार संपन्नता गुण उजळे दीव्यांनी. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

माता सरस्वती ✍️

 माता सरस्वती   आई माता सरस्वती सदैव सोबत असे  हृदयात डोक्यात बसे लेखणीत कधी दिसें. शांत संयमी मुद्रेत चेहरा हसरा खुप कपाळी चंद्राची कोर सुंदर तुझेचं रूप. ज्ञान दान देते माता बुद्धिमत्ता तु देवता तुझ्या कृपेनें सारेच सुखी धनवंत होता. तुझा जिथं असे वास लक्ष्मी तेथे असे खास  सारीकडे दरवळ  सुखी जीव हमखास.©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

शेतकरी बैल मित्र ✍️

 शेतकरी बैल मित्र बैल पाळत होता बैल पाळता पाळता स्वतः बैल झाला असंच मला वाटतं. बैलाचा मित्र पण बैलचं ना? या माणसांच्या जगात शेतकरी बैलाला राबवत असे आणि शेती करतं असे आणि करतोय. बैल जसं मुकाट्यानं कामं करतोय करतं आलाय.थकला वृद्ध झाला नाही काम करतं खुंट्यावर तो मरतो. मालक थोडं औषध पाणी करतो. थकला की मेला. शेतकरी दुसरा घेतात अन आपलं राहाट गाडा हाकत आलाय अन येत असतो. काही शेतकरी बैल थकला तर कसायाला विकून टाकतात तसे अगदीच कमी आहेत पण विकणारे पण आहेत. कसायाच्या दावणीला नेऊन टाकतात. आज बिनकामी झाला म्हणून मारून टाका. असंच अल्प अशी दृष्ट शेतकरी करतं असत किंवा करतात. काम करतोय तोवर किंमत. काम करतांना सुद्धा आरीचा घोदा हा आहेच. काठीला मोठा खिळा असतो टोचायला अगदी रक्त निघे पर्यंत जोरात खिळा टोचतात.नाहीतर चाबकाने मारतात बिच्चारा बैल सहन करतो म्हणून सारं काही दृष्ट शेतकरी किंवा त्यांनी लावलेला सालदार किंवा रोजनदार बैलाला मारतात ठोकतात काम करून घेतात. पूर्वापार असंच चालतं आलंय अन चालतंय. बैलाने मालक साठी कितीही केलं तरी राबणं त्याच्या पाचवीला पुजलेलं. मालकाची गुलामी त्याच्या नशिबी. मालक सालदा...

नारी घे तु भरारी ✍️

 नारी घे तु भरारी  नारी घे तु उंच भरारी  आहेस तुचं हो करारी  संस्कार शिकवते भारी घराची तुच कारभारी.  संस्कृती रक्षण करती  गाजवली तुच धरती  झेप घेते आकाशावर्ती   वैमानिक उडे वरती. पहिली तुचं राज्य कर्ती  राणी संशोधक शेतीची परीक्षण बीज माती ची रक्षिती सृष्टीची नराची. शिकार ठरली मनुची बदलली भाषा धर्माची तोड आता बंधन त्याची  भीती तुला आता कोणाची. सर्व क्षेत्रात कामगिरी गाजवते तुच गं भारी सांभाळते जबाबदारी नरा पेक्षा सरस सारी. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

दिव्य शक्ति ✍️

!!दिव्य शक्ति!! युगे युगे तुझी शक्ति दिव्य गाथा  रुपाला टेकवतात सारी माथा  आई भवानी रूप स्वरूप मायेचं  साज शुंगार देखणं भाव दान देण्याचं  काली दुर्गा माता रूप क्रोध्दाचे  मान छाटी दृष्ट पापी योद्धाचे निर्माण निर्मिती कर्ती धरती  दिव्य शक्ति दिसता दृष्ट मरती  आदिमाया तुच राज्यकर्ती जीव जीवन सारे जगती नवंरात्री दिप प्रज्वलीत होती उजळती जळती अखंड जोती प्रकाश आनंद पर्व चौफेर नाचत खेळत संग धरे घेर. ©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

महालक्ष्मी ✍️

!!महालक्ष्मी!!  सोनं नाणे पैसा! देतेस समृद्धी! करते ती रुद्धी! माता लक्ष्मी!! अमाप संम्पत्ती! नसेचं आपत्ती! खुप मिळकती!तुच देते !! प्रतीक लक्ष्मीचं! रूप मोती साज! देवां वर राज ! तुझं चाले!! नको कुठं कोप! मोडु नको खोप! तुझं सारं रोप! जीव सृष्टी!! मागे धावतात! तुझ्या आई सारे! पुजन हो करे! धन लक्ष्मी!! पुण्य फल प्राप्ती! तुचं देते शक्ति! तुझी करे भक्ती! लक्ष्मी प्राप्ती!! प्रदीप लेकरू! सांभाळ त्यालाही! शांती जगालाहि! तुझ्या मुळे!! प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055