नातं माणुसकीचं ✍️
| | नातं माणुसकीचं | | रक्ताची असती नाती असते त्यात नीती मनाची ठेव श्रीमंती समाज एकरूप होती. माणसं ओळखली जाती नातं रुजावे विश्वासाचे माणसा माणसात माणुसकीचे माणुसकी धर्म कल्याणाचे. मिटावी दरी जातीची सारीच लेकरं मातीची मजा यईल जगण्याची माणुस पृथ्वीवर एकीची. गोडवा भरून त्यात मिटवु दृष्ट जात विश्व् जोडु नात्यात घेऊ हातात हात. प्रदीप पाटील ©️®️ गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव