Posts

Showing posts from February 23, 2025

राष्ट्रीय विज्ञान दिवस ✍️

Image
!! राष्ट्रीय विज्ञान दिवस!! ज्ञान एक वरदान  तंत्रचं मिळालं छान   बनवलं मानवाने  यंत्राचा वाढला मान. लागले शोध नवीन  अफाट झालीत यंत्र  विसरू लागले मंत्र  आधुनिक कलावंत. लोकं झाली स्वश्रीमंत  लढा लागला यंत्राचा  अवलंबून राहता  शीण घालतो श्रमाचा. विसरली सारी श्रम  सारे यंत्रा कार्यक्रम  वापर सुरु बेफाम  माणसं होता निष्काम. कास धरली तंत्राची  साथ मिळतेय यंत्रा  शोध नवं नाविंज्ञाचा  निर्मितीच सारं तंत्रा. अंगीकार सर्वदूर  शोध स्तोत्र महापूर  झेप आकाशी येंत्राची  सामर्थ्यांचे यंत्र सूर.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका. चोपडा  जिल्हा. जळगाव.

महादेव ✍️

Image
 !!शिव शंभु महादेव !! हर हर महादेव  शिव शंभू महादेव!! जीव आत्मा शिव  सृष्टी करता धरता  निर्मिता दुःख हरता  सांभाळ साऱ्यांचा कर्ता. घर मंदिर स्मशान  स्थान तुझंच सर्वदूर  कोरडं पडतं रान  पिंडीवर पाण्याचा पूर. मंत्र वाचवतो जीव  पावतो बाबा सदाशिव  नाम तुझंच मुखावरी  कार्य तुझंच भरीव. मंदिर तुझेच कोरीव  शिव पार्वती रूप  सुष्म तूझं स्वरूप  निर्मितीकार तु प्रारूप. सुख दुःखा मदती  देव दानव मानव  मेळा तुझाच भरता  क्रोध भस्म शव. कुंभ तुझाच भरतो  साऱ्यांना तुच पावतो  देव महादेव भावतो  एकरूप सर्वात होतो. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव  पिन. 425108

आधुनिक संत गाडगेबाबा ✍️

Image
!!संत गाडगेबाबा!! संत झालेत आधुनिक  केर काढत केरसुणीत सांगतं ज्ञान वाणीत  प्रबोधन सांगणं अगणित. सांगितले ज्ञान विकासाचे  धडे दिले स्वछतेचे  कथा कीर्तन करतं  पाश तोडत अंधश्रध्येचे. नको बुवा बाजी  लावु नका काजी  देव नाही दगडात  सांगतं सारं डेबूजी. देऊ नका बळी  लावत स्वछतेची गोडी  बुवाबाजांची लक्कर वोढी  माणसं सारी साधीभोळी. सद्विचार आचार पाळत  शिकवला लोकांना सदाचार  देव शोधला माणसात  दिला सत्य विचार.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  पिन. 425108