| | सावलीचं घरटं | | मुळ ग्रामीण भागातून गावात राहणारा तरुण त्याच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येतो स्वप्नं तर काय निराश्रित निराधार गरीब मुलांना जवळ करून त्यांना एक स्वताच घर वाटावं अशी संस्था सावली निर्मीतीली सावली याचाच अर्थ एखाद्या मोठया माणसाची उन्हात उमटलेली ती एक सावली अगदी तसंच कार्य आपल्या स्वतःच्या सावलीतून कुणाला लहान जीवांना कधी उन्हा पासून त्रास कमी होतो उष्ण उन्हाच्या बसणाऱ्या झळा त्या मोठया उभ्या असलेल्या पेक्षा लहान यास त्या वेळी उन्हाचा थोडा कमी होणारा त्रास कमी करून जातो. अगदी नकळत कुणा लहान जीवास थोडी जीवाला शांती देऊन जातो ती असते एक एक मोठया जिवा पासून मिळणारी सावली. बरं सावली ही पृथ्वीवरील प्रत्येक उंच जीवसृष्टी, वस्तू, चल अचल भ्रम्हांडातील सारे यांची पडछाया म्हणजे सावली हा झाला सावली चा अर्थ माझ्या मताने. जसं सावली सुखावून जाते कळतनकळत अगदी तसंच आपली सावली दुसऱ्या जीवास जसं काही क्षण सुखावून जाते तसंच आपण केलेलं कार्य दुसऱ्याला नकळत कधी सुखावून जातं कधी याच पद्धतीने आपलं जगणं अन वागणं असावं आपण जेथे असु तेथे आपल्याला मिळालेल्या उंची मुळे सदोदित कुठं...