Posts

Showing posts from December 6, 2020

कुठं चाललंय राष्ट् ✍️

Image
| | कुठं चाललंय राष्ट् | |      राष्ट् म्हटलं की देशाच्या जनतेला स्फूर्ती,  स्फुरण, स्वाभिमान,  आदर कर्तव्य, देशप्रेम, आईच्या मायेन प्रेम करणारी जनता आणि त्यांच्या वर तसंच प्रेम दाखवणारं सरकार... आज पाहतोय जनता काहीपण बोलते राजकारणी काहीपण एकमेकांना शिव्या देण्या शिवाय काहीच दिसतं नाही.  स्वातंत्र्य नंन्तर देशात सुरवात जवान किसान सक्षम होण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न झालेत. कृषिप्रधान देश घोषित करून कृषी वर आधारित अर्थव्यवस्था पहिल्या दोन तीन पंचवार्षिक योजनेत भरीव कार्य झालं नंन्तर हळूहळू ईतरत्र अर्थवेवस्था वळली ती नंन्तर तिकडे फिरकलीच नाही. जवान कामाचा म्हणुन ते क्षेत्र प्रगती त्या क्षेत्रात अर्थव्यवस्था नियमित तरतूद असते आहे. मग सुरु झालं शेतकरी शोषण उच्च शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरीं याचा उलटफेर सुरवात झाली. कनिष्ठ शेती व्यापार नोकरी उच्च मानली जाऊ लागली आणि मरण 60 टक्के कृषी वर आधारित जनता मरण प्राय झाली करून सोडली या राष्ट्राने असंच वाटतं.      व्यापार वाढवा  अर्थव्यवस्था बळकट व्हावी  म्हणुन व्यापारी खूष करण्याच्या नादात...

विचार मग्न मन ✍️

|  | विचार मग्न मन |  |     मन म्हटलं  की आपण हृदय छातीस हात लावतो. मग मनातून मनापासून बोलतोय असं म्हणतात. पण मन तेथे असते का?  तेथे हृदय असतं मग त्यास मन का म्हणतात? असं म्हंटल जातं तेथेच जीव असतो. मग जीवाला मन म्हटलं गेलं का?  तेही नाही मग जीव आहे तो पर्यंतच मन आहे. म्हणजेच जीवाला धडधडत असते  तेथ पर्यन्त तेच मन.  विचार तर डोकं करतं तेथे मेंदूतून  निर्माण होतात विचार. मी कालच एक लेख लिहला रिकामं मन या शीर्षक खाली. आज विचार केला तर मन कधी रिकामं होतच नाही. सतत विचारात मग्न असतं. शरीर कुठं पण असो कामात असो वा निवांत उत्साही असो वा बेचैन. मग असं का म्हटलं गेलं रिकामं मन जे कधी जीव जिवंत असे पर्यन्त चालत पळत असतं कुठं पण हिंडत फिरतं असतं त्यातचं दुसरं मन त्यास आवरत असतं सतत मग्न. प्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई म्हणतात."मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर" असं म्हणतात  कवी बाबत" जे नं देखे रवी ते देखे कवी " जेथे सूर्य किरण पोहचत नाही तेथे कवी विचार पोहचतात. जो विचार कोणी करू शकत नाही तो कल्पनातीत विचार कवी करतो... डॉक्टर, वकील,  संशोधक ई. त्...

गुरु पौर्णिमा

 | | गुरु पौर्णिमा | |       गुरुंचा गौरव करणारी...पूजन करण्याची अंनत काळा पासून सुरु असलेली परंपरा...  शिष्य गुरुचे ऋण म्हणून परतफेड दान गुरुदक्षिणा या पौर्णिमेस देत असतो. हा दिवस रामायण महाभारता पासून  ऋषीं,आचार्य,  मुनी, संत, आईवडील यांच्या प्रति आदर.. सद्भावना ठेवून साजरा करणारी परंपरा आहे. काळ बदलत गेला  प्रथम गुरु आई नंतर शैक्षणिक गुरु यांना मान सन्मान म्हणून त्यांनी शिकवलेली कला, ज्ञान जीवनासाठी मार्गदर्शक गुण गुरु देतात..जगावं  कसं हे गुरु शिकवतात. आदर्श गुरु शांती,  सद्भावना, एकता, प्रेम, आदर, संस्कृती, सारं सारं... घरं, देश सृष्टी विषयी व विज्ञान कला   कुटुंब  उदरनिर्वाह कसा करावा यात शिष्यास पारंगत  करत असतात. सत्य कर्म गुरु शिकवत असतात.        तसं पाहिले तर मानवास जन्म ते मरण या जीवनक्रमात सुरवात ते शेवट पर्यंत अनंत गुरु लाभतात... भेटत असतात. पहिली गुरु आई नंतर ,  वडील, शिक्षक, संत,जीव सृष्टी, आकाश, पृथ्वी, पाताळ, ब्रम्हांड, इतिहास भूगोल, वर्तमान या पासून तो  सतत शिकत असतो......

राजे ✍️

Image
| | राजे | |  शिवनेरी   जिजाऊ पोटी जन्मले  वीर पुत्र शहाजीस शोभलें...  रक्ताची  धार  धरुनी  शिवलिंगी संकल्प घेऊनि  स्वराज्य स्थापन झेंडा रोवुनी...  बाराबलुतेदार   सोबती मावळे  सह्यादी जोडले सगळे  जिंकुन किल्ले बांधले वेगळे...  सन्मान  स्त्री वर्गाला  नाही थारा जातीपातीला  शुरता  वीरता  संस्कार रुजविला...  न्याय  निवडा अंगिकारला  मंत्री मंडळ निवडुन  राज्यकारभार लाजवेल आजच्या लोकशाहीला...  दृष्ट  मोडुन पातशाही  हरहर महादेव मंत्र  साऱ्यात भरला ठाही  ठाही...  गुण  वर्णन राज्यांचे  ग्रन्थ अपूर्ण साऱ्यांचे  समर्पित थोडं   लिखाण  लेकराचे... प्रदिप मनोहर पाटील  मु. पोस्ट गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

गुरु

   || गुरु || कुंभार घडवतो मडकं  शिल्पकार साकारतो मूर्ती  गुरु घडवतात समाज  त्यातून पसरते कीर्ती… गुरु रूप अनेक  पहिली  आई एक  वडील शिक्षक समाज  सारे  जीवच   गुरु नेक… शिकत असतो जीवनभर  उसंत नसते कणभर  तेव्हा संचित मणभर  त्याचीच उंची काकणभर… प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव