Posts

Showing posts from August 17, 2025

आजची तरुणाई ✍️

Image
 आजची तरुणाई  आज तसं पाहिलं तर आजची तरुणाई. खुप हुशार, शांत, संयमी, चिंतनशील, होतकरू, मोबाईल, ल्यापटॉप वर सतत काम करणारी.कुठलं पण क्षेत्र असो. डॉ, वकील, इंजिनियर, सायंटिस्ट, विविध कपंनी मधील काम करणारी वर्कर असो वा. या सह. स्वतःचा उधोग करणारी. अशीच जीवन जगतांना.जीवनातील जीवन जगायचं कसं याचं कार्य क्षेत्र. आपलं आपलं क्षेत्र निवडून. आपल्या आपल्या क्षेत्रातील सतत आपल्या कार्यात मग्न.भविष्य सतत चिंता करणारी. आपल्या आनंदात जीवन जगणारी. आईवडील पालक यांचं नाव काढणारी अशीच आहे. सतत विचार मग्न कामात व्यस्त. कुठल्याही कामात सातत्या ठेवणारी. कार्य तत्पर अशीच आहे. वेळीची शिस्त पाळणारी पिढी. अशीच धावपळ करतं पण शिस्तप्रिय. कुठं थोडी खेळकर.कुठलं पण कार्य क्षेत्र निवडलं.त्या कार्यक्षेत्रात. मान शान उंचावत भरारी घेणारी तरुणाई दिसते.आज आपण बघतो. अगदी लहान लहान मुलं सुद्धा खुप हुशार आहेत.अफाट बुद्धिमत्ता क्षम अशीच आजची तरुणाई दिसते. सर्व सर्व क्षेत्रात आजची तरुणाई भरारी घेत आकाशात झेपवणारी सारी सारी क्षेत्र पादाक्रांत करणारी अशीच आहे. विशेष बाब म्हणजे मुलगा, मुलगी भेद नकरता. एकत्र वावरणारी सुवि...

काव्यनाद ✍️

Image
 काव्यनाद  नाद खुळा  झालो वेडा  काव्य सार काढी गळा. काव्य नाद  भरे मना  वाजे स्वतः तुणतुना.  शब्द जुळे मन खेळे कधी उडे दुर पळे. ग्रह तारे वाहे वारे  चक्र फिरे लिही सारे. गित गुंज चढे साज काव्यातून मनी राज. सुर निघे गित सजे मन भरे सांगे राजे. प्रेम धुंद जुळे छंद सुटे गधं मंद मंद. प्रित गाणं निघे छान मोकळं ते दिसें रान.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9822239055

काव्यनाद - सरस्वती ✍️

Image
 काव्यनाद  काव्यप्रकार - प्रनुचाराक्षरी  शीर्षक - सरस्वती विद्या लक्ष्मी सरस्वती शब्द मनी सांगे नीती. शब्द धन फुले मन डोले छान मिळे मान. लिही गित निघे गाणं जुळे सूर पेटे रान. लेखणीत वास तिचा बांधे साचा सु शब्दांचा. कीर्ती दिसें दुर देशी  तोडतच साऱ्या वेशी. बहुमान तिज मुळे चोहीकडे बोल कळे. माता छत्र असे जिथं धन धान्य पुण्य तिथं.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9922239055

मित्र शेतकऱ्याचा ✍️

Image
 मित्र शेतकऱ्याचा  दोघं करी सारं कष्ट  दमता तरी चालता माती कोरून काढता नांगर तेची ओढता. बीज पेरी पामराने पडता त्यातून दाणे मशागत सारी करी पिकता सोनेरी दाणे. रात्र पहाट करतं रान हिरवं करता  पोट साऱ्यांचं भरता  भुकेने स्वतः मरता. ओरबाडता सर्वच  कनिष्ठ झालीय शेती  सरकारी सारी निती  फुकटात भरी पोती. शेतात कुटुंब मरे  पशु पक्षी अश्रु गाळी मूक प्राणी हो शहाणी  मित्रता जोपासी भोळी.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

आला आला पोळा ✍️

Image
 आला आला पोळा  सण झालेत गोळा. श्री गणेशाय करून  मूर्ती येतात दुरून सजावट हो करून बसे प्रसाद वाटून. देवाच्या नंन्तर देवी मंडप तीच सजवी ऊन पडतं वरून संस्कृती सार रुजवी. गणपती देवी लक्ष्मी  नंन्तर पुजन व्रत श्राद्ध प्रथा परम्परा पशुनचा भाद्रपद. दसरा दिवाळी सण पर्व धन धान्य येता रास पूजा करी स्वता कुटुंब मिळून खाता. बैल अन मालकाची कमाई दिसते आता प्रकाश पर्व मनऊ मग सणाची सांगता.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

जोडी बैलाची ✍️

Image
 जोडी बैलाची मोऱ्या भुऱ्या जोडी ! हाके गाडी वेडी ! कामाची हो गोडी ! या बैलांना!!1!! शेती कसे भारी! अन्न मिळे तरी! मालक हो मारी ! हाकतांना!!2!! शेतात राबता ! जीवन चालतं! शोषण ते होतं! मालकाचं!!3!! मित्र शेतकऱ्या! चौखूर उधळ्या! गोष्टी साऱ्या खऱ्या! शेतातल्या!!4!! अन्न दाता दोघं ! खाणं होतं मग! रक्त पिता सारे! पोटभर!!5!! फास मालकाला! घास तो जगाला! बैला सारखाच! आला गेला!!6!! व्यथा खुप साऱ्या! सणाला सांगतो! अंतर मनाला! समाधान!!7!!©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

बैलपोळा ✍️

Image
!! बैलपोळा!! सण बैल पोळा ! सुंदर सोहळा! गाव होतं गोळा ! सणा साठी!!1!! गोड धोड खाणं ! सजवता छान! असतोस मान ! बैल पोळा!!2!! खिल्लारी हो जोडी ! करे काम भोळी! शेती कसे काळी ! राबतांना!!3!! मित्र असे हाच ! कष्ट पाचवीला! असे संगतीला! रानावना!!4!!  शेती माती नातं ! बीज पामरात! ये हिरवाईत ! शेतातील!!5!! जीव सारी जगी ! राब राब राबी! शांत तरी वागी!दिनरात!!6!! चौखूर उधळी ! जोडी ती खिल्लारी! करी काम भारी! बैल जोडी!!7!! प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

जैसे ज्याची कर्म. ✍️

Image
 जैसे ज्याची कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर कलियुगी सारे विसरले ही ओळ!! अरे नका कुणाचा झळ, मन ठेवा निर्मळ मनात फुलवा कमळ, सुगन्ध सार दरवड  दीन दुःख जाणा, आनंद त्यात माना  सेवा माता पित्याची, ईश्वर तेथेच जाणा. नको कुणाला मारू, नका बनूत वळू  कळ्यां नको ओरबाडू, नातं पवित्र जोडु जीवन गोड कडु, रक्त पिपासू नका बनु अभ्रू लक्तर नका वोढू, वासना सारी सांभाळू. सृष्टी उचलते भार, त्यात लावु हातभार  अन्न मिळे पोटभर, ठेवा आरोग्य निर्मळ  नको तोडू झाडं, कळ्यांची करू वाढ  दृष्टी सृष्टी सारी, देव नाम फक्त वारी.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

सृष्टी पर्व सुरवात क्र. 1

Image
 सृष्टी पर्व सुरवात  "पृथ्वी सभोवतालचं वातावरण पृथ्वी ची स्वतःची गुरुत्वाकर्शन शक्ति. त्या मध्ये असलेले सजीव चल, अचल जीव म्हणजेच जीव सृष्टी." पृथ्वी हा ग्रह आपण राहतो त्या सौर मालेतील माता. ईतर सौरमालेतील ग्रह म्हणजे पिता ग्रह. उपग्रह म्हणजे त्यांची मुलं. सौरमालेतील ग्रह तारे त्यांच्या गुरुत्वाकर्शन शक्ति मधुन संपुर्ण या सौरमंडळात. आपल्या पृथ्वी वर पृथ्वीत असलेलं मातृत्व म्हणजेच जीव जीवन. पृथ्वी गोलाकार वातावरणात पृथ्वी ग्रह पासून त्यात असलेली पंचतत्व घटक यातून. पंचतत्व घटक आपणा सर्वांना माहित आहेतच. जल, अग्नी, वायु, घर्षण, माती. पंचतत्व घटक सारीच पृथ्वीवर आहेत. त्यांना ढवळून काढण्याचं काम. सौरमाला करतं असते. त्यातील ग्रह तारे. सूर्य पासून ते लहान मोठी ग्रह, उपग्रह, आकाश तारे, सारे सारे वर असलेली या सौरमंडळातील ग्रह तारे. सारी सौरमाला चालवत असतात. आपला मार्ग आपल्यात असलेली शक्ति द्वारे मार्गक्रमण करतं असतात. शक्ति कोणती तर प्रत्येक ग्रहाची गुरुत्वकार्शन शक्ति. पृथ्वी अन त्या सभोवतालचं वातावरण परीघ. म्हणजे पृथ्वीची वातावरण कक्षा. किंवा पृथ्वी ची गुरुतवाकर्षण शक्ति असं म्हणु. ...

नारळी पौर्णिमा ✍️

Image
 नारळी पौर्णिमा सण श्रावण महिन्यातील नागपंचमी नंन्तर येणारा पहिला सण. पौर्णिमेला येणारं जीव जीवन सृष्टी मधील एक महत्वाचं पर्व. तसं पाहिलं तर मुळात श्रावण महिना हा देवाला अर्पण केलेला महिना. महादेव भोळा शंकर पार्वती यांना समर्पित असलेला महिना. या महिन्यात पृथ्वीवर जुन, जुलै मध्ये अती पाऊस पडतो. सर्वत्र चिखल गाळ साचलेला अश्या दिवसात. ऑगस्ट महिन्यात थोडं ऊन सावली श्रावणधारा अल्पश्या बरसत असतात. पूर्वी शेतकरी यांचं जुन महिन्यात पेरणी झाली की मग ती सर्व प्रकारची अगदी अनादी काळ पासून शेतकरी हा बी पेरत असे. रानात अन स्व मनात. अगदी स्त्री राज्य होतं प्राचीन काळ पासून स्त्री सुद्धा जुन महिन्यातच योग्य पेरणी करून घेत असे. शेती शोध हा स्त्री राज्यात स्रियांनी लावलाय असं. निस्पन्न झालंय. पहिली बी पेरणी लहानसा जीव मुंगी इने शेती सुरवात केली असं म्हटलं जातं. बुरशी पेरणी च्या जाती विकसित करून मुंगी बी पेरत असे. असं सांगितलं जातं. पहिली शेतकरीण मुंगी. मग माणसातील स्त्री हि पहिली शेतकरीण. हेच सत्य आहे. शेती रानात करे त्यांच बरोबर मनात सुद्धा रुजवत असे. योग्य जोडीदार निवडून स्वतः सुद्धा पेरणी करून घ...

चल गं सखी चल गं सखी

Image
 चल गं चल गं सखी, जाऊ जरा दुर जुळवु आपुले सुर, गाणं गाऊ मधुर!! येऊदे प्रेमाचा पुर , वाद्य वाजवू भरपूर गाणं गुंजुदे सुमधुर, एकरूप उमटू दे सुर नको तुटू देऊ तार, घुमू दे आवाज रानभर  सळसळ बघु पानांची, राणी तुचं गुणाची. तुझं माझं गाणं, सुनं सुनं रान विसरू आपण भान, भरू गं तनमन  एक रूप होऊ , सृष्टी गाणं गाऊ  आनंदी मन करू, प्रेम वाट आपण धरू. प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव  मो. 9922239055