Posts

Showing posts from October 5, 2025

संकट ✍️

!!संकट!! काय पाप केले! धन धान्य गेले! शेत खरडले! पावसाने!! कष्ट गेलं वाया! मुलांना शिकाया! नाही आता वह्या! शिक्षणाला!! गुन्हा तो कोणता ! कुणबीत आलो! वाटे का जन्मलो! शेतकरी !! असा कसा युग! कलीचा तो फेरा! सत्याला तो घेरा! फासा चाच!! नीच पापी हसे! दुःख पाहा कसे! नुसतं तो दिसें! बांधावर!! आणतात आव! खातात ते भाव! करे काव काव! सरकार!! कुठं लपलास! देवा तु विठ्ठला! पाव रे कष्टाला! आता तरी!! मिटव संकट! काढ आता वट! मोड हे सावट! ढग फुटी!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

कोजागिरी ✍️ क्र 3

 कोजागिरी  टिपूर चांदणं पडे  दर्शन चंद्राचं मिळे प्रकाशात चोहीकडे भरत दुधाचे घडे. स्वच्छ निर्मळ आकाश  आई ओवाळे लेकास  अबाल रुद्ध मिळून सोहळा होई झकास. नाच गाणं होई सण दुध घट्ट आटवून   काजु बदाम केसर जायफळ ते टाकून. येणार हिवाळा आता  तयारी करूया स्वतः  चंद्र पूजन करता  दुधा प्रतिमा बघता. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055