!!वेडू आण्णा गणपूर गावातील पहिले पोस्टमन!! आण्णा गणपूर गावातील पहिले पोस्टमन होतं. काळ होता इंग्रज कालीन. सुख समृद्धी ने नटलेला. हिरवाई ने दाटलेला. घोडा, गाडी, बैलगाडी चा प्रवास गावात होतं असे. सातपुडा पर्वत रांगा च्या पायथ्याशी असलेलं गाव. वेडू आण्णा यांचा जन्म सन 1911रोजी झाला. गावातील पहिले शिक्षक म्हणून रुजू झालेत. गावात शाळा फक्त मराठी शाळा. मराठी यत्ता चवथी पर्यंत शाळा असलेलं गाव. गावात माध्यमिक शाळा नाही म्हणून शिक्षण अभाव होता. तत्त काळात गावात निरोप देवाण घेवाण साधनं कुठलंच नव्हतं. लग्न समारंभ सुख दुखं वार्ता प्रवास करूनच दयावा लागायचा. प्रवास म्हटला तर पाई, किंवा, घोडे कमीच म्हणून बैलगाडी नेच प्रवास होई. गावात पोस्ट सुरु व्हावं म्हणून प्रयत्न करणारे आण्णा. आण्णा पोस्ट सुरु व्हावं म्हणून प्रयत्न करतं असतांना गावात शिकलेली माणसं कमी. म्हणून ज्याला लिहता वाचता येईल असे मोजकेच लोकं. गावात सुविधा तर आणायचीय तर पोस्टमन म्हणून काम करेल कोण. तर तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधून अर्ज करणारे आण्णा यांनाचं सांगितले की पोस्टमन म्हणून नवीन कोण माणुस येतो तुमच्या गावात तेव्हा पर्यंत तुमीच पोस्...