Posts

Showing posts from June 1, 2025

जागतिक मैत्री दिवस.

Image
 !!जागतिक मैत्री दिवस!! मैत्री हो असते! नात्यात दिसते! हृदयात बसते ! ती मित्रता!! सुख दुःख साथी! घेत हात हाती! विचार जुळती! सोबतीत!! रक्त नातं पेक्षा! श्रेष्ठ नातं आहे! घट्ट मित्र राहे   ! साथदेत!! सखा सखी नातं! मैत्रीत असते! वागण्या दिसते !  कृष्ण सखी!! मित्र मित्र नातं! कृष्ण ते सुदामा! येई जीव कामा! सुख दुःखा!! बंधु भाव असे! सोबत हो दिसें! मनास हो भासे ! संखे भाऊ!! किती वर्णु गुण! श्रेष्ठ मैत्री नातं! वाटे गणगोत ! भाऊ भाऊ!! सांगे तो म्हहती! प्रदीप हो थोडी! लिहण्या त्या गोडी! अभंगात!!©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

चित्र काव्य ✍️

Image
!!चित्र काव्य!!  चिंब पावसात सखी  दिसतेस चंद्रमुखी  हास्य खुललं गं मुखी  हळुवार चल सखी. निसर्ग सजला आज  पाहुन तुझाच साज  आपलं दिसतं राज निसर्गाचा हा आगाज. रंग प्रेमाचा चढला भाव तुझा गं कळला गधं तोच पसरला आल्हाद वारा सुटला. जोडी तुझी न माझी गं  पावसात बहरली मुखी हो खुललं हास्य आज आनंदी जाहली. गार सुटला हा वारा वर पावसाच्या धारा छत्री आपला निवारा सुंदर ह्या सांजधारा. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. ©️®️ मो. 9922239055

जागतिक पर्यावरण दिवस. ✍️

Image
!!जागतिक पर्यावरण दिन!! सृष्टी जीव स्वर्ग  वाचवा निसर्ग  वाचवेल तोच हिरवा तो वर्ग. जल अग्नी वायु शुद्ध ठेवु आता पशु पक्षी सारी काळजी हो घेता. सुष्म आणि मोठी   जीवन ते कार्य जगण्यात सारी पाळत हो धैर्य. तोडतो साखळी शेपूट वाकडी मानव दृष्टता  करते बोडकी . सोडु हो दृष्टता वाचवु संम्पदा  करू आज वादा जीव भोळा साधा. नको प्रदूषण करू हो रक्षण भोगु आता सारे आनंदी ते क्षण.©️®️ प्रदीप पाटील गणपूर.चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

जागतिक पर्यावरण दिन ✍️

Image
!!जागतिक पर्यावरण दिन!!. जगाला काळजी ! आता हो लागली! सारी नासवली! वसुंधरा!! उडवी धुराडा! घालत गराडा! गाड्यांचा हो मेळा! रस्त्यावर!!  प्रदूषण खुप! काळपट रूप! राखेचे स्वरूप! पावसाचे!! झाडं ते तोडतं! बोडकी जंगल! करतं दंगल ! रानिवणी!! नद्या नाली शुष्क ! सारी वाळू फस्त! जीव झाला स्वस्त! राही मस्त!! वाळवंट झालं ! काँक्रीट ते दिसें!  सूर्य तप्त भासे! आगगोळा!! केमिकल सारं! सोडतं पाण्यात! जीव मारण्यात! पटाईत!! सृष्टी चक्र सारे! तोडलं मानवा! पेटवे वनवा ! स्वतःहून!! आधुनिक तंत्र! मारक ते यंत्र! फिटली हो भ्रात ! मानवाची!! पृथ्वी सृष्टी जीव! वाचवा सजीव! करा वृक्ष कीव! वागण्यात!! संदेश देतोय! आलाय तो दिन! प्रदीप तो लिन! अभंगात!!©️®️ प्रदीप पाटील गणपूर चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

शेवटचा निरोप ✍️

Image
!!शेवटचा निरोप!! आम्ही जातो आता! निरोप देता का! शेवटचा हो हा! रामराम!! सुष्म आत्मा आता! गेला हो सोडुनी! रिकामं करुनी! देह आता!!  धडधड बंद! निर्जीव शरीर! ओसाड हो शीर! पार्थिवाचे!! आता सारी गोळा! भरती सोहळा! दुःखीत हो मेळा! सांगतात!! जीवनात लाथा! मेल्यावर गाथा! पिटतात माथा! गेल्यावर!! करता अंघोळ! जिवन्त तो घोळ! घालत हो माळ! शेवटची! कापतात गळा! भाऊबंद मेळा! काढून गळा! कुटूंबात!! कथा जीवनाची! व्यथा जगण्याची!  सांगु का मनाची! सर्वांचीच!! वाटेत हो काटे! ज्यांनी टाकलेत!  अश्रू का आलेत ! दाखवण्या!! मन मारे जीव! उतरतो साज! गेला सारा माज! मृत वेळी!! जाळ तोच लावी! ज्याच्यावर जीव! लाकडावर ठेव! हो पार्थिव!! प्रदीप अभंग! सांगे शेवटचा! देह हो राखेचा! अनंतात!!©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

शुभ दिवस ✍️

Image
!!शुभ दिन!!  प्रत्येक दिवस! शुभ असतोच! सूर्य अस तोच ! तेजोमय!! संपुर्ण ब्रम्हांड! फिरतं राहते ! पृथ्वी ते पाहते ! दिन रात!! सृष्टी चक्र सारं! उचलते भार!  अशुभ तो मार! नसतोच!! शुभ ते अशुभ! नसतंच काही! सारं मानव देही! कल्पनेत!! एकाचे सुख ते! दुसऱ्याचे दुख ! प्रत्येकाला मुख! वेगळीच!! अंधार उजेड ! नसे कधी मेळ! सारा जीव खेळ! दिसण्यात!!  अशुभ नसेचं! सारे काही शुभ! मिळे साऱ्या लाभ! समाधानी!! सुख दुःख सारे! असे क्षण भर! जीव तोचि सार! मन शांती !! ग्रंथ गाथा सारी! सांगे तो प्रदीप! शुभ कार्य दिप! लेखणीत !!©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055