Posts

Showing posts from October 18, 2020

विजया दशमी (क्र 1) दसरा ✍️

Image
 || विजया दशमी||  रोवुन विजयी पताका  करून कर्तृत्वाने  सोमोलंघन  पुजन शमी वृक्षाचं  करतं संस्कृती वंदन...   लुटून सोनं आपट्याचं  वाटु जन माणसात  घालु आनंदाची साद  मात करून  संकटात...   जाळुन रावणी विचार  रुजवु सर्वात सदाचार  ठेवु तलवारीला धार  झेलु  संकटांचे वार...   बळकट  मन ढाल  आनंदात धरू ताल  सुखावोत आप्तेष्ट बाल  सोडु नैराश्य चाल...    मन भरारी आसमंती  विचारांची ठेवु श्रीमंती  सोनं पावलांची घरी लक्ष्मी   सुख शांती  खरी श्रीमंती... प्रदीप पाटील  गणपूर. ता. चोपडा जि.  जळगाव   ©®  

नारी शक्ती ✍️

Image
 || नारी शक्ती ||  शक्ती रूप नारी  दृष्टांवर पडते भारी  शिकवली तिनेच दुनियादारी   करुणा मूर्ती तरी...   दिशा संदेश देत  कर्तव्य कर्तृव भुवरी  कुटुंब तीच तारी  वेदना सोसून जरी....   यातना तिलाच तरी  अग्नपरीक्षेत तीच खरी  सर्वास पुरून उरी  नराचा नारायण करी...   एकनिष्ठ परीक्षा जरी  देते हसत बावरी  वसा मानव पालनाचा  तिच्याच पडला उदरी...   घुंगट पदर घेत  लावण्य रूप अनेक  रंग मोहक दाहक  सृष्टी सारी तारक...   माजली दृष्ट राक्षस  खोचुन पदर तीच   मुंडकं तोडते हिच  देव मानव रक्षिती तीच...   -प्रदीप पाटील  गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव   ©®

मायभूमी

Image
||  माय भूमी ||  सृष्टी दाखवली जिने  पृथ्वीवर आलोय दैवाने  मातीवर चालु लागलो  इवल्या इवल्या पायाने...   नमन करतोय हाताने संस्कृती जोपासली राज्यांनी  झटले लढले मातीसाठी  प्राण दिले  क्रांतीवीरांनी... विविधतेने नटली सावरली  जातीधर्मात छान वाढली  मातृभूमी तिरंग्यात एकवटली  चंद्र ताऱ्यांवर प्रकाशली....   वीर दिले भूमातेने  रक्त घेतले शत्रूने  रक्षिली भूमी मनगटाने  पाहिले  शौर्य सूर्याने...   तेज भरले मातीत  मातीत जन्मलेल्या प्रजेत  राहताय आता मजेत  फडकतोय तिरंगा तेजात....   त्या तेजानं घायाळ  शत्रुवर करतोय मात  ऊर्जा आलीय  सुपुत्रात  भारत भूमी दिमाखात...   वर्णनास शब्द अपूर्ण  नाही आठवत लेकरास ग्रंथ  पडतील अपुरे थाबण्या सांगतो लेखणीस....   प्रदीप मनोहर पाटिल  मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव   ©®  

स्वीकारली मी कर्फ्यू

Image
|| स्वीकारली मी कर्फ्यू  || साऱ्या मानवजातीच्या कल्याणा कर्तव्य बजावण्या साठी  जीवसृष्टी जगवण्या वाचवण्या    विषाणु संसर्ग टाळण्यासाठी....   महामारी घोंगावत येतेय  रोखु आहे  तेथे झाला संसर्ग मानवास  लागूनये थांबु आहे जेथे... कोंडून घेऊ कुटूंबास  आव्वाहन  झालं  पाळू  दृष्ट कोरोना अवतरला  आहे तेथेच गाडु....  बंद करू सारं  सांभाळू आपलं घर जगण्यात आहे सार करू बंद दार....   मनापासून स्वीकारू कर्फ्यू  आज थांबलो भाऊ  उदया पळून मिळवु   महामारी लांब  ठेऊ...  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव   ©®  

एका विषाणूने शिकवलं.

Image
 विषय :- एका विषाणूने शिकवलं. जीव निर्मिती अगोदर सृष्टीपेक्षा अति प्राचीन विषाणु आहेत त्यात अंनत  प्रकार असु शकतात आता पर्यंत मानवाने बरेचं शोधुन काढलेत त्यात कोरोना नावाचा विषाणु महाभयंकर असा आता अवतरला म्हणजे पूर्वी होता पण आता त्याने मानवात प्रवेश केला तद नंन्तर त्याचा शोध लागला या अगोदर कोरोना नावाने सहा प्रकारचे विषाणु शोधले गेले होते हा कोवीड 19 हा सातवा विषाणु मानवास आढळला... अति सुष्म    डोळ्यांना नं  दिसणारा मी तर म्हणेल परोपजीवी हा शब्द का वापरला तो आपलं बस्तान निसर्गातील वन्यजीव पशु पक्षी त्यांच्या वर जगतो जसं झाडांवर ईतर वेली जगतात वाढतात त्यांना आपण परोपजीवी वेली असं म्हणतो तसंच प्राण्यांवर जगणारा म्हणुन परोपजीवी सम्बोधलं मला वाटलं तसं ....वन्यजीव हे सुष्म विषाणु जिवाणू यांचं राहण्या ठिकाणं भांडारघर त्यांच्या वास तेथे असतो असं अभ्यासक सांगतात.हे खरंय मग  जीव अस्तित्वात येण्या पूर्वी यांचं अस्तित्व कुठं असायचं हा प्रश्न पडतोय. म्हणजे कधीही नष्ट होणारा असंच सातत्याने निर्मिती होतं असते अंनत पटीत अब्जावधीत निर्मिती होतं असली पाहिजे सातत्याने मरत ...

कोरोना एक बिकट संकट.

Image
  कोरोना एक बिकट संकट. कोरोना  कोविड  19 हा विषाणु नुकताच शोधला गेला  चीन मध्ये या विषाणु ची लागणं झाली आजार आला  नंन्तर शोध लागला. लागणं कशी झाली या बाबत  सध्या अनेक तर्क आणि कथा लोकं आपले  अंदाज आणि बुद्धी वापरत आहेत. खरं काय हे कालांतराने समजेलच.पुढे येईलच सर्व .. पण तेथून सुरवात तर शेवट कधी कुठं  हे सांगणं कठीण झालंय आता... दिवसेंदिवस रुद्र रूप धारण करतोय जागतिक संकट महामारी रूप घेतलंय कोरोना रोगानं. जवळजवळ सर्व देशात शिरकाव केलाय सतत रोगी वाढतं आहेत आणि मृत्यू आकडा पण वाढतोय. मानव साठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय समस्या कशी संम्पवायची अजुन पर्यन्त औषध सुद्धा मिळुन आलं नाही  रोग निष्पन्न होऊन 3ते 4महिने झालीत. रोग नियंत्रण म्हणुन खबरदारी उपाय सर्वानी अंगिकारला स्वता ला घरात बंद करणं लॉक डाऊन. हे एकमेव हत्यार आज तरी बचावा साठी साधन. बरीच देश हाच उपाय अवलंबत आहेत. या शिवाय पर्याय उरला नाही. यात आजच हातावर पोट भरणाऱ्यांचं पोट उपाशी मरतंय. अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार सुद्धा मद्त घोषणा मोठया झाल...

उत्सव गणराया गणेशाचा

Image
||  उत्सव गणराया गणेशाचा  || ओंम गणेशाय नमः !!!  आराध्य दैवत तसंच सर्व गणेश पूजनीय भक्तांचं दैवत गणाधीश गणनायक गणपती. उत्सव येऊ घातलाय त्या निमित्त थोडं.. तसं पाहिलं तर घरगुती गणेश उत्सव पूर्वापार चालत आलेली परंपरा. इंग्रज पारतंत्र काळात लोकजागृतीसाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरवात झाली. मुळ उद्देश्य लोकजागृती समाजप्रबोधन माध्यम. पण स्वातंत्र्यानंतर त्याच स्वरूप  बदललं काळानुसार. सध्या आलेलं कोरोना महामारी संकट त्यावर उत्सव साजरा करण्यावर सावट आलं, उत्साह मनात ठेवून सरकारी आदेश पालन करून सार्वजनिक गणेश उत्सव आता थांबवण्याची, कमी करण्याची वेळ आलीय, ती आता पाळली, अंगिकारली पाहिजे आता. सार्वजनिक उत्सवातून उत्साह निर्माण होतो हे जरी खरं असलं तरी अलीकडे अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर नाचून उत्साह निर्माण होण्यासाठी उत्सव साजरा केला जातो. मुळ उद्देश्य बाजूला पडला, पडत चाललाय असंच वाटतं. काही गणेश भक्त मंडळ खुप चांगलं पण कार्य करतात पण ती थोडीच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढं उरलीत. घरगुती मूर्ती स्थापन करून त्याची पूजा, अर्चना यास प्राधान्य देण्याची योग्य वेळ चालून  आली, त...

विज्ञानाची ओळख ✍️

Image
|| विज्ञानाची ओळख || कशी सांगु ओळख  ती तर आहे सर्वांना  शोधक असतात  मुळात  नवीन दिसतं ज्यांना...  रहस्य दळलय काय  निसर्गात भूगर्भात आकाशात  उलगडा होत असतो  तेच विज्ञान शास्रात...  अणु रेणु इथे  अवाढव्य तारे आकाशात  भूमंडळात सारे त्यातुन   वेगळी निर्मिती संशोधनात... भाग विभाग ज्ञानाचे  घेऊ धडे शास्राचे  प्रगती अफाट यातुन  कल्याण त्यात मानवाचे...   अंधश्रद्धा गाडली विज्ञानाने  जीव सुखावली यंत्राने  शोध अफाट लागले  वरदान ठरले शिकण्याने..... प्रदीप मनोहर पाटिल  मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®    

नमन शूरवीरा ✍️

Image
 | नमन शूरवीरा|     ( नेताजी सुभाषचंद्र बोस  ) काळ गुलामीत फिरंग्यांचा  लढत होते वीर  ओरिसात कटक गाव  जन्मले पुत्र क्रांतीवीर...  सुपुत्र जानकीनाथ यांचा  प्रभावती पोटी जन्मले  इंग्रज बोलले रायबहाद्दर  नेताजी  क्रांतीपुरुष झाले...  गांधीजीची पदवी  देशभक्त  कांग्रेस अध्यक्षपद भूषवले  मवाळ जहाल प्रवाह  जहाल शस्र अवलंबिले....  इटलीत जाऊन मिळाले  पाठींबा घेऊन आले  आझाद हिंद स्थापिली  इंग्रजास  ताकतीने घाबरविले...  झेंडयाखाली तरूण आले  आझादी पर्व आणिले  तुम मुझे खुन दो  मै तुम्हे आझादी दूंगा बोलले ..  गांधीजींना राष्ट्रपिता म्हणाले  महान क्रांतिकारी झाले  नमन या शुर विरास  जय हिंद आसमंत निनादले...   प्रदिप मनोहर पाटिल  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव   ©®  

नवरात्रौत्सव ( क्र 1) ✍️

Image
  नवरात्रौ त्सव .... जिजाऊ, रमाई, सावित्री ,  वाढल्या, लढल्या, झगडल्या  दिशा संदेश देऊन अजरामर साऱ्या जाहल्या....  अनंत झाल्यात माता  सांगुन सार्यांनी गीता  पुत्र, पिता, भाऊ  झटल्या समाजा करता....  प्रसंगी झाशी दुर्गा  गाडुन दृष्ट सारे  यांच्याच मुळे वाहू   लागले नव वारे .....  यांचाच उत्सव जागर  झाल्यात आई माता  दिली मानवास दिशा  सोसून सारं स्वता.....   प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा जळगाव.   ©®

शिल्पकार

Image
  शिल्प कार असावं असं कर्तृत्व  पाळून सारे तत्व  जीवनात भरून सत्व  जागृत सदैव द्रातुत्व...  कल्याणकारी त्याच नेतृत्व  दिसावं त्यात देवत्व  शिल्पकार तोच जगात  शिल्पात कीर्तीत उरतं अस्तित्व ....  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा. जळगाव   ©®