Posts

Showing posts from November 1, 2020

इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय...

  इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय. भाषा  मराठी आणि बोली यात बहुतांश ठिकाणी बराच फरक आहे. महाराष्ट्रात मुळात  प्रत्यक्ष पाच ते दहा किलोमीटर वर बोली बदलते बोलण्याची पद्धत बदलते. मराठी माणसाने  आपली माय मराठी अंगिकारली  वाचन लेखन शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय सर्व कार्यालयात मराठीत लिखाण होतंय होत आलंय जळगाव ची मराठी बोली वेगळी तर पुण्या मुबंई नागपूर अन्य शहरात गावात भाषा मराठीच पण बोली  भाषा बोलण्याची पद्धत वेगवेगळी याचाच अर्थ लिहण्याची मराठी आणि बोलण्याची पद्धत  यात फरक आहे आणि सर्वदूर दिसतो.     मुळ आपला विषय आहे इंग्रजी मुळे मराठी खालावली असं. तसं पाहिलं तर कोणत्या भाषे मुळे कोणती भाषा खालावत नाही आणि उंचावत नाही भाषा अंगीकार जोपासना बोली लिहणं वाचन करणं आपल्या प्रत्येकाच्या आपल्या हातात ओठात असते. आपण अगोदर मराठी अंगीकार केला आहे तर तो टिकवणं पुढच्या पिढीत रुजवण जोपासणं बोलणं आपल्या हातात आहे. आपणास आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकण्यास घालतो पाठवतो काय तर इंग्रजी हि जगमान्य अनेक देशात बोली लिहण्याची भाषा आहे आंतरराष्ट्रीय पात...

शोध सत्याचा

Image
||  शोध सत्याचा ||     सत्य याचा अर्थ काय तर पृथ्वी वर जीवसृष्टीत  वर्तमान भूतकाळ यात घडलेल्या वास्तव गोष्टी. वास्तव हेच सत्य असं मला वाटते. जे आहे तेच सत्य आहे. त्यात जे लपवलं जातं ते खोटं असत्य असंच आहे. मनात जे असेल त्या क्षणाला तेच ओठात आलं पाहिजे तेच सत्य मनात एक ओठात दुसरं ते असत्य. मग तो विषय कोणता पण  मनातलं असो वा बाहेरील वास्तव,  वास्तविकता याला सत्य म्हणतो आणी मानलं जातं असं वाटते.                   हा लेख लिहण्याचा प्रपंच असा सुचला फेसबुक वर एक पोस्ट आली ती वाचली त्या वरून लिहतोय. पोस्ट अशीं "मी जन्माला आलो तेव्हापासून सत्याच्या शोधात आहे हे सत्य पाहिले का कृपया सांगा " पोस्ट लिहणाऱयाने वास्तव लिहलं असं वरकरणी वाटते पण त्याला हे उमगलं नसेल. सत्य म्हणजे काय आणी सत्य असतं कुठं आणी शोधायचं कुठं. सत्य हे आपल्यात आहे तर सत्य दिसते आधी ते आपल्यात असावं आणी मग दुसऱ्यात शोधावं त्याला शोधत बसलात तर उभ आयुष्य वाया जाईल पण जगात कुठंच मिळणार नाही त्या साठी मी म्हणेल दिव्य दृष्टी हवी. ती आपल्यात नाही मग शोध ...

पानगळ क्र 1✍️

Image
||  पान गळ ||   गळ होते पानांची  वस्र फेकली अंगावरची  चक्र सारी पृथ्वीवरची  ऋतु येती नित्याची… किमया भारी  वृक्षांची  कमतरता होते पाण्याची  संकटात झेप वाढण्याची  गरज भागवता मानवांची…   उन्हात छत्री पानांची निर्मिती करता  ऑक्सिजनची  खत निर्मिती पालापाचोळ्याची  पोत सुधारते शेताची…   पानगळ पण उपयोगाची  वेळ खंभीर होण्याची  बोध घेत वृक्षांची  रीत अशींच जगण्याची… ________________________   प्रदीप मनोहर पाटील  मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव 

निर्वासितांचे लोंढे आणि विदेशी घुसखोरी.

Image
  निर्वासितांचे लोंढे आणि  विदेशी घुसखोरी. देश स्वतंत्र झाला त्या दिवसा पासुन आपल्याला हि समस्या भेडसावद आहे. मुळात फाळणी झाली तेव्हा भारताने सर्वधर्म समभाव अंगिकारला स्वीकारला आणि नंन्तर आज तागायत  जोपासला. पण भारतातुन पाकिस्तान वेगळा होत असतांना त्या देशाने इस्लामी राष्ट्र म्हणुन आपली चुल वेगळी मांडली नव्हे त्याचं संकल्पनेतून त्या देशाचा उदय झाला. मुस्लिम बहुल प्रांत म्हणुन पाकिस्तान निर्माण झाला. त्यात काय झाले तेथील बहुसंख्य हिंदु येथे आले पण फार कमी संख्येने मुस्लिम येथुन तेथे गेले. काय तर येथील मुस्लिम यांचा भारतीय जनता भारतीय नेते संस्कृती या वर पूर्वापार असलेले प्रेम. मग तेथील हिंदूच त्या देशावर प्रेम नव्होते का तर होते पण जातीय दंगली तेथे जास्त प्रमाणात उफाळुन आल्यात त्याचा परिणाम.भारतात महात्मा गांधी, पटेल, नेहरु,आंबेडकर  आणि तंत समई असलेली नेते मंडळी आणि  सारी भारतीय गुणी संस्कारी जनता. सामोपचार सदभावना  येथे रोम रोमात भरला होता आणि आहे. म्हणुन येथील मुस्लिम तिकडे गेला नाही तो समाज पण त्याचं पद्धतीने येथे राहतोय राहात आलाय अब्दुल हमीद त्या सारख...