Posts

Showing posts from January 24, 2021

आई - मायेचा सागर

Image
| | आई - मायेचा सागर | | आई मायेचा सागर  ममतेचे असतं आगर  भरला  जीवनात सार  उचलला रक्तातुन भार.  आणलं तीनं पृथ्वीवर  कळवला   सृष्टी सार  जगलो तिच्या दुधावर  शतदा प्रेम जगण्यावर..  मन झालं प्रेमळ होती तीच निर्मळ  तिनेच उचलली  कावड  केला कुटूंबाचा सांभाळ  जरी तिला भोवळ लोटला थोडा काळ  आली तिची वेळ  बसवु सारा मेळ. नको तिला अंतर  थकलं तीच शरीर  आता उचलु भार  जाईल आपुल्या खांद्यावर.  अंनत माउलीचे उपकार  फेडु येथेच सारं   आशीर्वाद मिळतील फार  करा मन गार.  प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव  ©️®️

होळी

Image
| | होळी | | जुन जाळूं सोडू  नवं सारं अंगिकारू  विविधतेत एकता साकारू  स्वर्ग येथेच अवतरू...  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव  ©®

धुलिवंदन- काल आणि आज

Image
| |  धुलिवंदन - काल आणि आज | |  ( संस्कार आणि संस्कृती पर्व ) रंग दिला फुलांनी  कुस्करले त्यांना मुलांनी  लावले  लहान थोरांनी  उधळण विविध रंगानी…  विझवु  आतबाहेरील अग्नी  उडवत  धुळ्वळ सर्वानी  शिंपडू पाणी एकमेकांनी  कात टाकली झाडांनी … वाईट सोडले त्यांनी  अंगीकार केला पूर्वजांनी  पाहुन सृष्टी सार्यांनी  बदलली दृष्टी लोकांनी…  दडला असे दृष्टिकोन  छान विज्ञान मन  चल अचल सारी  धरा अवघी   रममाण…  आता टाकताय घाण  करताय रसायन उधळण  झिगताय खाऊन पिऊन  त्रासदायक सर्व  काहीपण…  वाटतंय जुनं तेच सोनं  अशीच आहे म्हण बदल हा निसर्ग नियम  योग्य ते ठेवा जपा पण … प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव  ©®

चित्र काव्य ✍️

Image
| | चित्र काव्य | | करून देवपूजा सारी  आली माऊली दारी  पहिले अंगण सारी  देतेय पाणी भरून झारी.  खेड्यातील जीवन भारी  तुळस असतेच दारोदारी  घर लाकडी जरी  पाहून मन प्रसन्न करी.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जळगाव  ©®