Posts

Showing posts from September 28, 2025

आदिमाया ✍️

Image
 आदिमाया  शक्ति रूप माया! घेतेस स्वरूप! दाखवतं रूप! आदिशक्ती!! देव करे धावा! आम्हाला वाचवा! शस्र हो चालवा! दृष्ट्रावर!! नऊ रंग दावी! नवं अस्त्र घेतं! सिहांवर येत! काली आई!! नवं निर्मि जीव! वाढवी सजीव! कार्य ते भरीव! निर्मितीचं!! विश्वची निर्मिती! ब्रम्हांड रक्षिती! जागवीत रती!मां कामाख्या!! प्रदीप अभंगी! वर्णनात सांगी! आई अंतरंगी! जीवनात!! प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

दसरा ✍️सण

 दसरा  सण आनंदी हसरा  दुःख सारंच विसरा करू एकीत साजरा सुगी सुखाचा माजरा. धन धान्य येई घरा दृष्ट ठेवती नजरा शस शश्राश्र पुजून घेऊन येऊया घरा. सारे भेटूयात आता सोबत भाऊ ठेवता  मिळून सारे युद्धा सदैव तयार होता. सुख शान्ति धन रूद्धी  गाव गावात समृद्धी  ओलांडून वेस आता सोडुन साऱ्याचं हद्धी. हृदय ठेवु निर्मळ वागत राहु प्रेमळ करू साऱ्यांचा सांभाळ सुखाची करू वाढ. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

दसरा सण✍️

 दसरा  सण आलाय दसरा  चेहरा ठेवु हसरा  दुःख सारेच विसरा धान्य येतंय हो घरा. लक्ष्मी सोनेरी पावलं पानात मना ठेवलं हृदयात तिला भरलं जीव जीवन तरलं. सोनं नाणं धान्य धन शमी वृक्ष्याचे पुजन  करे सीमा उलंघन लुटू सारं नवं धान. ठेवु वडिलांचा मान एकीत सारं निर्माण घराची वाढतं शान भाऊबंद ठेवी जाण. हृदयात भरतो सण करतं रावण दहन दृष्ट मारूयात मन साऱ्या माद्या मां समान. प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

महात्मा गांधी ✍️

 महात्मा गांधी  गांधी यांची आंधी! स्वातंत्र्याची नांदी! शोधलीत संधी! अहिंसेत!! सत्य वद मुख! खरं ते स्वरूप! दिला हो हुरूप! जनतेला!! नेसलात पंचा! चरख्यात काते! स्वतः ते निर्मिते! कपड्याचे!! वापरत खादी! राहणी साधी  मिळव आझादी! सांगितलं!! मवाळ अहिंसा! सत्वात जाणले!  तत्वात आणले ! देशासाठी!! नेताजी यांनीच! महात्मा झालेत! पदवीत दिले! संबोधन!! जहाल मवाळ! एकीत चालले! मंत्र सांगितले! स्वातंत्र्याचे!!  क्रांती घडवली!कीर्ती वाढवली! एकतेत आली! भारतीय!! समता संदेश! स्वतंत्रात देश! विविधता भेस! अंगीकार!! देशाचा ते आत्मा! प्रदीप सांगतो! अभंगी लिहतो! गुण थोडे !!  प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

दसरा ✍️

 दसरा  गाव सीमा पार ! शमी वृक्ष पूजा! शस्र सारी पाजा! रक्षे साठी!! करतं उलंघन! साऱ्याच तत्वाचं! जागृत सत्वाचं! अवलंब!! वचक असावा! धाक व्हावा चोरा! संदेशचं सारा! दसऱ्याला!! नवं वस्र घाली! शिवार ओलांडी धान्य सारं धुंडी! जगण्याला!! आपट्याची पाने! जिंकतात मने! हृदय ते जाणे! स्वकी्यांचं!! सण मोठा सारा! एकतेत करा! सुगीचा पसारा! धन धान्य!! पीक पाणी धान ! देवाण घेवाण! संदेश हो छान! दसऱ्याला!! गाठी भेटी घेत! सुखात दुःखात!  करा सुरवात! साथ देत!!  कणसं भरली! माणसं तरली! एकीत उरली! भाऊबंद!! कुबेराचं धन! प्रदीपचं मन! नव्याने निर्माण! लिहूनच!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

हे प्रेम वेड्याचे ✍️

Image
 हे प्रेम वेड्याचे  हे प्रेम वेड्याचे कळलेचं तुला नाही  का फुल गुलाबाचे कधी हसले नाही  ओठावर तुझ्या माझंच नाव होतं  तरी सूर मनाचे जुळलेच नाही  हृदयात माझ्या तुझंच नाव होतं कोरलं  तरी घातलं दुसऱ्याच्या नावाचं डोरलं  आठवणीत सतत येत शून्यात बुडवते  तरी म्हणतेस मी का त्रास देते  मुध्दाम नजरेत वार करतं राहतेस घाव सदैव देत जखम खोल करतेस स्वतः खुश राहतं शरीर सांभाळतेस   पाहुन मजकडे तु का सुखावतेस  सांग तुला का कळलेच नाही झुरवण्यात तुला वाटतं का नाही प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

संन्यास ✍️2

 संन्यास  सोडून सारं काही  रानात राहण्यास जाई  हा संन्यासी होई  संसारचं सोडुन देई. काम क्रोध मत्सर मोह माया ने जिझे काया तुळशी धराया  संन्यासी बनतात बाया. नर असो वा नारी  सोडून सारं घर दारी  काढतात वारी  जाई भेटी पंढरपूरी. नाम घेत देवाचं भिक्षा घेऊन संसारीची चिंतन वारीची सदैव भटकंती त्याची.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

संन्यासी ✍️1

 संन्यासी  कथा कीर्तन करी  सदैव राही भ्रम्हचारी   देव दरबारी  सेवा नित्य आश्रमावरी. मुखी नाम देवाचं  वेड टाळ वीणा मृदूंग  करी संत संग  सांगत सदैव अभंग. नारीस नसे स्पर्श माता बघिणी मानतात देह जाळतात  मन खंबीर ठेवतात. बालक भ्रम्हचारी धर्म ज्ञानात अंगिकारी तो सदविचारी संत वस्र भगवाधारी.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जिल्हा. जळगाव मो. 9922239055

नेसले मी नऊवारी ✍️लावणी 2

Image
 नेसले मी नऊवारी  नऊ रत्नाची खाण मी नेसली नऊवारी नऊ गुणांची जाण येता ना राया घरी आहे मला अभिमान, तुमीच मित्र वाटता मला छान  तुमच्या साठी नवी कोरी घातली नऊवारी आज मोडा घडी झाली हो पार वेडी तुमची लांब माडी नजर तिजवर जडी आस लागली भेटायची आता सख्या राहवत नाही  कधी उघडेल खिडकी तुमची मी डोळे फाडत राही जरा जपून चालवा नजरेचा तिर मन करतेय मी जरा खंभीर अलगद या सुगन्ध घेण्या मोगऱ्याचा धागा हळुवार तोडा ह्या माझ्या गजऱ्याचा नका लावु जोर नवा धागा आहे कमजोर मनात तुमच्या राया चोर मन माजलैय घनघोर नका करू शोर जपून मोडूयात घडी नेसले मी नऊवारी  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055