Posts

Showing posts from June 15, 2025

बाबास पत्र ✍️ पत्रलेखन.

Image
!!पत्रलेखन!! दिनांक :- 15/06/2025  वार:- रविवार विषय:- " बाबास पत्र"    आदरणीय. कै. नानासो.                  नाना आज आपण आमच्यात नाहीत. मला आज आपणास पत्र पाठववावं असं वाटलं म्हणून व्यक्त होतोय .नुसतं कागद हातात घेतला अन आपल्या साऱ्या मला आठवतं असलेल्या जुन्या साऱ्या आठवणी मनात आल्या.डोळे भरून आले. डोळ्यात अश्रू येऊ लागले मन गहिवरून गेलं. आपण गेला एक मोठा मुलगा म्हणून जबाबदारी टाकून गेला. जातांना शेवटी अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या डोळ्यात अश्रु मला दिसतं होते. डोळ्यात अश्रु थेंब पडतांना नकळत सांगतं असावेत . काय करू प्रदीप अचानक जावं लागतंय. तुम्ही लहान असतांना सोडुन जातोय हेच भाव तुमच्या मनात असली पाहिजेत. काळाने घाव घातला. लवकर पहाटे पहाटे ब्रेन ह्यामरेज चा ऍट्याक आला.चार दिवस सुप्त बेशुद्ध अवस्थेत होता.त्या वेळी लोकं म्हणायची गेल्यात जमा आहे. मी आई देवाच्या धावा करतं उशी जवळ बसलेलो असायचो. देवाने आमचं आयकले. अन हळूच तुमची बोटं हलली नंन्तर थोडी शुद्ध आली हळूच हात हलला. मग डॉ उपचार जोरात सुरु झाले.एक महिनाभर दवाखान्यात होता. ख...

फादर्स डे ✍️

Image
!!फादर्स डे!! सृष्टी दाखवली ज्यानं  त्याचा हो आलाय दिन  वाटतंय कसतरी   दिवसात हो कोंडून. ठेव असते मनात  वारसा तो जीवनात  राबे बाप हो रानात  सोबत साथ हृदयात. मुला साठी तेच झटे आता निघाली दिवटे वागता ह मुलं खोटे संपत्ती त्याचीचं लुटे. रुद्धाश्रम ठेवतात नाव त्यांच लावतात बालपण  विसरता अश्रू खोटं गाळतात. गावातील ते वडील साठवा मनात रूप रोज पहा त्यांचं मुख वाटत देव स्वरूप. सदैव करा संन्मान ठेवा त्यांचा अभिमान सुखी करा नित्य मन  डे रोजचं करा छान.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055