विज्ञान एक वरदान ✍️
| | विज्ञान एक वरदान | | जीव निर्मिती होऊन अंनत काळा नंन्तर माणुस विज्ञान वादी बनला. असं म्हणतात पण हे खरं नाही असं मला वाटतं मानव तसा सुरवाती पासुन संशोधक असला पाहिजे नव्हे होता फक्त त्याच स्वरूप बदललं त्याला विज्ञान नाव दिल गेलं. मानव निर्मिती नंन्तर सुरवातीला शोधक नजर ठेवुन सुरवात आग कशी पेटवायची ती निर्माण केली अन्न शिजवुन खाऊ लागला. स्वरक्षण साठी दगडा पासुन हत्यार बनवले. नंन्तर विळे गोफण कुऱ्हाड पुढे ढाल तलवार. पुढे तोफ बनवली.अणुबॉम्ब पर्यन्त पोहचलो. माती कोणती कशी त्या पासुन भांडी बनवली. रंग शोधुन काढले. नंन्तर जमिनीतुन खनिज काढु लागला लोखंड सोन चांदी शोधुन काढलं . त्या पासुन वस्तु बनवल्या पशु पक्षी यांना माणसाळून त्यांच्या मार्फत कामं करू लागला. ग्रह तारे यांचा अभ्यास करून वारे कसे वाहताय मग पाऊस कसा पडणार कोणते पक्षी कशी हालचाल करतात हे शोधुन बोध घेऊ लागला त्यांनी घरटं कुठं बांधली यावरून पण पावसाळ्याचा अंदाज घेऊ लागला. कोणतं अन्न खायचं हे शिकला नंन्तर शेती करू ...