जाणता राजा ✍️🚩
!!जाणता राजा!! हर हर महादेव मंत्र गुंजला कडे कपारी घेऊन शपत रायरेश्वरी अवतार झाला भगवाधारी. जनता आनंदली सारी सोबत मावळे तलवारधारी आईची शिकवण भारी स्त्री माता पूजल्या दरबारी. मोडली सारी वतनदारी राज्य चालवण्या कारभारी योजना शेतकऱ्यांच्या कल्याणकारी जपत शेती भारी. राज्य आणलं रयतेचं उभारलं आरामार भारी किल्ले कडे कपारी दौडत सैनिक घोड्यावरी. मोडली पातशाही सारी राज्याभिषेक करून राजे देश विदेशात गाजे दरबार रायगडी सजे.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर तालुका चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055