Posts

Showing posts from September 14, 2025

आईची माया

 आईची माया  आई तुझी शक्ति, अगाध वाटली उठे तु गं केव्हा, नाहीच दिसली झोपली सांग गं, नाही आठवली रात्रनं दिवस, कष्टात भासली संसार करता, तुचं गं झिजली दळणं सूपात, धान्य निवडली माया ममतेनं, पोरं वाढवली  हसणं गाण्यात, दळता दिसली  जात्यावर ओव्या, तुचं हो म्हटली  संस्कार संस्कृती, अंगणी रांगोळी  देव्हार्यात देव, पूजता दिसली  तुळशी सजली, मा देवी भेटली.©️®️   प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

दुर्गा शक्ति 6'6'=12 शब्द ओळी

 दुर्गा शक्ति  नवं दुर्गा शक्ति, करतात भक्ती  नऊचं दिवस, नवरात्रीतचं  सदैव सोबत, जळी स्थळी असे  करते संहार, चाले तलवार घाली तीच माळ, डोकंचं छाटून रक्षण करता, तीच देवा दिसें. धावा करे सारे, दृष्ट तिचं मारे  जागरण तिचं, गोंधळ करतं लावी दिप जोती, खेळ खेळतात  दांडिया हो रास, नऊ दिवसात  प्रसन्न करता, धन लक्ष्मी मिळे लोटांगण देत, भक्त लोळतात.©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

अभियंता ✍️ दश ओळी

 अभियंता  घेत शिक्षण उच्च अभ्यासक्रम  शिकण्यात मन आनंद गुंतवून गणित ज्ञान सायन्स ची जाण मिळवतं पदवी अभियंता  देतात साक्ष नवं निर्मितीतून. रस्ते धरण बांधकाम विकास  धरतात नवं निर्मितीची कास  घेऊन सतत मनात त्याचा ध्यास  ठेगणं केलं निर्मानातून आकाश  मनात सुख मिळेल हिच आस.©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

अभियंता ✍️ अभंग

 अभियंता  आज अभियंता! दिवस ठरला! सन्मान भरला! दिवसाला!!1!! रस्ते आराखडा! पूल जलकुंभ! नवीन आरंभ! सल्लागार!!2!!  निर्मिती आगार! रेखाटन फार! करतो साकार! उभारून!!3!! धरण विकास! आधुनिक कास! अंतराळ भास! दुर्बीनीत!!4!! यंत्र तंत्र सूत्र! आणि नवं रूप! देतात स्वरूप! साकारून!!5!! घडवून शिल्प! स्वप्नं ते साकार !  देतात आकार! नवं वास्तु !!6!! प्रदीप सांगतो! त्यांच्या साऱ्या कथा! करतोचं स्वतः! अभियंता!!7!! प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो.9922239055

शुंगार ✍️

!!शुंगार!! घाली अलंकार! नटरंगी नार! नजरेत वार! पुरुषांच्या!!1!! ठुमकत चाल! तरुण बेहाल! हृदय हलाल! बघुनच!!2!! रूप बघताच! शिट्टी गाणं वाजे! लावणीत सजे! सौदर्यवती!!3!!  भरजरी वस्र ! करून शुंगार! मन करे गार! लाजतांना!!4!! ओठ करे लाल! मऊ मऊ गाल! मटकत चाल! मनमोही!!5!! डोळ्यात काजळ! नजरेत कळ! लावतेच वेड! तरुणाई!!6!! पैंजण झुंबर! घालते हंबर! सोनं अंग भर ! शृंगाराला!!7!!©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055