Posts

Showing posts from September 20, 2020

आई

Image
लेखक :-प्रदीप मनोहर पाटील...      आई म्हटले कि आपल्या डोळ्या समोर उभी  राहते मायेचा सागर वात्सल्य करुणा मूर्ती  आज मी आपल्या समोर आई या विषयी लिहणार बोलणार आहे. तसं पाहील तर आई वर सर्वांचे खुप बोलुन झाले आता पर्यंत जगात खुप काही लिहिले बोलले गेलंय सर्व सांगुन झालंय. मला लिहण्या साठी काहिच उरले नाही असं वाटते  पण विषय निघाला म्हणुन लिहतोय खांदेश कवियत्री स्वर्गीय  बहिणाबाई   या खुप वर्षा पूर्वी म्हटल्या, " माझी माय सरस्वती " आपण आज जे आहोत ते सार आई ची देण आहोत आपल्या जवळ असलेली विद्या,  संस्कार हे आई चेच देण आहे... विश्वरूप आई या विश्वाची जननी माता म्हणजे आई. विश्व निर्मिती होतांना आई चं योगदान खुप मोठं आहे पित्या बरोबर सम्पूर्ण पणे एकरूप होऊन माता पिता यांनी या सुंदर विश्वाची निर्मिती केली. मातापिता  तसं पाहिलं तर एकच आहे पण अंग भिन्न असल्या मुळे रूप वेगवेगळे दिसते एक शिवाय दुसऱ्याच अस्तित्व नाही अगदी तसंच  आहे आणी दिसते  म्हणजे एक नाणे त्याच्या दोन बाजु आहेत. एक दुसऱ्या विना अधुरं दोघे देव रूप एकाच अस्तित्व दुसऱ्या शिवाय...

ग्रहण

Image
    ग्रहणासंबंधी माझे विचार, ग्रहण हे सूर्य आणी चंद्र यांनाच लागते आपण असं मानतो आणी आपल्या लेखी तेच सत्य आहे . कारण आपण पृथ्वी वर राहतो सूर्य आणी पृथ्वी भोवती फिरणारा पृथ्वी चा उपग्रह चंद्र हे ग्रह आपल्या डोळ्या समोर आहेत ते एकमेकांन भोवती फिरत असतात. म्हणुन जेव्हा एका सरळ रेषेत आले तेव्हा एका आड दुसऱयांची सावली पडली कि आपण ते ग्रहण समजतो आणी तसं आहे. मग कधी चंद्र किंवा सूर्य यातील दोघाच्या मध्ये कोण आला त्याच ग्रहण मानले जाते. बरं विश्वात अनेक ग्रह आहेत आणी अनेक सौर माला पण आहेत त्या त्या सौर मालेतील ग्रह यांची एकमेकांची सावली किंवा सरळ रेषेत ते काही ग्रह येतं असतील तर आपण जर ते दिसलें असते तर आपण त्यांना पण ग्रहण लागेल असं म्हटले असते दिसत नाहीत म्हणुन मानवास ते माहित नाही असं म्हणावं लागेल.  ग्रह आणी ते फिरत असतांना त्याची पडलेली पडछाया यास आपण ग्रहण म्हणतो आणी मानत आलो आहोत अगदी अनादी काळ पूर्वापार.    प्राचीन काळी ग्रह आणी तारे यांच्या विषयी एक शास्र होते आणी आज पण आहे. त्यास कोणी जोतिष शास्र म्हणतात. पण मला असं वाटते कि पूर्वी लोक प्रगत आणी हुशार असले पा...

रिकामं मन.✍️

Image
        माणुस कामा व्यतिरिक्त रिकामा झाला  काही कारणाने बेचैन असला तर त्याच्या मनात असं म्हटलं जातं शैतान घर करतो.  हि संकल्पना जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर  यांनी मांडली.  सांगितलं लिहले म्हणुन जगप्रसिद्ध झालं.   काय असतं एखादया प्रसिद्ध  माणसाने सांगितलं की सारं आपण मानतो आणि मानलंही पाहिजे. त्यांच मतं तसं पाहिलं तर योग्यच आहे. त्यांनी  त्यातून हाच संदेश दिला.  रिकामं मन ठेवु नका कामात गुंतवुन ठेवा असंच. हिच भूमिका मांडलीय पण अशी विरुद्ध बाजूची भूमिका मांडून त्यांनी संदेश दिला.   शैतानाचं नाव कश्याला घ्यायचं चांगल्या कार्यात चांगले विचार रूजवतांना असं मला वाटतं .  मी म्हणतो तसा संदेश सकारात्मक. वाईट मधुन चांगलं सांगण्या पेक्षा चांगलंच सांगून छान संदेश जातोचना  .   माझ्या मताने बघितलं तर" रिकामं मन हे देवाचं घर असते नवनिर्मिती खाण असते" असं आहे. हि त्यांच्या मता  विरोधी मतं दुसरी बाजु. त्यांनी सांगितलं तेही खरं पण मी सांगतो तेही खरंचं आहे. जेव्हा माणुस उदास होतो तेव्हा असं म्हटलं जात...
Image
काळ होता  पंचवीस तीस  वर्ष पूर्वीचा. माझं नुकतंच शिक्षण अर्ध्यातून सुटलं होतं. वडील गेले घराची जबाबदारी अंगावर  आली होती.शेतीत कधी कामाला माणूस लावावा लागे.   गावात एक उत्तम नावाचा  मुलगा जो माझ्या पेक्षा लहान आणि  वेडा होता. नव्हे परिस्थिती मुळे त्याला वेड लागले होते . त्याचे वडील दुसऱ्यांच्या घरी सालगडी म्हणून काम करत .  बहिणी सासरी गेलेल्या.  त्यात आई वारली घरात खाऊ घालण्यासाठी कोणीच नाही. त्याचे वडील कामाला जातं उत्तम ला स्वतःची भाकरी बनवता येतं नसे. तो ज्याच्या कडे निंदणी किंवा कुठं पाणी भरण्यास जाई तेथेच शेतमालक त्यास खाऊ घाले. मजुरी तुन उत्तम स्वतःच्या वेडसर पणाच्या  गोळया  महिन्यातून एकदा पैसे जमले की जिल्ह्या वर जाऊन आणत असे.. आमच्या कडे नियमित तो कामास येई . कधी पाणी भरण्यास पाठवलं तर पाणी ज्या सरी मध्ये सुरु राही शेवटी  दुसऱ्यांच्या शेतात वाहत जाई पण त्याच लक्ष नसे. शेजारी शेतकऱ्यांना माहिती झाले होते उत्तम हा वेडसर त्यास कोणी बोलत नसे. अशा सवयी मुळे लोक त्यास कमीच काम सांगत पण माझ्या कडे तो नियमित येतं असे मीही काम ...

कथा क्र 01

Image
| | बोधकथा | | लेखक :- प्रदीप मनोहर पाटील.   माझे आजोबा कै. वेडू आण्णासो. मला लहानपणी नियमित गोष्टी सांगत  त्यातील आठवणीतील गोष्ट....  एक कुटुंब असतं. त्या कुटूंबात एक वयोवृद्ध म्हातारे गृहस्थ त्यांचा मुलगा,  सुनबाई आणि नातु असे छोटंसं चार जणांचे कुटूंब लहान असतं.. म्हातारे बाबा  खूपच वृद्ध असल्या मुळे बाहेर फिरायला किंवा कुठं जायचा विषयच नसतो. अंगात कुठलाच त्राण नसतो नुसतं घरीच अंथरुणात पडून राहतात. तेथेच उठ बस जेवण करतात.   त्यांचा मुलगा नोकरीला असतो. मुलगा  त्यांची हि अवस्था पाहून एक घोगडी   (घोगडी..  पूर्वी  पावसाळ्यात मागील बाजूस डोक्या वरून खालपर्यंत सोडतं. रेनकोट सारखं... पावसात भिजू नये म्हणून.. नंन्तर सतरंजी सारखं कुठं झोपायला पण टाकून दिली की कामात येई...    ) आणून देतो. आणि घरातील एका कोपऱ्यात टाकतो.  वडिलांना सांगतो हया घोगडी  वर बसत चला. झोपायला पण होईल. वडिलांना त्यांची जागा दाखवून देतो. बिचारे तेथेच उठ बस जेवण करतात. तेथेच एक कोपऱ्यात जाऊन बसत असतात. असाच दिनक्रम त्यांचा सुरु असतो. असं करत करत...