Posts

Showing posts from February 21, 2021

सूर्य गवसला

Image
        विषय :- "आणि सूर्य गवसला"            शीर्षक  -:-  "सूर्य गवसला"            कविता -:- सूर्य गवसला…  दीन दुःखी समाज  होता साहुकारांना माज  जनतेला पिळून चाले  श्रीमंत फिरंग्यांचं राज. कष्टकरी  होता दुःखी  जन्मले गरिबीत राव  शिकून दिली घटना  झालेत लाडके भीमराव.  माणसात संत अवतार  प्रकाश पडला फार  केला मनुवर वार  आला जगण्यात सार.  चुणूक बालपणीच दिसली  जाऊन दूरदेशी शिकले  तज्ञ बनून आले  समाजास जागृत केले.  सूर्य गवसला भारतास  संविधान  देशास मिळाले  चमक अंधारात पडली  दैदिप्यमान राष्ट्र निर्मिले. ✍🏻  प्रदीप पाटील         गणपूर ता - चोपडा.         जिल्हा - जळगाव.    ©️®️ 🌹➖➖➖🔸🙏🔸➖➖➖🌹

तरुणाईच्या वळणावरती

| | तरुणाईच्या वळणावरती | | आईच्या खुशीत बालपण  वडिलांच्या आज्ञेत  लहानपण  बाबांच्या गोष्टीत संस्कार  गुरूंच्या शिकवण्यात शहाणपण.  जाते मजेत बालपण  खेळण्यात समजत नाही पण  मित्र ठेवता जाण पण  येता तरुणाईच्या उंबरठ्यावर पण.  भरकटता कधी विचार पण  सोडु नये सदाचार पण  ठेवावी कुटूंबाची जाण पण  आठवावे विचार आपण पण.  हेच वय घडण्याचे  आयुष्यात पुढे पळण्याचे  आधार स्तंभ होण्याचे  कुटूंबास आधार देण्याचे.  देशाची मान उंचावण्याचे  गगन भरारी घेण्याचे  नको धूम्रपान घेण्याचे  लफड्यात नाही पडण्याचे.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©️®️

विद्रोहाची आग

Image
| | विद्रोहाची आग | | प्रवाह विरुद्ध पोहून उरतो  देत ज्ञान समाजात फिरतो  वाटतं मनाविरुद्ध करतो  तरी हा पुरून उरतो.  जळजळीत सत्य मांडतो  प्रसंगी सर्वाशी भांडतो  लेखनास धार देतो  कोळून विष अमृत बनवतो.  अन्याया साठी झगडतो  अत्याचारा विरुद्ध लढतो  मानवास एकत्र करतो  कुविचारास लांब पळवतो.  विद्रोह चांगल्या साठी  सोबत घेऊन काठी  थाप पडावी पाठी  सारं जनते साठी.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©️®️