Posts

Showing posts from December 20, 2020

रक्षाबंधन

Image
| | रक्षाबंधन | |     चंदनाच्या पाटावर भावाला   सोन्याच्या ताटाने   ओवाळीते   अक्षता  कपाळावरच्या ब्रम्हांला  ज्योत  ओवाळीते भाऊरायाला … फिरवते  लावण्य सोन्याला बांधते  धागा भावाला सांगते भावाच्या  मनाला आपुली  कीर्ती ऊरुदे…  कळूदे या विश्वाला धागा बांधला  मनगटाला धार  दे तुझ्या तलवारीला राहा  तत्पर  रक्षणाला … सांगते तुला भाऊरायाला सण हा रक्षाबंधनाचा आला नको अंतर कधी नात्याला माहेरची साडी पाठव  बहिणीला … जाग आपुल्या संस्कृतीला विश्व् बंधुता या संकल्पनेला मान दे स्त्री जातीला रूप माझंच  स्त्री वर्गाला … ओरडून सांग मानवजातीला  सांभाळा  विश्वातील बहिणींला  मागणं समस्त भाऊ रायाला भाऊ बांधील विचाराला…  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

पोळा

| | पोळा | | सण आला पोळा  देव होतात गोळा  चला सजवू बैलाला  मूक प्राणी भोळा…  विश्रांती देऊ त्याला  सदैव राबतो शेताला  साथ त्याची शेतकऱ्याला  मान देतोय पोळ्याला … देतोय साथ सोबत  मिळतो आराम मला  राबणं तुझंच संगतीला  कळा तूझ्या मानेला … उन्ह पाऊसात  राबतो  औत ताकतीनं ओढतो  माती सोबत जुळतो  तरी चौखूर पळतो … खरा मित्र  शेतकऱ्याचा  भार हलका मालकाचा  ऋणी तोही बैलाचा   मान सण पूजेचा... प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®

बैलपोळा

| | बैलपोळा | | व्रत पशु सेवेचं  आलोय तूझ्या सेवेला !!धृ !! आजोबा पणजोबा पूर्वजांनी  बांधलंय तुला दावणीला  तीच परम्परा सुरु  तूच आहेस  संगतीला…  राब राब राबतोस  कष्ट आपल्या पाचवीला  जुंपतो शेतात औताला  बांधावरचं गवत तुला…  ऊन पावसात  कामाला दुशेर तूझ्या मानेला  जुंपतो पेरणी तिफनाला  माफ कर शेतकऱ्याला…  मूक सुख दुःख सोबतीला  धुवून  रंगवून सजवला  खाऊ घालतोय पुरणपोळी  पुजतो  या सणाला…  जिणं सृष्टी संग  राबुन मातीत थकला  लावतो ट्रॅक्टर हार्वेस्टर  देतोय विश्रांती तुला … प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव    ©®

रेडिओ पुणेरी आवाज साठी

Image
 रेडिओ पुणेरी आवाज साठी  ओंजळीत भरून  सूर्य  करून मनात  धैर्य  पाण्यानं घेतलंय स्थैर्य  पाहून तूझं सौदर्य.   होऊ दे आपुला मेळ  जीवनात येईल अशीच सांजवेळ  सोबत रंग भरू प्रिये  जगु  आनंदी जीवन खेळ … प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा  जळगाव  ©®

लेखणी ✍️

Image
| | लेखणी | | 1) लेखणी असतेस निर्जीव  शब्द भासतात सजीव  ज्ञानी होतो जीव  कार्य होतं भरीव… 2)  लेखणीची किमया भारी  ज्ञानदीप लावते दारी  कादंबरी गाथा अवतारी  मार्गदर्शक सत्य वाटेकरी…  3) अक्षर उमटते सोनेरी  भाव दाखवते कागदावरी  वाचून करतेस संस्कारी  मानव जीवन तारी… 4)  साकारते  शब्द मोती  कुठं जुळवते प्रीती  रुजवते  मानवात संस्कृती  जोडते त्यातून नाती…  5) कथा कविता कादंबरी  गाथा निर्मितीकार लेखणी  शब्द उमटवते देखणी साहित्यातील आहेस साम्राग्रीनी…  6) क्रांती जोत लेखणी  तोडते पाश अन्यायाचे  झुगारून सारे बंधने  उभारते साम्राज्य  न्यायाचे…  7) ढाल तलवार तोफ  कधी बंदूक लेखणी  मारून दृष्ट विचार  होतेस सद्विचार स्वामींनी…  प्रदीप पाटील. मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य

Image
| | प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य | | इंग्रज राजवट गेली  लोकशाही देशात अवतरली  प्रजेची सत्ता आली  गुण्यागोविंदाने नांदु लागली … समिती नेमण्यात आली  घटना लिहली गेली  हिताचं सर्वांच्या लिहले  स्वाक्षरी बाबासायबांनी केली … मान्यता सभागृहाने दिली  26जानेवारीला  अमलात आली  खरी मुहूर्तमेढ रोवली   देशाची मान उंचावली … प्रदीप मनोहर पाटील  मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव ©®

आद्याक्षरी काव्य

Image
| | आद्याक्षरी काव्य | | श्री प्रदिप मनोहर पाटील श्री. श्रीमंत असावे मनी  प्र. प्रसार व्हावा त्रिभुवनी  दि. लावून दिप मनी  प. पसरु दे कीर्ती जनी  म. महत्ता सुबत्ता बापावानी  नो. नोबत झडू दे अंगणी  ह. हरहर महादेव म्हणुनी  र. रवीचं तेज साठवुनी  पा. पाहू स्वप्न जीवनी  टि. टीम टीम प्रकाश महालातूनी  ल. लयलूट प्रकाशातुनि  ग. गंगा वाहे शेतातूनी  ण. णमन करतो वाकुनी  पु. पुर वोसंडे नदितुनी  र. रमलो तरी जाऊ जीवन सोडुनी.

आषाढी एकादशी

Image
| | आषाढी एकादशी  | | नाम घेतं  विठ्ठलाचे  वारी पोहोचते पंढरी  बाकी उपवास घरोघरी  पंचपक्वाण्य  खाऊन करी.. वास जीवात  तरी  करतात भेटण्या वारी  भक्ती पाहुनी मानवाची  पावतो विठ्ठल हरी.. तो उभा विटेवरी  पाहून हृदय भरी  बोध घ्या काहीतरी  दीनदुखी सेवा अंगिकारी.. येतो भेटाया दारी  कर्म हेचि पंढरी  नाम मुखी सदा  चित्त असावं सदाहरीहरी.. देव देव्हारा घरी  पूजा अर्चना सदाजोकरी  तीच रोजची वारी  दर्शन देतो हरी.. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा. जळगाव    ©®

बल सागर भारत होवो.✍️

Image
| | बल सागर भारत होवो | |  "बल सागर भारत होवो   विश्वात शोभून राहो"   हे कंकण  करी बांधियले,  जनसेवे जीवन दीधले,  राष्ट्रार्थ प्राण हे उरले,  मी सिद्ध मरायाला हो ! ह्या ओळी आठवल्या तर एक प्रकारची फुर्ती स्फुरण येत असे आणि येतंय. पूजनीय श्री साने गुरुजी आत्मत्मीयतेने लिहले.   त्यात जी आत्मीयता देशप्रेम देशाप्रती जी भावना वर्तवली भारताच्या उज्ज्वल भविष्याची त्यांच्या मनातील संकल्पना मांडली तीच ह्या देशातील सर्व तमाम जनतेला हवी अभिप्रेत आहे. स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्यांनी आपली प्राणाहुती दिली ते क्रांतिकारी वीर सर्व महापुरुष स्वतंत्र पूर्वी होऊन गेलेले जन्मलेले  साऱ्या जनतेच्या मनातील संकल्पना होती देश स्वतंत्र करून आपलं आपल्या जनतेचं राज्य निर्माण होऊन एक स्वतंत्र भारत निर्माण व्हावा आणि तो झालाही. स्वतंत्र निर्माण झाला पण स्वतंत्र संकल्पना तद नंन्तर फारशी रुजली नाही नेते राजकारणी नोकरशाहीत.सामान्य जनते विषयी आस्था नाही पण पोपट पंची करून कुठंही कशीही सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करू लागलीय गल्ली ते दिल्ली हेच चित्र. साम, दाम, ...

नवं वर्ष ✍️

Image
| |  नवं वर्ष | | स्वागत करू नववर्षाचे  दिवस येतील हर्षाचे  क्षण येतील आनंदाचे  आयुष्य आहे जगण्याचे….  मन भरून राहण्याचे  स्वप्न  सुखी संसाराचे  निरोगी शरीर राहण्याचे  फळे  चाखु  कष्टाचे…. ऋण फेडु आईवडिलांचे  पाईक आपण  देशाचे  लेकरू आहोत स्वधर्माचे  भाऊ आहोत परधर्माचे…. कुटुंब भारत एकोप्याचे  विसरू राजकारण जातीपातीचे  सोडू द्वेष परजातीचे  होईल नाव देशाचे …   कल्याण सारं जनतेचे  अंगीकार करु  तंत्रन्यानाचे  मोडू कम्बर्डे भ्रष्ट्राचार्यांचे  दिवे लावु न्यानाचे ..  आशीर्वाद आपल्या महापुरर्षांचे  नका करु त्यांना जातीपातीचे  होते ते देशाचे  नहोते कुण्या धर्माचे….  कुटुंब आपुले मायेचे  हात आधार देण्याचे  मजेत स्वागत नववर्षाचे  आचंद्रसूर्य अखंड भारताचे... विश्वात धुरा महासत्तेची   करु  प्रगती देशाची  पूजा मांडु जीवांची  शक्ती आपल्या कुटूंबाची…. नवं त्याच गुणगान  जुने आपली शान  उंचाउ साऱ्यांच  राहणीमान...

गुढी पाडवा

| | गुढी  पाडवा | | चैत्रातील गुढी पाडवा  वाढवतो मनात गोडवा  दुःख जुनं पळवा  संस्कृती नवी घडवा....  सृष्टीने टाकली कात  आपली  नवं वाट आली सुंदर पहाट  चढू चैतन्य घाट....  निंबाचा पाला कडु   गुळाचा गोडवा मिसळू  गुढी तोरण उभारू  पुरणपोळी खापरीवर घडू...  औरंग्याने लावल गालबोट  राजे संभाजी शेवट  स्मरण त्यांच करत  देश स्वराज्य आणु नवंपहाट....  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

चारोळ्या : अवकाळी पाऊस

Image
| | चारोळ्या | | | | अवकाळी पाऊस   | | 1)  लागलाय बळी कामाला  पिकांना जोम आला  उधाण आलं मनाला  त्यात का रं तु अवतरला…  2)  उन्हाळा सुरु झाला  त्यात अवकाळी आला  हवेत गारवा निर्मिला  मनाला चटके देऊन गेला…  3)  चाललं होतं सुरळीत  यंदा मिळेल सुख  मनात होतं शेतकर्त्यांच्या  अवकाळीने दाखवले दुःख…  4)  काय सांगु राजा   वाटलं होईल मजा   कोणत्या कर्मची सजा   दाखवला  पुन्हा दरिद्री दरवाजा…  5)  वाटलं यंदा घास   मिळेल  सुखाचा आस   अवकाळी पाचवीला ताटास    बसेल सावकारी फास… 6)  जीव होतो वेडापिसा   संसार हा असा   उतरेना कर्ज डोंगर   अवकाळी मुळे जसाच्या तसा…  7)  नको कुणाचे उपकार  कुठं फेडू भार यंदा आशा होती   पळवली अवकाळीने पार…  8)  सरकारी धोरण शेतकऱ्याच मरण   होतं अवकाळी नित्याचं आगमन     कसं  मुलांचं लग्नाचं तोरण   दुरावस्था पा...

किती पुजावा देव

Image
| | किती पुजावा देव | | अंतरंगी असतो देव  तेथेच ठेवु भाव  दगडात नसतोच राव  म्हणतात मला पाव.  पूजावा जाणावा मानावा   जीव जीवात पहावा  दीन दुःखितात शोधावा  निर्मळतेत त्याला अंगिकारावा.  सेवा आईवडिलांची करावी  पाय त्यांचीच धरावी  बुवाबाजी अंधश्रद्धा गाडावी  कश्याला बोकड मारावी.  चल अचल सृष्टीत  देव पडेल दृष्टीत  एकरूप होऊ त्यात  जीव ठेवू  जीवात.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©®

चला जाऊया खेड्याकडे

Image
| |  चला जाऊया खेड्याकडे | | चला जाऊया खेड्याकडे  पाहू पडलेल्या वाड्याकडे  बघु भकास   बुरुजाकडे  जाऊ गत वैभवाकडे.  बघु बैलगाडी कडे  जाऊ तेथे  गोठ्याकडे  जुन्या आठवणीत सगळे   आता सारं वेगळे. गेला आता पाणवठा  धरणात  पाण्याचा साठा  उजाड रान नदी  शांत बाजार पेठा.  गेलं जुनं साम्राज्य  देऊ गावकऱ्यांना धीर   सरकारी योजनांना उशीर   आधाराने बनवू खंबीर.    चला जाऊ खेड्याकडे  घालु साकडं गावदेवीकडे  सुख परतूदे इकडे माणसं माणुसकी चोहीकडे.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव   ©®