Posts

Showing posts from March 2, 2025

विविध रूपे नारीची. ✍️

Image
 विविध रूपे नारीची  शक्ति आदिमाया रूप  सोशिक वाटे स्वरूप  तिचंच निर्मळ रूप  वर्तव्य असे प्रारूप. काढते रोज नीर्माल्य साथ संगत सदैव  सेवा करून साऱ्यांची  तिचंच तरी दुर्दैव. प्रात दुपार संध्याला  कामं तिचेच सुरूच  घराला दाखवे रस्ता  तिला मानता गुरूचं. सारा उचलते भार  प्रेम भरते जीवनी  साठते साऱ्यांच्या मनी  ममता देते पेरूनी. आई बाई माता गुरू  भूमिका खुप साकारू  प्रेम वात्सल्य देतेच  कार्य ठेवतेस सुरु. जननी रागिणी तीच  संस्कार मूर्तीहि हिच  देवी देवता सारीच  अवतार ती भारीच.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

आपली सुरक्षा ✍️

Image
!!आपली सुरक्षा!!   करू स्वतःचं सुरक्षा  धडे घेऊ आत्मरक्षा  कमवु शरीर यष्टी  तत्पर असूत रक्षा. सोबत इतरांचीहि  घेऊ काळजी सारीच  दृष्ट्रावर पडु भारी  मित्र मैत्रीत यारीच. लढायची ती तयारी  एक राहू सारी जन  सु राष्ट्र करू निर्माण  ठेवुत शांतीचं मन. वसाच सुविचारांचा  निर्माण करू माणसा  साथ देऊ दिन दुःखी  झोडपू दृष्ट दिवसा. शक्ति करू बळकट  हात घेऊन हातात  वार करतं पोटात  वावरू सारी थाटात.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

मादी नव्हे माता म्हणून बघायला शिका. ✍️

Image
 मादी नव्हे माता म्हणून बघायला शिका.महिला दिवस निमित्त. मादी म्हणजे महिला नारी. आज सर्वदूर दुनियेत नारी फक्त उपभोग्य मजा करायचं साधन म्हणून मादी कडे बरंच बघितलं जातं असंच वाटतं. सध्या काळ खुप जोरात बदलतांना दिसतोय.आधुनिक होतोय की विकृत तेच सध्या समजतं नाही. जगात असं म्हटलं जातं. आईवडील पवित्र नातं असतं पण त्यातही सध्या खुप विचित्र घटना पहायला मिळताय. कुठं बाप मुलीला दृष्ट पणाने वागतो तिलापण सोडतं नाही तर कुठं मुलगा आई ला सोडतं नाही. तद नंन्तर भाऊ बहिण पवित्र नातं मानलं जायचं आणि जातंय . पण त्यातही भाऊ बहीण सुद्धा नरमादी नात्यात गुंततांना दिसताय.ईतर नात्यांची तर गोष्टच वेगळी कोण कोणावर सध्या भरवसा ठेवायचा हेच समजतं नाही. अगदीच अनाकलनीय गोष्टी समजतात वाचण्यात येतात. लहान असो मोठी असो भाची असो वा मुलगी असो मावशी असो वा आई नातं आज माणसं विसरतं चाललीय का? वर्तमानपत्र बातम्या बघितल्या की खुप काहीतरी विकृत घटना समोर येतांना सध्या दिसताय. लग्न झालेल्या स्रिया तरुण नात्यातील मुलानंच्या सोबत पळून जाताय. तर मुली वयस्कर पुरुष्याच्या सोबत संम्बध प्रस्थापित करतांना दिसता.ह्या झाल्या नात्यातील घट...

राष्ट्रीय सुरक्षा दिवस ✍️

Image
!!राष्ट्रीय सुरक्षा दिवस!! मातृभूमी रक्षा करी  सैनिकच सीमेवरी  सेवा त्यांची सदैवता  रोख त्यांचा  शत्रूवरी. अंतर्गत शत्रू फार  करता आतून वार  करू त्यावर प्रहार  मिळून त्यांचा संहार. सुरक्षा सारीच खरी  काळजी स्वतःच घेऊ  ताण कमीच देऊत  सुरक्षित स्वतः राहू. युद्धाची जमा सामुग्री  बंदूक ते अग्निबाण  रणगाडा तोफखाना  वर उडतं विमान. भारत भुमाता रक्षु  कार्य सैनिका भरीव  शिल्प त्यांचंचं कोरीव  सैनिक दल राखीव.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

पळस ✍️

Image
!!पळस!! कुठंहीजा कसं पहा  पानं पळसाला तीन  बहर पळसा आला  फुलं पडता रंगीन . रंग फुलांचे भारीच  गुल केसरी सारीच  पानं त्यांचीही हिरवी  मोठी गोलाकार हिच . रान भासते सुंदर  बोडकी दिसता सारी  पाहुन सौदर्य पळसा  कृष्ण वाजवी मुरारी. चाहूलहि आनंदाची  होळीत उधडण्याची  रंगात रंगु पंचमी  वेळ हिच खेळण्याची. किमया सारी वृक्षाची  दाखवते रंग सारी  जसा शालू भरजरी  सूर्य किरणांची सरी. तणक अंग सारेच  काळे राखाडी सगळे  खपली येते वृक्ष्याला  औषधं त्यात वेगळे.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव.

वन्य जीव जीवन ✍️

Image
!!वन्य जीव जीवन!! वाघ सिहं हत्ती घोडा  सर्प सरडा हरणी  अधिवास रानिवनी  खाद्य शिकार करुनी. जीव जीवश्य जीवन  गीता सांगे सारा सार  दृष्टी पडे वारंवार  जगता  करतं वार. शांत संयमी दिसते  मन पाहुन ठसते  कधी क्रूरता भासते  कुठं मोहक भावते. आली टप्प्यात शिकार  होतो त्यावर प्रहार  वरून टिपते घार  चोफेर दिसता वार. बळी तोचि जगी जीव  कोणा नसे त्यांची कीव  कळपात साथ देतं  सांभाळ कार्य भरीव. जीव लावता जातींचे  मार दुसऱ्या प्रजाती  खेळ जीवन सुंदर  वृक्ष आकाशी भिडती. प्राणी पशुपक्षी रक्षी  एकमेकांना सारीच  मारी दुसऱ्याला तीच  जगणं त्यांच भारीच.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

जागतिक वन्य दिन ✍️

Image
!!जागतिक वन्यजीव दिन!! सृष्टी चक्रात खूपच  सुष्म मोठाली लहान  वन्य असतात जीव  कार्य त्यांचही भरीव. जगतात तीच भारी  प्राणी असता करारी  दुनिया त्यांची निराळी  पक्षी घेतात भरारी. जाती प्रजाती अंनत  वाटतात काही संत  जगी वृक्ष्यावर काही  शांत संयमी महंत. क्रूर शिकारीही प्राणी  गुंजे त्यांची डरकाळी  शिकारी सोडता गोळी  जीव असता भोळी. वाचली पाहिजे जीव  राहती सारी सजीव  करू त्यांचीचं कीव  कार्य असावं भरीव. संरक्षण त्यांचं करू  लुप्तप्राय वन्यजीव  व्हायला नको म्हणून  सुरु दिन वन्यजीव.©️®️   प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव.

राष्ट्रीय पुत्र दिन.

Image
!! राष्ट्रीय पुत्र दिवस.!! ( 4 मार्च ) जन्म देतात मुलांना  माता सांभाळते त्यांना  बाळ आवडे सर्वांना  आनंद लाभ जीवांना . माता पिता जन्मदाते  पुत्राचे भाग्यविधाते  असतात तेच दाते  ईतर सारी चाहते. नीट भारी शिकवण  संस्काराने भरी मन  देतं बाळाला शिक्षण  अंतरात आठवण. संगोपन जोपासना  व्हावी साऱ्यांची उत्तम  दिवस अंगीकारला  ठेवा असे कार्यक्रम. पुत्र आणि पालकांचा  व्हावा येथेच सन्मान  जोपासत नातीगोती  माणसांना मानपान.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055