शेतकरी मारायचं धोरण ✍️
शेतकरी मारायचं धोरण अन पुढारी व्यापाऱ्यांच्या घरी तोरण. आज आपणास शेतकरी यांना मिळणारे बी बियाणे खतं, आणि कीटकनाशक औषधं यात होणारी भेसळ आणि भरमसाठ वाढीव किंमत करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक होताना दिसते. जनतेला लागणारे जीवन जगण्या साठी ज्यास जनता अन्नदाता म्हणतात तो महत्वाचा घटक शेतकरी. अन्नदाता व्यापारी वर्गाकडून लुटला जातोय सरकार धोरण त्यास लुटीसाठी खतपाणी घालून अजून लुटा असा संदेश देतं असते असं वाटतं आणि आपली तुंबडी व्यापारी सोबत भरत असली पाहिजेत. पूर्वी शेती उत्पादन कमी होतं. एका दाण्याचे शंभर दाणे पिकायचे. तेव्हा शेतकऱ्यांना किंमत होती. व्यापारी आणि सरकार तेव्हा पण शेतकऱ्यांना लुटायचे. लोकांना खाण्यासाठी अन्न कमी पडायचं. म्हणून शेतकऱ्या कडून सरकार लेव्ही धोरण राबवत. जबरदस्तीने धान्य वसूल करतं असे आणि गरीब जनतेला वाटतं असे. शेतीवर अवलंबून सरकार आणि व्यापारी जनता होती. एक एक दाणा पिकवण्या साठी शेतकरी झटत होता. तो पिकवलेला दाण्यासाठी शेतकरी कडून फुकट किंवा कमी किमतीत कसा मिळेल असं सरकार अन व्यापारी बघतं होता. नव्हे लुटत होता. तत कालीन सरकार लुटत होते. अगदी त्याहून जास्त प...