चित्रकाव्य.
सौदर्यवती. काय सुंदर दृश्य! सृष्टीचं रहस्य! चेहऱ्यावर हास्य! रुपमती!!1 बसलीय तीच! झरा तो निर्मळ! वारा सळसळ! ती सोज्वळ!!2 हाती कंकण ते! गळ्यात कानात! हास्य ओठात!सोनपरी !!3 छान अदाकारी! सुंदर हि परी! दिसते लाजरी! दृश्य भारी!!4 माळून गजरा! कपाळी शोभला! नावाने लावला! सोभाग्यती!!5 सोनेरी किरण! आकाश तोरण! चोरलंय मनं! सर्वांचेचं!!6 अदा तिची भारी! दृष्टी सदाचारी! रानात ती जरी! भासे संत!!7 देतेय सन्मान! डोळे खाली तिचे! नको वार यांचे! बघतांना!!8 सौदंर्य ते अफाट! रानात तो थाट! सुदंर पहाट! जंगलात!!9 तळ्याकाठी असे ! बघतचं बसे! दृश्य तेचि दिसें ! प्रदीपला!!10 लिहतोय सारे ! मनातले भाव! चुके जरी राव! क्षमस्वव्हा !!11 प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव 9922239055