" समाधान " चित्त मन समाधानी असलं की समाधान जीवाला मिळतं. अज्ञानामुळे आपले मन विनाकारण दु:खात इकडे तिकडे भटकत राहते. कारण आपल्याला आपले खरे गंतव्य माहित नसते.कुठं पर्यंत आपला थांबा आहे.तर परम त्या सुखाचा उगम आपल्यातच असतो. म्हणून आनंद आणि समाधानासाठी. आपल्या अविनाशी अस्तित्वाला. म्हणजे स्वतःला ओळखा.स्वतःला ओळखलं पाहिजे माणसाने.तेच आपल्याला ओळखता येतं नाही. पहिले आपण कोण आहोत. काय करतोय, कसं जगतोय, कसं वागतोय, चार लोकं काय म्हणतं असतील. अशी अंनत प्रश्न घेऊन आपण जगत असतो. तेच प्रश्न मनात ठेवून.जगत असतो समाजात वावरत असतो. पण अंतरंगात समाधान हवं. म्हणून त्या साठी शुद्ध शांत मन ठेवतं. भगवंताचे नामस्मरण घेतलं तेच मोक्षाचे साधन आहे.पण आपण करतो का तर त्याचं उत्तर नाही? अन संसार रुपी आयुष्यात गुरफटलेला आपला जीव. असं ध्यान लावु शकतं नाही. ध्यानस्त असणं म्हणजे स्वतःचे शाश्वत रूप विसरणे हेच दु:खाचे मूळ आहे. पण आपण तसं करू शकतं नाही म्हणून दुःख घालवण्याचं साधन आपलं ते समाधान. संपूर्ण दृश्य जग हे सतत बदलत असते, सांसारिक सुख क्षणिक असते. वस्तू, प्राणी, निर्जीव आणि सजीव सर्व काही क्षणोक्षणी ...