वारी पंढरीची ✍️
!!वारी पंढरीची!! जात धर्म पंथ ! कीर्तनात संत! वर आसमंत ! चालतांना !! देवा तुझ्या दारी! येतं वारकरी! भजन ते करी ! वाटेवरी!! टाळ वीणा संग! नामात हो दंग! भरत ते रंग ! वाटेवरी !! देव भेट घडो ! आध्यात्म हो कळो! भाव भक्ती मिळो! सकलासी!! आस भेटी देवा ! विठ्ठल हो ठेवा! हृदयात तो हवा ! नामघेता!! सर्वा तीच आस! भेटू विठ्ठलास सोडतं घरास ! वारीसाठी!! साथ देत सारी ! भजन कीर्तन! एकीत वर्तन ! रिंगणात!! पाऊल पडतं ! दर्शन घडतं! पुण्य हो मिळतं! वारकऱ्या!! मुखी नाम घोष! एकच हो ध्यास! भेटू विठ्ठलास! पंढरीत!! अभंग सांगे हो! प्रदीप लिहून! विठ्ठला वाहून! चरणाशी!!©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता.चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055