मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पुढे काय? दर्जा मिळाला मराठीला अभिजात भाषेचा. भारत सरकार ने भारतात अन्य भाषेच्या सोबत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा घोषित केला. अभिजात भाषा दर्जा हा जुनी प्राचीन बोली भाषा यांना मिळतो तोच भाषा दर्जा मराठीला मिळाला.मराठी अजून समृद्ध होण्यासाठी मराठी भाषेतील ग्रंन्थ सामुग्री मध्ये अजून वाढ व्हावी भाषा अजून समृद्ध व्हावी या साठी हा दर्जा देऊन भाषेचा गौरव केला जातो. हा भाव सरकारला अभिप्रेत आहे. मराठी भाषेतील आज पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झालेत. या पुढे निर्माण होण्यासाठी लेखक, कवी, साहित्यिक, कलावन्त, संत कीर्तनकार, व्याख्याते ई.यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार फक्त घोषणा करते. अंगीकार प्रचार प्रसार हा लोकांनी करायचा असतो. जनतेचे आपल्या भाषेची बोली अन ग्रंथ सामुग्री मध्ये वाढ व्हावी त्या साठी. लेखक कवी साहित्यिक यांना योग्य मान सन्मान प्रोसाहन देऊन त्यांच्याकडून भाषा समृद्ध करण्या साठी अधिक अधिक वाचनीय शास्रशुद्ध अचूक लिखाण कसं होईल त्या विषयी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लिहणारे खुप आहेत पण कामाचा व्यापात लिहणं राहुन जातं. कामं करतं असता...