माय माऊली ✍️
!!माय माऊली!! देवी माझी आई माझी उचलत पोटात भार दिला तिने आकार कळला जीवनाचा सार. पोटातून काढलं बाहेर तोडली तिने नाड वाढवण्या प्रदीप बाळ सोसत स्वतः कळ. केली माझी वाढ झटली रातदिन पार सोडतं दुग्ध धार धरत मायेचा पदर. तिचा अंश पृथ्वीवर भरलं रक्तातुन उदर रुजवला संस्कार अंगभर ऋण तिचं जीवना वर . काळजी तिला फार जगवण्या आपलं पोर वडिलांच्या सोबतीने संसार दोघांचं प्रेम फार. घास दिला मायेचा हात आधार आईचा स्वास माय माऊलीचा लेक मालु आईचा. प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055