Posts

Showing posts from January 3, 2021

देवा तूझ्या वाटेवर ✍️

Image
| |  देवा तूझ्या वाटेवर | | देवा तूझ्या वाटेवर  चाललो भक्ती मार्गानं   नाम घेत  मुखी  चाललो भक्ती  वाटेनं  सेवा करतं आईबाबांची  शक्ती मिळते नामाची  कीर्ती जगी कुटूंबाची  किंमत त्याच घराची.  स्वछता दारी वृदावनाची  पूजा करतोय मनाची   संगत संत संगाची  जोड सदा सद्विचाराची.  अगाध शक्ती नामाची  तीच वाट जीवनाची  सत्य कास मानवाची  फळे गोड कष्टाची.  कलियुगी लबाड भारी  भ्रष्ट भ्रष्टाचार अंगिकारी  मौज मस्तीत सारी  खरं उपाशी मरी.  देवच त्यास तारी  नामात  तीच भुवरी  फिरताय चक्र सारी  उरतील फक्त नामकरी.  संपतोय काळ आता  येणार जीव पूजकांचा   सुकाळ देव पुरुषांचा  धनी तोच देव वाटेचा.  प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव  ©️®️

प्रेम तूझ्या वाटेवर

Image
| | प्रेम तूझ्या वाटेवर | | वाट तुझी महालाची  सुंदर ऐश्वर्यात  जगण्याची  राहणी भौतिक सुखाची  तऱ्हा मन मौजेची.  बिनधास्त मस्त वागण्याची  दृष्टीत  तूझ्या पडलो   मनात सहज जडलो  पाहून मीही भाळलो.  तरी त्यातून सावरलो  मनानं मागे वळलो  कुटूंबात मनात भरलो  वाटेवरून तूझ्या फिरलो..  अवघड वाट तुझी  कशी जमेल दोस्ती  संपेल कीर्ती माझी  नसावी अशी मस्ती.  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

सत्य तूझ्या वाटेवर

Image
| |  सत्य तूझ्या वाटेवर | | सत्य तूझ्या वाटेवर  यातना खुप देही  अड्थडे भरली ठायीठायी  बाण सतत हृदयी.  कस लागतो सोन्याला  आग सोसणं त्याला  पूर्ण वितळणं जीवाला  आगीतुन मिळणं पाण्याला.  मूर्त रूप त्याला  आकार साकार पूर्णत्वाला  झळाळी येते सत्याला  खरदू पाहतात त्याला.  अमूल्य सत्य वाट  कळतं भ्रष्ट दृष्टला  कितीही त्रास दिला  किंमत कीर्ती याला.  शेवटी अंतिम विजय  यश साम्राज्य सत्याला   कवडीमोल किंमत असत्याला  शोभिवंन्त भासतो दुनियेला.  वाट अवघड सत्याची  भुतली किंमत खनिजाची  वाटतं सोनं शोभिवंन्त  तरी किंमत त्याची.  नका सोडू वाट  तीच नवं पहाट  बनतं सत्य सम्राट  बाकी साठी मृत्युघाट. प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©️®️

स्वामी विवेकानंद ✍️

Image
| | स्वामी विवेकानंद | | विषय :- स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला युवक.    स्वामी विवेकानंद नुसतं नाव घेतलं कि एक हसमुख तेजपुंज युवक डोळ्या समोर व्यक्तिमत्व   तरळुन जातं. स्वतः सौन्दर्यवान असुन सुद्धा कधी त्या सौन्दर्य बद्धल अभिमान. गर्व न करता युवक कसा असावा तर स्वामी  विवेकानंद सारखा साऱ्या पृथ्वीतला तील जनतेला वाटावा  असा आदर्श पुरुष. ऐकोनिसाव्या शतकातील आदर्श युवक म्हणून स्वतः त्यांची गणना होते सामाजिक आध्यात्मिक  अगाध ज्ञान असलेलं गुरु प्रिय  व्यक्तिमत्व. वक्तृत्त्व  गोड वाणी तुन साऱ्या दुनियेला वेड लावले . हे झाले त्यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगण्या सारखं खुप आहे पण थाबतो.       आपला मुळ विषय कडे वळतो स्वामी यांना अभिप्रेत युवक  देश धर्म बद्धल आदर असलेला स्वधर्म पाळून ईतर धर्माचा आदर करणार असावा  सर्वधर्माच्या अन जगातील सर्व  महिलांना आई बहिणीचा दर्जा देणार  कुठंही स्त्री ला वाईट वासनेच्या नजरेत पाहणारा नसावा. त्यांच्या शिकागो येथील भाषणात प्रथमच त्यांनी विश्वा समोर इंग्रजी तुन सर्व बस...

कोरोना

Image
| | कोरोना | | व्हायरस आहे कोरोना  हवेत खोकल्याने पसरतोना  गळा मानवाचा पकडतोना  मृत्यू ओढवतो ना....   रडायचं नाही आपल्यालाना  तोंड दयायचं संकटांना  भारताची गरीब जनता  धीर आधार देऊ त्यांना...  रोज करता कष्ट  भाकरी मिळते त्यांना  उपासमार होईल बिचाऱ्यांना  आपल्यातुन मद्त देऊ त्यांना...  महामारी घोंगावतेय जगतांना  माणसं नाही पाहायची मरतांना  पराकाष्टा करतांना पाहतोय डॉक्टरांना   शास्रन्य पाहुं विषाणू मारतांना....  आता काळजी घेऊ सारे  वाहतील पुन्हा छान वारे  आपण जगु दुसऱ्यांना जगवु  सामना घरातुन करू रे.... प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

प्रेम गीत ✍️

Image
| | प्रेम गीत | | हृदयात तुझाच  गंध तुझा लागला छंद  नेट असतं बंद  धडधड होते मंद. सुगंध भिनला अंगात  पेटली प्रेमाची वात  विसरणार नाही हयात  मिळूदे अशीच साथ. राहतोय असाच रानात  धरली अशी आडवाट  तु तर शहरात  चढून येईल घाट. बहर आला जीवनात  जीव रंगला सजनात  किलबिल पक्षांची जंगलात  ध्यानस्त वाटतो लोकांत. विचार तुझेच मनात  बोल गुंजतात कानात  शब्द अपूर्ण ओठात  लाभुदे अशीच  साथ. ©️®️  प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा 

पाऊस ✍️

Image
| | पाऊस | | गर्दी केली ढगांनी  कडकडाट केला विजांनी  चक्र फिरवलं वाऱ्यांनी  सळसळाट केला वृक्षांनी....  तिफण  धरली शेतकऱ्यांनी किलकिलाट केला  पाखरांनी सूचना दिली त्यांनी  सुरक्षितता  अंगिकारली सार्यांनी... गधं सुटला आल्हाद  पसरला धर्तीचा सुवास  बीजांना लागला ध्यास  लागली उत्सुकता अंकुरण्यास....  पावसाची किमया  भारी  साऱ्यांना देते उभारी  आस नवनिर्माण सर्वांना   जीवसृष्टी खुलली सारी....  प्रदीप पाटील  गणपूर (जळगाव ) ©®

हात तुझा हाती असावा ✍️

Image
प्रेमकविता  💞 | | हात तुझा हाती असावा | | हात तुझा हाती असावा  सुख दुःखाचा साथी वाटावा  घेऊन सप्तपदी सर्वा समोर  प्रेम बहर असा फुलावा.  राधा कृष्ण सखी नंन्तर  पुढे डंका आपलाच वाजावा  एकरूप जीव असा व्हावा  एकाच ठेचं दुसरा रडावा.  हास्य ऐकास आलं तर  दुसरा प्रसन्न चित्ती खुलावा  शंका कुशंका कधी मनीं  स्पर्श जीवात न जाणवावा.  जन्मो जन्मी आपलीच कीर्ती  प्रेम ग्रंथ लिहला जावा  कथा कीर्तनात कधी तमाशात  पोवाडा आपलाच सादर व्हावा. बागेत आपलाच आणाभाका घ्यावा  नामवंन्त मन  श्रीमंत असा  गधं प्रेम  चौखूर  उधळावा  कधी तीळ  वाटून खावा. बंध आपुला कधी न सूटावा  नीती मानसंन्मान प्रेमात असावा  अंत समई पर्यंत जिव्हाळा  विश्वास अविरत मनीं उरावा. प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©®

चित्र काव्य ✍️

Image
| | चित्र काव्य | | निसर्गाची किमया भारी  एकीकडे हिरवळ सारी  बर्फावर उन्हाची तिरीप  वाऱ्याची त्यावर स्वारी.  सांज खुलली बर्फावर  नजर खिळली हिरवळीवर  बाष्प उधळलं दरीवर  स्वर्ग अवतार  पृथ्वीवर. प्रसन्न भाव मनावर  घेऊ त्यातून सार  जगु आनंदी दिवसभर  अंगीकार करू जीवनभर.  जोपासू सृष्टी सारी  तीच आपल्याला तारी  निसर्ग मानव  कल्याणकारी  जीव जगतोय भुवरी. प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

अबोला

Image
| | अबोला | | सखी सोड अबोला  जीव झालाय अर्धमेला  चूक समजली मला  विसरू शकत नाही तुला …   आहे जरी गाववाला  प्यालोय तुझा प्रेमप्याला  तूझ्या येण्याने  रंग  भरला या जीवनाला …   प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

काव्य ✍️

Image
| | काव्य | | राज्या ची तु राणी ग  दिसते कशी शोभुनी गं....  गडावरी आली  नववारी नेसुनी  उभी दरवाजा धरुनी  साद घातली त्यावरूनि  ध्वनी घुमला कड्याकपारीतुनी...  आस लागली धन्याची  येईल सजना चढुनी  पाहंते  काळ्या चष्म्यातुनी  वाट पाहे  दुरुनी....  केस मोकळे सोडुनी सूर्य आला प्रकाशुनी  चकाकली त्वचा त्यातुनी  लावंण्या दिसल  खुलूनी.....  दुरुनी ठसली मनी  पाहुनी  मन भुललं  सांगितलं  मनाला समजावुनी  आहरे राज्याची ती राणी.....  वाग अंतर ठेवुनी   टोपी जाईल पडुनी  जाईल ती निघुनी  टाक मनातून काढुनी.....  जखम वाहील भडभडुनी  व्रण राहतील पडुनी  नको पाहुं वळूनी  पाणी येईल  डोळ्यातूनी.....  वाट तुझी  रानातूनी  घेते  विसावा महालातुनी  पुन्हा चटका बसुनी अंतरंग जाईल भाजुनी....  ती जाईल विसरुनी  कशी निघेल मनातुनी  हळवं नको होऊस  फिटेल तुझी हाऊस....  प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव...

कोरोना एक आपत्ती

Image
| | कोरोना एक आपत्ती | | जन्म विषाणूंचा घाणीत  प्रसार होतो द्विगुणित  कोरोना निर्माण चीनभूमीत  संसर्गाने पसरला  अगणित....  आपत्ती निर्माण झाली   माणसं मृत्युमुखी पडूलागली  आजाराची भयानकता वाढली  मानवजात  संकटात  आली...  पृथ्वी केली प्रादाक्रान्त  तर येईल संक्रांत  सोडा सार्यांनी भ्रांत  दिसेल साऱ्यांना आसमंत....  जपु स्वच्छता  मंत्र  अंतर हेच   तंत्र  मास्क वापरु स्वतंत्र  घरात राहु निवांत....  काळजी आदेश पालन  देशाचं स्वाभिमान चलन  करू  याच निर्मूलन  आपत्ती आली चालून...  प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

कर्तव्याची दोरी ✍️

Image
| | कर्तव्याची दोरी | | आयुष्य एक शिदोरी   कर्तव्याची असते सांजोरी  गोड असावी  पुरी  नको कुणावर शिरजोरी....  नको त्यात चमचेगिरी  स्व कष्टाची भाकरी  कुटुंब गोड करी  अभिमान त्यात उरी...  समाजाची करावी चाकरी  सत्याची कास धरी  जातीभेद दुर करी  जग कल्याणी अवतारी...  जीव सुख पाही  भुकेल्या अन्न देई  कुटुंब छान ठेवी  कर्तव्य बजवी  देही...  शिल्पात कीर्ती उरी  मनामनात राज करी  बळकट निरोगी दोरी  प्राणीमात्रात राज्य  शिदोरी... प्रदीप मनोहर पाटील  मु. पोस्ट गणपूर  ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

रंगात रंगू या

| | रंगात रंगू या | | (रंग जीवनाचे ) रंगात रंगू जीवनाच्या  आयुष्याचा  खेळ रंगीत  आवडतं त्यात संगीत  तारुण्यात जुळते प्रीत... बालपण जात सवंगळीत  लहानथोरांचे ज्ञान घेण्यात संस्कार अंगीकार जोपासण्यात  बुद्धी उंची वाढते त्यात...  तारुण्य घालवतो कर्तृत्वात  लोकांचे बहुरंग समजण्यात  कुठं घात विश्वासात  जुळत त्यात नातं...  तारुण्याचं फळ वार्धक्यात  आरामात सुंदर जगण्यात  वेळ जातो कापण्यात  पेरलं ते सोसण्यात... वाट सारी चढउतारात  प्रेमात रडत पळत  वाजत गाजत नाचत  कुढंत मरत जगत....   खेळ रंगी  जीवनाचा  ऊन सावल्याचा वाऱ्याचा  उडण्याचा दम गुटण्याचा  एकांताचा गर्दीत वाहण्याचा... आयकण्याचा कर्तृत्वाचा पराक्रमाचा  नात्याचा  जोडण्याचा भावनांचा  मायेचा ममतेचा सागराचा  जीवन झरा रंगीत  पाण्याचा... प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®