भ्रष्टाचार ✍️
!! भ्रष्टाचार!! सर्वीकडे होतोय खुप भ्रष्टाचार पैश्या वर चाले सारा कारभार रुपया झालाय जगण्याचा सार शेतकऱ्यांना बसतोय सारा मार लाच घेता बरीच जण टेबलावर लाज टाकून फिरता गाव भर नोकरी वर ज्यांचा अंकुश हवा तेच नेते पापी दृष्ट देतात हवा रस्ते, पूल, सार्वजनिक कामं सारी निकृष्ट करतात भ्रष्टाचारी कारभारी टाळूवरचं लोणी खाता सेवक म्हणता तिजोरी स्वतःची सारी पैश्याची भरता लाज लज्या शरम सोडुन सारं कर्म वरून म्हणतात हा तर कलीयुगी धर्म खोट्याचा बोलबाला सत्यवादी मेला खोटारडा नेता मंत्री राजा झाला साम दाम दंड भेद वापरत जाता नेते म्हणून गावभर कारभार करता प्रदिप पाटील गणपूर जिल्हा जळगाव मो. 9922239055