Posts

Showing posts from May 25, 2025

जागतिक पालक दिवस 1 जुन ✍️

Image
!! जागतिक पालक दिवस!! जीव जन्म हे देतात  संगोपन करतात त्यांच साठी झटतात  काळजी तेच घेतात. संस्कार ते शिकवण  बालपण तरुणपण शिक्षण सारं देतात जगण्याची जाणपण. देतात तेच पालक असती तीच मालक रक्त आठवून सारं खर्च पुंजी ते शिल्लक. जीवनात तो संघर्ष  सारं ते मुलांच्या साठी आदर्श ते शिकवण  देतात धपाटे पाठी. पाटी दप्त्तर ते शाळा हा जगण्याचा सोहळा दावत जीवन मळा लावतात तेच लळा.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

यात्रा ✍️

Image
!! यात्रा!! यात्रा ती भरते! आनंद मनात !! देव देवळात! पूजतात!! कुल देवी यात्रा! गावात सोहळा  ओढतात गाडा! आनंदात!! पाळना चक्कर! खेळतात मुलं! वाहतात फुलं! गावदेवी!! हवशी नवशी! मजेत जत्रेत! खेळत मैत्रीत! सारागाव!! वाजंत्री ढोलकी! मौतका तो कुवा! मंदिरात बुवा! पूजेसाठी!! कुस्ती मस्ती खेळ! खाण्यास ती भेळ! बसवतं मेळ! आनंदाचा!! छोटी मोठी सारी! देव देव करी ! साडी चोळी भारी! गावदेवी!! तमाशाचा फड! चर्चा गावभर! प्रबोधन सार! रंगमंच!! हसत खेळत! आनंद उधळे! जागृत सगळे! सोहळ्यात!! खरेदी ते करी! वस्तूंची वर्ष्याची  यात्रा ती हर्षाची! परिसरा!! शर्यत रंगात ! आनंदी चेहरे! जिंकत मोहरे! पैजेतहि!! प्रदीप मनोहर पाटील  गणपूर चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

चित्र काव्य ✍️

Image
!!चित्र काव्य!! साधी राहणी उच्च विचार सरणी   लोकं होती पूर्वी धोरणी  दाखवतं आपल्या कार्यातूनी  करतं जागृती सर्व समाजातूनी. देश आपला होता गरीब  अन्न वस्र निवारा मिळावा सर्व जनतेला आपल्या चालवत चरखा संदेश कळावा. स्वदेशी वापरा विदेशी घालवा  वस्र कमी नेसत स्वतः  कापुस कातून खादी देतं  सत्य अहिंसा मार्ग दाखविता. बापु झाले राष्ट्र पिता  झोपडीत राही  नेता  झाले गरिबांचे दाता सर्वा सनमती दे पुरस्कर्ता.  रघुपती राघव राजाराम  पतीत पावन सीता राम गाळत चरख्यावर घाम नियमित करतं स्वतः काम.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

निसर्ग अभंग ✍️

Image
!!निसर्ग!! स्वर्ग चं धरती ! हिरवळ सारी! सृष्टी जीव भारी! निसर्गात!! चल ते अचल ! वागत निर्मळ!  वाटता प्रेमळ ! जगण्यात !! निर्मिती मातीत ! पंचतत्व सार! उचलत भार ! सजीवांचा!! झुडुप ते वृक्ष ! रोप ते कणीस!  खडा गोफणीस! राखतांना!! फळ तेच बीज! गोड कडु चव! खातात ती भाव! फळं बिया!! सुष्म जीव कार्य! पंचतत्व त्यात! माती जल यात!जीव सृष्टी!! ऊन वारा पाणी! पक्षी गाता गाणी! राज्य करे राणी! जीवनात!! मध चाखे भुंगा! ते फुलपाखरू! आनंदी लेकरू! सानिध्यात!! फुलवे श्रीरंग ! लिहतो अभंग! प्रदीप त्या संग! निसर्गाच्या!! प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922238055

निसर्ग ✍️

Image
!!निसर्ग!! धरती वरील स्वर्ग  खुललाय हिरवळी  गधं फुलं दरवळी  पराग ती गोळा करी. आयुर्वेद जीव सार  जीवन उचले भार  चल जीव तो संसार निसर्गास मिळे मार. सृष्टी तत्व जागी सत्व किमयाचं त्याची भारी  रंग छटा सप्तरंगी  तोच तारी कधी मारी. चल अचल ती जीव  सारी असती सजीव मानव हा प्राणी त्यात बनवी जीव तो निर्जीव.  ढवळतो चक्र सारे प्रदूषित सारे वारे केमिकल ती मिसळे  उधोग धंदे तो करे. सुंदर तोची निसर्ग  नका करू हो भकास  धरू जपण्याची कास  करू धरणी विकास.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

माठ ✍️

Image
!!माठ!! गाळ माती बारीक  खत त्यात कालवून  चिखल सारा गोळा  मिश्रन कुजवत ठेवून. कुंभार घडवे माठ   स्वयंपाक घरात थाट  पाणी शुद्ध भरमसाट  नैसर्गिक फिल्टर माठ. थंड त्यात पाणी  पचायला असतं बहगुणी  साऱ्या ऋतूत चाले  माठातील गार पाणी. पिण्यानं मन भरे शुद्ध जल मिळे तत्व सारं नैसर्गिक उन्हात किंमत कळे.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

महाराष्ट्र माझा ✍️

Image
!!महाराष्ट्र माझा!! सातपुडा ते सह्याद्री  सुंदर कड्याकपारी  डोंगर दर्या भारी  माणसं एकीत सारी. व्यथा मुबंई दरबारी  मंत्रालयात आहे भारी  व्यवसाय त्यात सारी  श्रीमंत असे नगरी. रामायण महाभारत उल्लेख  खान्देश खांडव वन  राम कृष्णा यांच्या  पावलाने धरती पावन. कृष्णा कोयना गोदावरी  तापी पांझरा अनेर जलधारी  शिवराय अवतार शिवनेरी  संत अभंग गाथा भारी. मराठी बोली महाराष्ट्र भु वरी  व्हराडी  अहिराणी कोकणी  बोलती त्यात सारी  बारा बलुतेदारी बोली गाणी . संत ग्रन्थ महाराष्ट्रात  जेव्हा देश संकटात  महाराष्ट्र बाणा ताट  देशाला दाखवे वाट. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

नात्यातील वीण ✍️

Image
!! नात्यातील वीण!! घट्ट असते  डोळ्यात सारं साठते  हृदयात बसते  सदासर्वदा  मन जुळवते  अर्पण खुशीत करते  मनात भरते  सदैव  नात्यात कळवळ  मनानं असे निर्मळ  वागणं प्रेमळ  सोज्वळ  मनात जिव्हाळा जमत सारा गोतावळा भरत सोहळा नात्याचा वीण घट्ट काही असती निगरगट्ट नातं कट करतात मान सन्मान नात्याचा असे अभिमान तीच शान सर्वांची प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

काव्यातून सुनयना चा परिचय ✍️

Image
!!सुनयना !! नाव माझं सुनयना  गाव उपखेड आहेना  मगर माझं कुळ  करंदीकर यांची नयना. शिक्षण नासिक सिन्नर  प्रदीप मिळाला वर  सोबत आली गणपूर  सासर माझं जीवनभर. प्रसिद्ध लेखक कवी  त्यांची पत्नी मी  सांभाळते संसार गृहिणी रमलो सुखात आम्ही. परिचय अल्प दिला लिहला जरा साजेसा पहिली रचना आज करतेय परिचय थोडासा. (सुनयना प्रदीप  पाटील) गणपूर ता. चोपडा  जळगाव.

कृषी सेवा केंद्र की शेतकरी लूट केंद्र. ✍️

Image
!!कृषी सेवा केंद्र की शेतकरी लूट केंद्र.!! सेवा नाही लूट करायला परवानगी असलेलं ठिकाण. म्हणजे कृषी सेवा केंद्र असंच वाटतं. आज कापुस बियाणं घेण्यासाठी गेलो असता. कापुस बियाणं एक 450ग्रॅम. म्हणजे सुमारे अर्धा किलो पेक्षा कमी असलेली बियाणे पिशवी. हि एका पिशवी चीं किंमत आज नुऊशे( 900) रुपये किमतीला मिळाली. मागील वर्ष्या पर्यत 750 रुपये पर्यंत मिळतं असलेली थैली आता 900 रुपयात विकली जातेय. मी दुकानदार यांना सांगितलं की शेजारच्या जिल्यात आठशे पन्नास रुपयात कुठलं पण वाण घ्या 850 रुपये किंमत आहे. जळगाव जिल्यात पन्नास रुपये जास्त का? तर त्यांच म्हणणं होतं आमची काल जिल्यात मिटिंग झाली.बियाणं कंपनी चीं. कोणीही 900 रुपये किंमत पेक्षा कमी किमतीत बियाणे विकायचं नाही. जो दुकानदार ठरलेल्या किंमत पेक्षा कमी किमतीत विकेल त्याच्यावर कंपनी कडक कार्यवाही करेल. याचा अर्थ लुटा जास्तीत जास्त किंमत घ्या पण कमी किंमत मध्ये कोणता दुकानदार कमी भावात विकेल ते चालणार नाही. हि कुठली नीतिमत्ता आली बियाणं कंपनी मालकांची . जास्त वसूल करा पण कमी पैसे घेतले तर चालणार नाही. हा तर आमच्या कडील शेतकरी भाषेत शुद्ध हरामखोर प...

स्वपरिचय ✍️काव्यातून

Image
!! स्वपरिचय!! महात्मा गांधी पुण्यतिथी  तीच  जन्म  मिती  महात्मा गेला दुसरा आला  काही लोकं सांगती.  वडील आजोबा गुरुजी आई आजोबा प्रति सानेगुरुजी कुळवंत घराणं करंदीकर तेच संस्कार  अतरंगी रुजी. गावची पाटीलकी भावकीत पदवी चालवली साजेशी न्याय नीती पाठीशी गावचा ठेवा दुरदेशी. कवी लेखक पत्रकार विविध संस्थेत कारभार  जगण्यात मिळाला मार शांत संयम जीवन सार. पुरस्कार मिळालेत खुप  देखणं थोडं रूप  छापून येतं लेखन वर्तमानपत्र  अंक  खुप. प्रदीप मनोहर पाटील गणपूर तालुका चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055