Posts

Showing posts from June 29, 2025

राजा पंढरीचा ✍️

Image
!!राजा पंढरीचा!! भक्त हो भक्तीत! दाखवतं शक्ति! थोडी हो विरक्ती ! संसाराची! राज दरबारी! गजर नामाचा! खेळ आनंदाचा! स्मरणात!! सुख शांती मिळो! सेवा त्याची घडो! समृद्धी हो वाढो! नामातून!! ध्यास आस तीच ! कृपाळु मनाची! जनता हो त्याची! वारकरी!!  टाळ वीणा ओवी ! अभंग गातात!  चालत जातात ! वाटेवरी!!   सोहळा देखणा ! चंद्रभागे तीरी! उभा तो मंदिरी! पंढरीत!! देत हो दर्शन ! सोडवे त्या व्यथा! सांगु काय कथा! विठ्ठलाच्या!! राजा करे सुखी! नाम मुखी सदा! भोळे कृष्ण राधा ! दरबार!! लक्षात ठेवतं ! भक्ती मानवाची! कथा हो मनाची! प्रदिपची!!©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

कृषी दिवस ✍️

!! कृषी दिवस!! बळी दयायचा म्हणून हालाला करू पहिले काढु गळा हो मिळून आज पुष्प त्या वाहिले. सांगु तूझ्या साठी सारं तुझा ऊचलतो भार मग करूयात वार देऊन ठेवा हो धार. रोज देऊ त्यास मार  कसा करतो संसार मातीत गाडू बळीला पोटाला देऊया मार. नुसतं सांगु तु दाता तुझं खात आहे आता पोट भरलं आमचं मग देऊ तुला लाथा. ओरबाडा त्याला खुप माजलेत म्हणु साले शिव्या देऊ रोज त्याला नीच राजकारण वाले.©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

पहिला पाऊस क्र 2✍️

Image
!! पहिला पाऊस!!क्र 2 तप्त होती धरणी मशागत सारीचं करुनी  तुटून पडला पाऊस सोबत वादळ वारा वरुनी. धंगधगत्या ज्वाळावर पडु लागल्या जलधारा  लाही लाही झाली, गधं सुटला वाढवत पसारा. मिळु लागलं बिजास पाणी पक्षी गात गाणी अंकुर फुटू लागला हिरवळ दाटली मनी सृष्टी गेली मोहरुनी जीव गेला सुखाऊनी घुसळून निघालीत पंचतत्व जागवत सत्व सृष्टी निर्मिती यातून जलधार सत्व ऊन पाणी वारा माती घर्षण एक तत्व©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

पहिला पाऊस क्र 1✍️

Image
!!पहिला पाऊस!! क्र. 1 वारा सुटला सुसाट पडली ढगांशी गाठ   विजांचा झाला लखलखाट सारा वरती थाट ध्वनी गुंज कडकडाट जीवास घबराट खोप्यात साऱ्यांनी धरली आपली वाट  उधळी फुटली पंख मंदिरात वाजे शंख  जलधारेत भिजू लागले राजा आणि रंक नवं चैतंन्य आलं धरती बीज वाट वरती नदी नाले खळखळ करती धबधबे ओसंडून वाहती हलचाल झाली ढग सारी जलधारी भुवरी नवं निर्माण तयारी सुरवात खरी ब्रम्हांड सारं चक्र सृष्टी निर्मिती सत्र पाऊस हेच खरं जीव जन्म जीवन सूत्र. माता भु कक्षा ग्रह करता सुरक्षा ग्रहांची किमया सृष्टी जीव तत्व घाठता निर्माण कक्षा ©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता.चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

अवहेलना ✍️

Image
!!अवहेलना !! नका करू थट्टा, लावु नका बट्टा  कोण लावत जुगार, खेळतात सारी सट्टा तुमची लॉटरी नाही का वरळी मटका  दाखवता श्रीमंतीचा झटका  बेवडा पितो म्हणे खुप सारी दारू  स्वतः वाईन व्हिस्की रम पिता चुरूचुरू तुमची करते ते प्रेम, दुसऱ्याची सांगे लफडं स्वतःचा तो तरुण, दुसऱ्याचा तो डफडं स्वतः केलं शिष्टाचार दुसऱ्यानं केला तो भ्रष्टाचार आपण खाल्लं म्हणे तो पाहुणचार  साम दाम दंड सत्ता उभारी सारी कुनीती दुसरा करे तोच सांगे अरे अरे हि तर अनिती पाषाण काळीज याचं दुसऱ्याला सांगे मेलं का तुझं स्वतः समझे तत्वज्ञानी आयका सारं माझं. ©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा. जळगाव.

भक्त पुंडलिक ✍️

Image
!! भक्त पुडलिक!!  सेवा करी भक्त ! आई वडिलांची! भक्ती बघा त्यांची! जीवनात!! माता पिता देव ! भाव हाच ठेव! शिकवण राव ! तीच असे!! फेकली हो वीट! बोलून ते धीट! थांबा जरा नीट ! विटेवरी!! सेवा करतोय! निर्मित्यांची बघा! देतोय ना जागा ! चरणाशी!! प्रसन्न झाला हो! देव पांडुरंग! झाला तोही दंग! बघण्यात!! सदैव आठवे ! भक्तांना प्रसंग! सांगे तो श्रीरंग! कथे मध्ये!! बोध घेऊ आता! पुजु माता पिता!  येईल तो स्वतः! भेटायला!! गुण सांगायला ! लागतील लोकं! लाखात हो एक ! देवरूप!! हाच सांगे सार ! प्रदीप यातून! ह्या जीवनातून ! अभंगात!!©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

वारी अभंग ✍️

Image
!! वारी अभंग!! देव घरोघरी ! रोज पूजतात! वारीला जातात ! वारकरी!! गळ्यात तुळशी ! करून ती माळ! हातात चिपाळ ! मुखी नाम! विठ्ठल विठ्ठल ! सोबती ते दंग! भरतात रंग ! चालतांना !! हातात पताका ! गातात ते स्वता! टाळ वीणा घेता ! भजनात !! वाजत गाजत ! रमत गमत! होई एकमत ! रिंगणात!! पाहुन सोहळा ! भक्तीचा हा मेळा! होई तोहि वेडा! देवभोळा!! गजर सदैव ! माऊली माऊली! पडते सावली! सुखाचीच!! वाट हि वारीची ! पावसा पाण्यात! नाचून गाण्यात! आनंदात!! होतात तल्लीन ! भक्त गण सारी! प्रदीप तो भारी! सांगे कथा !!©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

वारी ✍️

Image
!!वारी!! पांडुरंग पांडुरंग  नाचत गाण्यात दंग  साऱ्यांचा हो एकरंग  धरतं ताल ते संग. चालतांना हो गजर  माऊली माऊली तो  पायी वारी वारकरी   भक्त सारी गात हो. मनात साऱ्यांचा भाव  विठ्ठल मलाचं पाव ठवतं शांत स्वभाव  दंग गाण्यात ते राव. प्रवास हो पायी पायी देवाला भेटण्या घाई सांगतं हो एकादशी  मंदिरात देव राही. व्रत वैकल्य ते करी सांगे स्वतः माळकरी  भजन कीर्तन गात वाट धरे वारकरी. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055