देवतारी कि आयुर्वेद ✍️
आयुर्वेद किं देवतारी आज मि सत्यावर आधारित माझ्या लहानपणीच्या निरीक्षनातून दिसलेलं चित्र मांडणार आहे. मी शाळेत शिकत असतांनाचा काळ साधारण 1980 ते 90 पर्यतचा. शाळेत जातायेतांना गावाबाहेर चौकात एक पिरबाबा चं ठाणं (असं म्हणतात पीर संत मृत झाल्यावर त्यांच्या नावानं बांधलेली समाधी तेथे लोकं पूजाअर्चना करतात त्याला पीर चं ठाण किंवा ठाणं म्हणतात.)होतं अजून पण आहे. तेथे एक निबांच झाडं आहे. त्या झाडाखाली दोन सख्खे भाऊ सिकंदर आणि सरदार असी त्यांची नावं. पिंजारी समाजाचे ग्रहस्थ. एक जमाना होता किं त्या दोघं भावांच्या वडिलांची आणि त्यांची गावालागत खुप जमीन होती.परिसरातील श्रीमंत व्यक्ती होते असं मी लोका कडून आयकत होतो. पण त्यांच्या रुबाबदार वागण्या मुळे संम्पत्ती ऱ्हास झाला अन भिकारी बनण्याची त्या दोघांवर पाळी आली. कुटुंबउध्वस्त झालं. शेतजमीन शून्य झाली अन रस्त्यावर येऊन दारोदारी भीक मागून लोकांनी दिलेल्या अन्नावर पोट भरायची वेळ आली. त्याच वेळी मला समजलं "पैसा आलं किं माजू नये" त्याच जीवन्त उदाहरण डोळ्या समोर दिसतं होतं. जुनी जाणकार लोकं सांगतात ते ख...