Posts

Showing posts from November 15, 2020

गोड पुरण पोळी ✍️

|| गोड पुरण पोळी || पुरणाची पोळी  खायची गोडी  खाणारी  भोळी  एकोप्यात सगळी. प्रथा  आगळी वेगळी  गोड  खाऊन सगळी  नाते जपत घट्ट  लहान थोर मंडळी. चुल पेटे घरात  आई जवळ परात  बाप जरी रानात   सुगंध पसरे परसात. पुरण भरून खापरावर  टाके त्यावर पोळी  चटके खाऊन करी  खायची मजाच सगळी. चंगळ मुलांची लयभारी  पाहत होई पोळी  त्यात असायची गोडी  दुर्मिळ ती पुरण पोळी. आठवण जपली थोडी  आनंदी लहानथोर सगळी   पूर्वीची तऱ्हा  वेगळी  नातं आता बेगळी. प्रदीप मनोहर पाटील  मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®

दुरावा

|| दुरावा || काय झालं तुला  समजतं नाही मला  कंटाळा आला तुला  वाटतंय सोडतेय मला… सध्या बोलणं कमी  कमी होतेय का हमी  लांब आहे तुमि  कशी देऊ हमी…  वाटलं काम वाढलं  कधी वाटतं सोडलं  मन माझंही पडलं  काहीतरी असंच घडलं…  वाढतोय दुरावा फार  पाहतोय नुसताच शिंगार  वेदना मनात फार  ह्दयात होतात गं वार… नको करुस असं  माझं जीवनाचं हसं  जगतोय मीही कसबसं  समजावू तुला कसं… प्रदीप पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव ©®

मधमाशी

Image
  || मध माशी || जीव कीटक जातीतील   जाती प्रजाती अनेक यातील राजाराणी सैनिक यातील कामकरी भ्रमणावर त्यांच्यातील…    परागकण गोळा करती पोळे झाडावर बाधती    राणी राज्यं करती साथ सारी जमात देती…    मग्न असतात कार्यात नाही त्रास कुणास   ध्यास मधाचा यास  साठवणं बांधून पोळ्यास… जाती असतात सामाजिक होता स्पर्श वनस्पतीस   फलधारणा होते स्पर्शतून  गोड मध सृष्टीस… अविचारी मानव काही औषध मध यांचे जाई कधी घेण्यास   धुराड्यात हाल  त्यांचे… घाबरून  पळती सारी सैनिकमाशी तुटुन पडती  डंक मारती तोडणाऱ्यास   तरी सोडुन पळती … सोडले सार्यांनी घर  वैशिष्ट्य आहे धरती.   शोधती जगंलात पाणी  डुंबुनी अंघोळ करती… नंन्तर सारी जमती नवंनिर्मिती दुसरीकडे करती पुन्हां कार्यमग्न होती नवं साम्राज्यं उभारती… मध देतातं या त्रास घेतात त्या आयते मिळते आपणांस सोसतात तरी त्या… गुण अनेक मधाचे   उपकार सारे मधमाशीचे   मदत सृष्टीस इचे   जिणे तसंच तीचे…   प्रदीप पाटील गणपूर ता चोपडा...

बेडूक

Image
 | | बेडूक | |   डराव आवाज करतो जमिनीत आतवर  राहतो   पादवर उडीने  चालतो पावसाळ्यात आनंदात नाचतो… सर्वदूर जलात दिसतो पावसात जमिनीवर दिसतो मानवा सम अवयव   नाजुक मऊ भासतो… जीवशास्त्र अभ्यास करतांना मानवा सम रचना शिक्षक यांची मद्त प्रयोग दाखवुन संरचना… चिरफ़ाड यांची होते शिकण्यास  माणसास मिळते आवाज घुमतो यांचा हमीने पाणी पडते… सुचक जीव पावसाचा  मऊ शरीर बेडकाचे   पेशी अंनत यात आरोग्य दर्शक सर्वांचे… यांचा जीव जातो शिकून डॉकटर होतो बुद्धी आपण चालवतो   आरोग्यमय माणूस जगतो… प्रदीप पाटील गणपूर ता चोपडा ©®

मुंगी ✍️

Image
 | | मुंगी | | सर्वात जरी आहे लहान   विचार मात्र करते महान  नियमित असते वाटचाल ठेवते कुटुंबाची जाण … पृथ्वीवर जमिन जेथे आढळतात मुंग्या तेथे   संख्या असंख्य आहे मृत जीवही खाते…    ध्यास श्रमाचा सार्यांना   विघटन करत भक्ष्य   पट्पट चाल  दूरदृष्टी  गोळा करणे लक्ष्य …   प्रथम संशोधक  संघटक  बुरशीशेती भुसभुशीत बीजपेरण प्रजाती निर्मिती बुरशींची  शेती अन्न साठवण … सतत मग्न शोधण्यात स्ववजनाहून अन्न भारी  जमून आवश्यक तितक्या    एकत्रित   नेई घरी … क्षणात लाखो जमा   तुटून  पडता रक्षणात   गायब होतात बिळात   जीव घेई हत्तीचा कानात … चाहूल पावसाची घेत सुरक्षित स्थळी जातात   तिचे स्थलांतर जाणत शेतकरी अंदाज घेतात … प्रदीप पाटील गणपूर ता चोपडा ©®

मासा ✍️

Image
 || मासा || जीव पाण्यातील हा अंनत जाती यांच्या पाणी जेथे तेथे वास प्रजाती त्यांच्या… अगणित संख्या असते वैशिठ्य  आहे खास मोठी  गिळति लहानास म्हणुन ध्यास मादीस… सुरक्षित स्थळी प्रजनास पावसाळ्यात प्रवाह विरुद्ध   नदी उगम अंडी घालण्या कमी पाण्यात बाळ समृध्द… खवले  असती अंगास कल्ले असती पोहण्यास   माणसे पकडति खाण्यास  तळुण भाजून  जेवणास…  बोलता खाल्ली मासोळी   आजार परत बोलवी   सांगतात काही बराकरी चवं स्वादीष्ट असावी…   तेल यांचे गुणकारी बचाव काहींचा भारी स्पर्शिले करंट मारी घेत पाण्यांत भरारी… जगण्याची तर्हा न्यारी   जल तेथे हजेरी    गिळतातमोठी खातात माणसे संख्या आवाक्यात तरी… प्रदीप पाटील गणपूर ता चोपडा जिल्हा. जळगाव ©®

फुलपाखरू (क्र 1)

Image
 ||  फुल पाखरू || अंडी अळी कोष यातुन उडतं फुलपाखरू रंगी बेरंगी मनमोहक  रानांत उडतं पाखरू… लहानथोर यांच्या मनात   सुंदरता भरते डोळ्यात. आनंदात बागळते रानावनात पावसांत  लपतंय झुडपात… कधी खेळते अंगणात    अवस्था हि सुंदर भारी मिसळत लहान मुलात हवी हवी वाटणारी… अंड्यांचा त्रास नाही कोषात पडुन राही अळीत खात राही  उपद्रव देत राही… अळींची असली अवस्था  शेतकर्यानंची करते दुर्वेवस्था   नको ती अळी खातो शेतकरी   खस्ता… विविध रुपं फुलपाखरूचे   पहिलं असतं निरूउपद्रवी   दुसरं अळीत उपद्रवी  तिसर्यात कसं रे मोहकता दावीं…  बहुरूपी नं पाहिला असा  खाऊन माजलास जसा पडून राहतो कोषात जातो पंख फ़ुटले  मजेत कसा… प्रदीप पाटील गणपूर. ता.चोपडा जिल्हा.जळगाव  ©®

गोगलगाय

Image
 ||  गोगलगाय || लवचिक  नाजुक आहे लांब मान मागे पाय   शरीर डोंगर सारखे मऊ मुलायम जशी साय… चालते  जागा सारते वाट चीकट सोडते नाजुक पण चालते जीवन छान जगते… पापी दृष्टी काहिची त्रास देता जेंव्हा पाद पोटात सरंक्षण  आकुचंन पावते तेंव्हा म्हणतात माणसात अविचारी शांत सरळ जगनाऱ्याला कसा नाजुक भासतो गोगलगाय उपमा देतात्याला… दुनिया कशी आहे शांत नीरमळ जगतो त्या जिवा त्रास खुप काही होतो… प्रदीप पाटील गणपूर ता चोपडा ©®

साथीचा आजार

Image
 || साथीचा आजार ||  साथीचा आजार  लोकं झालीत बेजार  कसा करायचा बाजार  प्रश्न उपस्थित हजार. झालीत अनेक बेकार  होतेय त्यात उपासमार  रडताय सारी कामगार  शेतकऱ्यास बसला मार. व्यापारी मोठा हुशार  साठा करताय फार  दुपटीने विकताय माल  ग्राहक होतोय बेजार. होतेय लूटमार फार  डोकं होतंय गार कसा चालेल संसार  गरिबांचे हाल फार  त्यांनाच जास्त मार  होतील भूकबळी फार  संसर्गाने लोकं बेजार  खुलं मृत्यू द्वार  काळजी घ्या फार. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव ©️®️

कसे जगावे तिने

  || कसे जगावे तिने ||   बालपण पासुन स्थान  मुला पेक्षा मुलीला कोंडून ठेवता घराला   जपत असता तिला.  दृष्टाची नजर तिजवर  सतत घायाळ करते   कुटूंब साठी झिजते  स्त्री पण मायेत जगते. धाकात लाडात वाढली  शक्ती असुन भरली  दुय्यम तरी अवतरली  आता बरोबरी धरली.   कसं जगायचं तिने  वाट स्वता निवडली  साऱ्या क्षेत्रात झेपावली  अबला नाही राहिली.   प्रदीप मनोहर पाटिल  मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव   ©️®️

गव्हाचं रान

Image
  ||  गव्हाचं रान || (अवकाळी गारांचा पाऊस पडला ) रान होतं छान  भरत होतं मन  अवकाळी आला अचानक  केली रानात घाण.  खुशी गेली क्षणात  अविचार येतो मनात   तोंड दयायच जनात  सावकार येईल दारात. पहिले कापसाचं गेलं  आता गव्हाचं नेलं  मन आमचं  मेल  लेकरांनी काय केलं. उच्च होती शेती  झाली तिची माती  भ्रष्ट  मजा  करती  व्यापारी वरून लुटती. सरकार निघती करंटी  चोरांना तेच पोसती  पिकलेलं फुकटात घेती  वारे साऱ्यांच्या करामती. कष्टाला कसं लागला  घामाला अश्रू  फुटले  खालावते परिस्थिती प्रकृती  आम्हाला देवानेच लुटले. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

भाकर

|| भाकर || जगण्यासाठी लागते भाकर  दुनिया जगते त्यावर  उपासमार येते पीकवण्यार्यावर   उचलतो साऱ्यांचा भार. कपडे नसतात अंगभर  कर्ज असतं डोक्यावर  ताण पडतो मनावर  तोच लटकतो फासावर.   कळवळा दिसतो गावभर  मानली त्यानं हार  तऱ्हा निराळी  जगभर  कशी मिळेल भाकर.   प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा  जिल्हा. जळगाव  ©️®️

संस्कार आणि संस्कृती ✍️

Image
|| संस्कार आणि संस्कृती || वय असतं लहान  शिकवण मिळते छान  आई वडील बाबा  शिकवतात लहानथोरांचा  सन्मान…   कुटुंब शाळा परिसर  गाव पुस्तकं गाथा  यातुन मिळते ज्ञान  टेकवत वडीलधाऱ्यांना माथा…   जगायचं वागायचं कसं  यालाच म्हणतात संस्कार  सत्यवादी आधित्मिक वागणुक    पाहुंन मन गार…   रूढी परम्परा पद्धती  आचार विचार जीवनचाली  जगण्याची  कृती संस्कृती त्यात संस्कार दिसली…    उत्तम करा  कृती  जोडा  त्यातुन नाती  अंगीकारु   त्यात नीती   छान येईल प्रचिती…   प्रदीप मनोहर पाटील  मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव  ©️®️

गुरूने दिला

Image
|| गुरूने दिला || आई माझी गुरु  चालु लागलो तुरुतुरु  बोबडे बोल सुरु  बाबांच्या खांद्यावर फिरू… शाळा झाली सुरु  गुरुजी झाले गुरु  ग म भ वाचन करू  दप्तर पाठीवर धर.   छडी  लागली छमछम  विद्या येई घमघम  वाजले ज्ञानाचे पडघम  खेळात होई दमादम.  गोल वाटला भूगोल  इतिहास भासला खोल   गणिताचे आकडेमोडित मोल  शास्राचा अभ्यास सखोल.   गुरूंचे मार्गदर्शन अनमोल  त्यांनी दिला मंत्र  उडू  लागलो आसमंती  श्रमानें  झालो श्रीमंत.  प्रदिप मनोहर पाटिल  मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©️®️  

माझी बोली माझी कविता ✍️

Image
|| माझी बोली माझी कविता  अहिराणी कविता || (बोली अहीरानी  चाली)   खान्देसनी गावरानी  भाषानी रानी  अहिरानी  मनमाई उनी दखा तुमले  वाटलाई दिनी.   दयन दये माय मनी  घट्यावर गाना वोव्या म्हनी  पायठाले बोलें  उठीसनी आंगनमा सडा रांगोई टाकीसनी.  जंगलना  राजा देस  आठे  लोकसले शे माया  त्या भलताच शेतस भोया  देव त्यासना शेत सोया.  गावमा ऱ्हाये  मढी, गडी  तठे  सोनानी  हलकडी   ऱ्हायेंत टांगा बैलगाडी  पोया नी धुम देतस गाजाडी.  हुई ना खेयतस  फाग  येत नई कोनलेच राग  दाटीवाटीना पहाड ऱ्हाये वाघ कानबाई गोंधय जागोजाग. जातधरम घरमा  पायेंत एकन्दर नांदतस लोके  गुनी  राम नी पावन व्हयेल शे सर येवाव नहीं खांन्देसनी. ______________________________ प्र दीप मनोहर पाटिल  गाव. गनपूर तालुका चोपडा जिल्हा जयगाव. ©️®️  

श्रावण

Image
 ||  श्रा वण || ढग लागले बोलु  धर्तीने नेसला शालू  मनं लागलं खुलू  फुले लागली डुलु... रान लागलं फुलू  डोंगर लागलेत पांझरू  इंद्रधनू लागलं खुलू  उडू लागले फुलपाखरू...   मध्य बिंदू ऋतूचा  उत्साह साऱ्या जीवांचा  पर्व येती देवांचे  मनमोहक क्षण पाहण्याचा…   छटा अनंत क्षणात  कधी राहतो उन्हात  थोडं भिजतो पावसात  असंच सारं श्रावणात… प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा  ©️®️

आजार

Image
 | | आजार | |  तसं पाहिजे तर मानव किंवा कुठलाही  प्राण्यांचं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं. त्यात अन्न हवा पाणी मिळाले की शरीर चालत पळत असतं. जीव हा अन्न पाणी हवे वाचुन जगुच शकतं नाही. अन्न प्राणी हवे द्वारे अंनत  सुष्म जीव डोळ्यांना नं दिसणारे जे भिंग दुर्बीण द्वारेचं तज्ञ, डॉक्टर, संशोधक हि लोकं पाहुंनं ओळखु शकतात. पाहिलं बघितलं तर सारी सृष्टी जवळजवळ नियमित एकमेकांच्या सम्पर्कात असते.त्यात सारी प्राणी पशुपक्षी जीवजन्तु आलीत  आपण मानव आहोत तर तोच विचार करू आपण दररोज अनेक सुष्म जीवजन्तुच्या सम्पर्कात सदैवं राहतो कुठं पण कसं पण राहात असलो तरी आपल्या शरीराची योग्य निगा काळजी घेत असलो तर आपण घेत असलेल्या निगा काळजी स्वछता मुळे काही नव्हे बऱ्याच जीवजन्तु मारतो किंवा पळवून लावत असतो किंवा शरीर तन्दुरुस्त असते म्हणुन परतावून लावत असतो.. व्हायरस ब्यक्ट्रिया पेशींची  सारी सृष्टी निर्मिती उगम नाश असं माझं मतं ते चूक पण असु शकतं कारण मी काही शास्रन्य नाही. त्यात    बॅक्टरीया पसरणारे व्हायरस सुष्म जीव रूप काही चांगले वाईट जे आपल्या शरीरातील पेशींना मारता ते आ...

घर (क्र 2)✍️

Image
  ||  घर : 0 २  ||   सत्य संस्कार घरात  मंदिर वास त्यात  सारे एकत्रित राहत  निर्मळ मन ज्यात… साथ संगत एकमेकात  घेऊन हातात हात  एकीत करून मात  रममाण कुटुंब संसारात… सडा रांगोळी अंगणात  आजी आजोबा  घरात  आई वडील हृदयात  तुळशी दिवा लावी  सांजवात…   जीव साऱ्यांचा एकदुसऱ्यात  आनंदी मुलं घरात  दंग गोष्टी आयकण्यात  जरी आईबाप रानात… सुख समृद्धी जीवनात  आरोग्य नांदे शरीरात  मान सन्मान जगात  पिकं डोले शेतात… _______________________   प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव  ©️®️

माय मराठी

Image
  || माय मराठी || परंपरा संस्कृती विचार  बोली माय मराठी  शिकवण सदाचार त्रिलोकी  चालते तिजवर जगरहाटी... ग्रंथ समृद्धी अपार  कवी लेखक साहित्यिक  राजे वैज्ञानिक संत  प्रजा सारी आध्यात्मिक... त्रिभुवनी डंका वाजे  मातृभाषा मज बोली  महाराष्ट्रातील झेंडा फडकवते  रुजली बहरली जीवनचाली... प्रदिप मनोहर पाटिल  मु. पोस्ट. गणपूर  ता. चोपडा जिल्हा. जळगाव  ©®

घर (क्र 1)

Image
||  घर || विश्वची माझे घर  सुंदर आकाश प्रवेशद्वार  जमीन देते आधार  अन्न  उचलतं  भार… हवा करते गार  पाणी जीवन सार  जीव सजीव फार  सृष्टी जगण्या आधार … जन्म मिळाला उधार  निर्माण मातीतुन सारं शरीर भासतं कणभर  ओझं वाटतं मणभर…  प्रपंच करावा सुंदर  कोण नेलंय वर  असलं छोटंसं घर  चित्त समाधान  त्यावर…   नातं त्यात दृढ  आयुष्य असावं सदृढ  काढावं अवैध मार्गाने  संम्पत्ती जमवण्या खुळ…   जाणं निर्मिते आईवडिलांचे  ऋण फेडू भ्रम्हांडाचे  विचारत येतील जन  हेच घर का त्या महापुरुषाचे. ___________________________ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव   ©®  

सुट्टी महामारीची

Image
||  सुट्टी महामारीची || लावली कोरोनान हजेरी  सुरु झाली महामारी  माणसं घाबरली सारी   बसली घरो घरी... शुकशुकाट भासला पृथ्वीवरी  बंद उधोग सारी  कामगारांना आली उपासमारी  थांबल्या लग्नाच्या पोरी...   गाठोडं घेऊन पाठीवरी  संसार घेऊन डोक्यावरी  रडताय  पोरं खांद्यावरी  मरताय सारी  कष्टकरी...   शेतकरी आहे बांधावरी  खायला मिळेल तरी  तो मेला जरी  पोसली जाईल दुनियासारी...  राजकारणी श्रीमंत मश्गुल  गरिबांची बत्ती गुल  त्यास चारदाण्याचं पानफूल  केलंय दाखवताय फुल... प्रदीप मनोहर  पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव  ©®

शाळेला सुट्टी लागली

Image
  || शाळेला सुट्टी लागली || आज पेपर सम्पलें  शाळेला सुट्टी लागली  धमाल सुरु झाली  मुलं खेळु लागली…   उन्हाळा सुरु झाला  खाऊ आईस्क्रीम गोला  बाबा फिरायला आम्हाला  लांब घेऊन चला…   गल्लीत दंगा झाला  खेळायला कंटाळा आला  कार्टून पाहुं चला  मोबाईल दया मला…   अभ्यास सुटीचा झाला  वाचन नको आम्हाला  काळ आता बदलला   लैपटॉपवर ग्रन्थ वाचला…   बाबांनी मळा दाखवला  मुलांनी चित्रपट पाहिला  आईनं शिरा केला  सुट्टीत गोडवा आला… _________________________ प्रदिप मनोहर पाटिल  मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  ©®