Posts

Showing posts from June 8, 2025

अहिराणी बोली ✍️

Image
!! अहिरानी!! रानी रानी मनी अहिरानी  बंठ्या बोली भाषासनी महाराणी  कान्हा ना देस मा भाषा बोलानी  आमनी बोली गुनी महारानी. तीना बरोबरीन्या बोल्या ग्यात  हुई नामशेष  बोली ना डंका उभा भारत देस  तिनं ना कौतुक आयकता आयकता गोड वाटस  गाना, पवाडा, देव न्या आरत्या गातस. जनमताज पडनी कान वर  गाना गाजतस आते यूट्यूब वर अहिरानी गोड जशी पुरण पोई आते पसरी रायनी जगभर. आमना किसन्या देव  खांडव वन मा राहे  गौळणीसनं दही दुध चोरी खाये ढोरे चारताना पुंगीनां सुर लाये. अशी बोली अहिरानी गुनी लगीन हायद मा देव ना गाना आठला लोके भलता शाना बोलतांना दखाडतस बाणेदार पना.©️®️ परदीप मनोहर पाटील गाव गनपूर  जिल्हा. जयगाव.  बोलनं. हुई ते 9922239055

रास लीला ✍️

Image
!! रास लीला!! मेघ आले आकाशात किलबिल हि रानात आनंद भरे मनात दंग झालो नाचण्यात. सांज खुलली हि भारी विजा चमके ढगात आला सुगधं मनात ध्वनी गुंजला रानात. सृष्टी सजली गं सारी  जोडी आपली हो भारी  फुलवला हा पिसारा  वारा आल्हाद तो जरा. मृग नक्षत्र हा लागे सजली सारी हि धरा बरसेल जल धारा  जवळ ये ना गं जरा. पिसारा हा फुलवला  पावसाळा हा लागला चल लागु निर्मितीला सोहळा सृष्टी रंगला. नाचतोय तूझ्या साठी घेऊ आता गाठी भेटी सांग मनातलं सारं निर्माण राहील पाठी. सुंदर वाटतो हा स्वर्ग आपला हा पक्षी वर्ग मोहक हाचं निसर्ग फेर सोबत धर गं.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

चिंब पाऊस ✍️

Image
!! चिंब पाऊस!! चिंब पावसात आज  माझं मस्त आहे राज   वारा आणि जल धारा  उठवी तुफान जरा. अंग रंग मनी गधं  आल्हाद उडवी केस  मज वाढवी तो साज निसर्ग खेळीतो रास. तुफान होईना शांत जोर धरीते हो चाल साडी उडवी पदर वाटे हळदीची शाल. धुंद झालं मन माझं वाटे उतरतो साज सारंच वाऱ्याचं राज सुसाट वाट हि आज.©️®️ प्रदीप पाटील  गणपूर. चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

उनाडवारा ✍️

Image
!!उनाडवारा!! पावसात झोंबतो उनाड वारा  वरून सुटल्या थंड जल धारा  दोघं छेड काढतात आज जरा  ओढी पदर दुसरा करी गार  झपझप मी हो धरतेय चाल  करताय दोघं मला हो बेहाल  पाझरतंय शरीर जल धार वारा करतोय अंगभर वार साडी केस उडवी अंग बडवी धुंद करी मन प्रेमात बुडवी गाठ गं सोडली रेशमी साडीची  सोन परी मी पिवळी हळदीची  तुटून पडला उनाड पाऊस वारा फेडतोय हो सारी हाऊस तृप्त मन करी त्रास त्यांचा आज  पडताय मंद पावलं गं आज  काय होतंय काय छेडलं त्यानं बेधुंद ते झालं शहारलं मनं .©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

साथ तुझी ✍️

Image
  !!साथ तुझी !! रिम झिम जल धारा  गार गार छान वारा  आनंदात नाचु जरा  साथ संग तुझा खरा . चिंब होतेय धरणी  सारी पाऊस करणी  फेर हा दोघं मिळूनी  साजरा नाच नाचूनी. मृग धारा बरसल्या गधं सुटला धरणी   करू बीज हो पेरणी  येईल पीक बहरुनी. आनंद झाला मनातुनी तुप्त होऊ आता दोघे यौवन धग सारी जागे सृष्टी संग मन लागे. चिंब गं भिजुनी नाचु  ढग गं लागले बोलु ताल सुर ते जुळवू गाणं आपलं खुलवू. निसर्ग सुदंर पाहु सुख शांती ती मिळवु क्षण आज छान भोगु ताल सुर हो जुळवू.©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

मुखवटा ✍️

Image
!!मुखवटे!! एक चेहरा स्वतःचा  लपवत हो स्वतःला  वरून तो मुखवटा  चेहरा हो झाकण्याला. लोकं असं करतात  आपलं ते झाकतात  कळू नये वागतात  दुसऱ्याला हसतात. अनेक अशी आहेत  चेहऱ्यावर चेहऱ्याने  लोकांना हो फसवता  स्वतः हो मजा मारता. रंगी बेरंगी चेहरे हसरे लाजरे दिसें वाटे विचित्र सारेच क्रूर काही ते भासे. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. मो. 9922239055