🚩 युगकर्त्यास पत्र ✍️
!!पत्र लेखन!! युगकर्त्यास पत्र. (देवाला पत्र ) प्रति. श्री. युगकर्ता देवा मु. पोस्ट. देवनगरी समस्त आकाश, पृथ्वी, पाताळ युगपुरुष. पिन. शून्य शून्य ooo विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या त्रास बद्धल. श्री. देवाधिदेव राजे युगपुरुष देवा. स. न. वि. वि. हे प्रभुदेवा जीव निर्माण केला. त्या सोबत मानव प्राणी निर्माण केला. मानव प्राण्या मध्यें आम्ही येतो. सृष्टी कर्त्याने सर्व प्राण्यांचा विचार करून सृष्टी निर्माण केली. तुमच्याकडे युग निर्माण करण्याची जबाबदारी होती आणि आहे. आपण सर्व काळ आपल्या मना प्रमाणे निर्माण केलेत. अगदी सत्ययुग पासून आता कलियुग पर्यंत. कलियुगात लोकशाही चीं गोड्स नावानं सत्ता आमच्या वर लादलीस. विचार आणि संकल्पना लोकशाही चीं खुप छान आहे. पण त्या संकल्पनेस काळिमा फसणारे. राज्यकर्ते आमच्यावर बसवलेत." रोज खोटं बोला रेटून बोला " या प्रमाणे कली मध्ये जनतेला लुटणारे लुटारू सत्ता भोगी पुढे आलेत आणि...