Posts

Showing posts from October 19, 2025

कसा जन्म ✍️

कसा जन्म पंच तत्व पुढे! निर्गुण आकार! होतात साकार! दव बिंदू!! पराग कणात! सुष्म त्याला जाणु! निर्मिती शुक्राणू! शरीरात!! वाढ गर्भात झाली! निर्मिती दिसली! देहात ती आली! पेशीतून!! जुळल्या एकत्र!जमवली मित्र! वाढवणं सूत्र! शरीराचं!! कोणी दिलं रूप! मिळालं स्वरूप! अवतार रूप! अभ्रकाचा!! गर्भात वाढलं! बाहेर पडलं! पृथ्वी वर आलं! बाळ रूप!! प्रदीप सांगतो! वर्णन येण्याचं! असतं सर्वांचं! सारखंच!! प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

सुख काय असतं ✍️

 सुख काय असतं  शांत जीवनात !असे स्वाभिमान! जीवनात मान! जनतेचा!! कुटुंब संसार! संस्कृती समान! धर्म सारे जाण! आचरण!! माता पिता गुरु! नारीस प्रणाम! असे अभिमान! तारुण्याचा!! आहे तेच खुप! नात्यात मां रूप! सत्वात प्रारूप! मानतात!! स्व धन कमाई! तेच अन्न खाई! रांधे घरी माई! कुटूंबात!! दुसऱ्याचं भलं! आनंद मानलं! मदतीला आलं! समाधान!! चिंतन मनन! सदा आचरण! आनंदी जीवन! हसतच!! मानलं सुखात! आहोत आपण! प्रदीपला पण! वाटतंच!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

सुख ✍️

 सुख  काय असतं सुख  खेळ मनाचा असे समाधान दिसें सुख त्यांतच भासे. आनंद दे जीवना हास्य खुलवी मना शांत शांती असते माननं हाच कणा. शोधु नयेच कुठं आपोआपचं भेटे क्षण मिळाले लुटे सुखी जीवन थाटे. सर्वात मिसळत ज्ञान ज्योत लावत जीव जीवास देत सु सहवास घेत. मन ते होई तृप्त पाहिजे तेहि प्राप्त हवं तेचं सोबत मनातहि व्याप्त. प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

सुखी जीवनात ✍️

 सुखी जीवनात  सुखी जीवनात! कोण आहे सांगा! सर्व लावी रांगा! सुख घेण्या!!1 सर्वांना वाटतं! कमी मला दिलं! इतकं मी केलं! सर्वा साठी!!2 कोण नेतं वर! विसरले सार! दृष्ट कारभार! सर्वीकडे!!3 सुष्म असा जीव! देह मानवाचा! नुसताच ढाचा! शरीराचा!!4 चित्त समाधान!ठेवा हिच जाण! हो प्रकाशमान! उजेडात!!5 निर्मळ जीवात! सुख शांत रात! सरस्वती साथ! आयुष्यात!!6 प्रदीप भरतो ! गोडाई मनात! दिप अभांगत! लावतोच!!7 प्रदीप मनोहर पाटील मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

जग काय म्हणेल ✍️

 जग काय म्हणेल  जग अफाटचं आहे  अस्तित्व आपलं छोटं  जनता काय म्हणेल  संकट वाटतं मोठं. नाण्याच्या बाजुहि दोन आपलं परकं कोण एक चांगलं सांगतो दुसरा ते खाई शेण. नावं सर्वांना ठेवले  कुणी कर्तृत्व दावले  तेही हो हिसकावले  कोण कुणाला भावले. आपलं असतं प्रेम  दुसऱ्याचा करे गेम  अंतरंग मनातील सर्वांचे असतं सेम. सतत टोचता काटे  परकं आपलं वाटे  स्वार्था साठी दृष्ट काही  चांगल्यास देता फाटे. प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

जग काय म्हणेल ✍️अभांगत.

 जग काय म्हणेल  चिंता असतेस! वागण्यात सारी! मनात उभारी! जगण्याची!!1 जनता विचित्र! वाईटचं सत्र! भाऊबंद मित्र! दोष लावी!!2 कर्तव्य करता! सद्गुणी वागा!  पकडता धागा! दोषाचाच!!3 सोडुन गुणांचा! वाचतात पाढा! भरतात शाळा! अवगुणी!!4 पृथ्वी फिरे गोल! जीव अनमोल! सांभाळत तोल! बोलण्याचा!!5 सुष्म आहे जीव! कार्यात भरीव! शिल्पात कोरीव! साकारावे !! 6 असंच राहावं! तसंच करावं! सोडून ते दयावं! जन चिंता!!7 लाभलं आयुष्य! अल्प असे क्षण! सृष्टीत निर्माण! सुष्म देह!!8 भ्रम्हांड अफाट! प्रदिपचा थाट! सांगतोय वाट! जगण्याची!!9 प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

सौर माला ✍️

 सौर माला  अंनत आहेत! आपण पाहतो! येथेच राहतो! पृथ्वी वर!!1 ग्रह तारे सारे! येथे वाहे वारे! जीवन निराळे! जीव सृष्टी!!2 एक सौर माला! घातलं जीवाला! सु पंचतत्वाला! देह आला!!3 सुष्म अस्तित्वात! जीव आपलाच! देह लाभलाच! मानवाचा!!4 सौर सागरात! सावलीस रात! ग्रह फिरतात! गोल गोल!!5 चुंबकीय तत्व! आकर्षण सत्व! ग्रहा पंचतत्व! भरलेत!!6 जीव निर्मि कार! ग्रह ऊर्जा सार! उचलता भार! फिरवण्या!!7  पितृत्व भरलं! प्रत्येक ग्रहात! मातृत्व हयात! पृथ्वी ग्रही!!8 आगळी वेगळी! जीवन भरली! सौर त्या शैलीत! मालेच्याच!!9 प्रदीप सांगतो!प्रेत्येक मालेत!  जीव निर्मिलेत! देह धारी!!10 प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

सौर माला आपली ✍️

 सौर माला आपली आपली ती नेक! पृथ्वी उप चंद्र! ढगात तो इंद्र! जल राजा!! 1 पृथ्वीला वलंय! कधी तो प्रलंय! हवेतचं लय! चक्राकार!!2 सूर्य देतो ऊर्जा! जगतेय प्रजा! गुरु शुक्र राजा! जीवनात!!3 शनी प्रभावात! मंगळाची माला! लाभते जीवाला! ग्रह शक्ति!!4   बुध शुक्र तारा! नेपच्युन न्यारा! ल्पूटो तेज भरा! सांगतात!!5 नव ग्रह दिसें ! दुर्बीणीत वसे! साऱ्यांचीचं ठसे! डोळ्यातून!!6 लहान मोठाली! खूपच भासती! सारीच ओढती! शरीराला!!7 प्रेत्येकाची शक्ति! चक्रकार फिरे! जीवनात भरे! आकर्षण!!8 प्रदीप कथन!अल्प अभंगात!  ग्रहाचीचं साथ! जीवनात!!9 प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

संविधान ✍️

!!संविधान!! देश स्वातंत्र्य भारत  कायदा स्थापण्या साठी मंडळ गठीत केले कमेटी सदस्य मोठी. विधी तज्ञ सारे होतं बाबा साहेब अध्यक्ष देश एकोपा उद्धीष्ट साऱ्या जाती एकी लक्ष. न्याय नीती कारभार संविधान त्यात सार लोकशाही लोकांसाठी स्वच्छ करा अंगीकार. कायदा पुढे समान  सर्वांना मिळतो मान  देशाला हो अभिमान   मानव जात सन्मान. प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055