Posts

Showing posts from October 26, 2025

गृहलक्ष्मी ✍️

Image
 गृहलक्ष्मी  गृहिणी घरची! कामात असते! कर्तव्य करते! सारं काही!! सर्वांची काळजी!कार्यात तत्पर! शाळेला दप्तर! मुला देते!! कुटुंब सांभाळ! गळ्यातली माळ! पतीचा सुकाळ!धागा बांधी !! पहाटे जुपते! रात्री हि थकते! पाठीत वाकते! कष्ट करी!! दोन कुटूंबात! असते सलग्न!  कार्यात ती मग्न! सर्वा साठी! सरस्वती लक्ष्मी! तिच्यात भरली! सौभाग्य नटली! पतीसाठी!! अंगणी तुळस! सत्वात भासली! तत्व जोपासली! घरासाठी!! जीवन संगिनी! असे अर्धांगिनी! प्रदीप ते जाणी!गृह लक्ष्मी!! प्रदीप पाटील गणपूर.जळगाव मो. 9922239055

सागर किनारा ✍️

 सागर किनारा  सागर किनारा! सुंदर पसारा! वाहतोय वारा! भरभर!!  संध्यालाचं दिसें! मावळता सूर्य! वाटतं पाण्यात!डुबतांना!! मोहक सौदंर्य! संथ जल सारा ! वाळूचा पसारा! चोहीकडे!! शंखात शिंपले! खेकडे हो वाढे! भासतं निराळे! किनाऱ्याला!! धडकती लाटा! आदळत असे!  खवळली दिसें! समुद्रात !!  अथांग सागर! लाभला किनारा! मोहक नजारा! धरतीला!! प्रदीप बघतो! दुरून डोळ्यांनी! मनात कळ्यांनी! फुले सारं!! प्रदीप पाटील  गणपूर( जळगाव ) मो. 9922239055

सागर ✍️

 सागर  अथांग सागर! जलाचं आगर! जीवांचा जागर! अहोरात्र!! जल चर जीव! भ्रमण करता! गोलात फिरता! सागरात!! सागराचा तळ! वाटतो निर्मळ! जगते लव्हाळ! समुद्रात!! अंनत सजीव! कार्यात भरीव! जगतात जीव! खाऊनच!! निर्मिती प्रवाळ! झाली जीव वाढ! पडलीत माळ! उत्पतीत!! निर्मिलीय सृष्टी!वाटे सागराने! भरलं जलाने! जलाशय!! प्रदीप सांगतो! सागराची कथा! जीवनात व्यथा! सर्वांच्याच!! प्रदीप पाटील गणपूर (जळगाव) मो. 9922239055

समुद्राला भरती ओहटी ✍️

 समुद्राला भरती ओहटी भरती ओहटी! सुरूच असते! सतत दिसते! सागरात!!  अमावस्या पुणी! गुरुत्वाकर्षण! शक्ति आकर्षण! वाढतेच!! चंद्र सूर्य पृथ्वी! रेषेत असता! प्रभावी दिसता! ताकतीत!! उधाणात येई! जल तत्व सारं! चाले कारभार! सौर माला!! दिवसा दोनदा! येतंच असते! उधाणा दिसते! अती तीव्र!! चंद्रचा प्रवास! पृथ्वीचंच स्थान!  प्रकाशात मान! सूर्य शक्ति!! प्रभाव पडतो! संचार घडतो! जलात चालतं! घुसळण!! जीवनात घडे! शरीरात पडे! रक्त सळसळे! या तत्वाने!! प्रदीप सांगतो! आयकून घ्यावे! कसं ते जगावे! ठरवते!! प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055  कक्षेत प्रभाव!

सागरी किनारा ✍️

 सागरी किनारा  सागर किनारी मारू फेरी  काय करतेस रोज घरी  सुंदर दिसशील गं परी  तिथं बसु शांत थोडं तरी . जीवनाच्या वाटेवर सखी  गाणं गाऊ दोघं एकमुखी सूर जुळवू होऊत सुखी ओठ ओठावर मुका मुखी. सागर लाटा गाताय गित  साथीत जुळे सूर संगीत बहरू दे आपलीच प्रित सागर किनारी हिच रीत. धुंद होतं करूया साजरा  घेऊन स्पर्श सुखात जरा येतो आठवणींना उजाळा  सखी वाट बघतो किनारा. प्रदीप पाटील गणपूर( जळगाव) मो. 9922239055

नक्षत्र अभंग ✍️2

 नक्षत्र  सत्तावीस असे! आकाशात दिसें! तेज पुंज भासे! गगनात!! तारका समूह! वेगळे दर्शन! वैशिष्ट्य सगळे! जीवनात!! चंद्र सोबतीणी! वर्ष विभागूणी! भाग ते पाडुनी! सव्वा दोन!! ग्रह तारे सारे! अवती भवती! प्रभाव दावती! जीव सृष्टी!! सटवाई लिही! नक्षत्र बघून! घ्या येथे जगून! मानवात!!  ग्रह तारे उपग्रह! फिरता भ्रम्हांडी! भासतात अंडी! डोळयांनाचं!! गोलाकार फिरे! जीव त्यात तरे  अभंगात भरे! ज्ञान दीप!! प्रदीप पाटील  गणपूर (जळगाव ) मो. 9922239055

नक्षत्र ✍️ अष्ट अक्षरी

 नक्षत्र  क्षण क्षणाचं नक्षत्र  बदलणं हेच सूत्र  आकाशी चंद्र तारे  प्रभावी काहीच मित्र. स्थिती वरून ठरते  जीव जीवन कळते  गुरुत्व शक्ति साऱ्यांची  भाग्य कधी उजळते. अंकुरण वेळ कशी ग्रह तारे सांगतात जीवाशी सबंध काय प्राणी ते रांगवतात. भविष्य उज्वल सारं की वाईट कारभार हृदयात करतं वार रक्त जीवात संचार. पंचांग त्यावर चाले  सौर माला भ्रमण चाले जीवांचे जीवन  कसं सांगतं मरण. प्रदीप मनोहर पाटील गणपूर. ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

नक्षत्र ✍️ अभंग

 नक्षत्र  जुळली नक्षत्र! विवाह कर्तृत्व! मिळतं मातृत्व! नक्षत्राने!! जीवन चालवी! संसार घडवी! फोटोत मढवी! गेल्यावर!! आनंद भरवी! सुखात खेळवी! दुःखात पळवी! स्थिती काळ!! कोण मित्र शत्रू! सांगतं नक्षत्र! जगण्याचं सूत्र! सौरमाला!! आस ती जीवाला! यावे सुनक्षत्री! प्रदीप हो पात्री! नक्षत्राशी!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर. जिल्हा. जळगाव मो. 9922239055

सुखाचे सोबती ✍️

Image
सुखाचे सोबती  सुखाचे सोबती! मित्र गण गोत्र! आनंदात सूत्र! शुभ लाभ!!1 चिकटती नाती! वाटतं ती किती! शुद्ध सारी नीती! सुख साथी!!2  संकट समई! आरोळी दया मग! तेव्हा कळे जग! सारी नाती!!3 आपलं कोणीही! कामात येईना! दुःख ते वाटेना! असण्याचं!!4 सुखाचे संगती! गायपचं होता ! शिकवण देता!आयुष्यात!!5 प्रदीप सांगतो! क्षण घ्या जगून! जीवन भोगून! संम्पतच!!6 प्रदीप पाटील  गणपूर( जळगाव ) मो. 9922239055