Posts

वाट ✍️

Image
 वाट  कुठं दिसे हिरवं रान, मन होई बेभान  वाटतं व्हावे रममाण, मनसोक्त छान  पशु पक्षी प्राणी,सार्यांची गुंज उठे मनी  वाटे गाताय सारी, मजूळ गित गाणी  व्हावे धुंद आपणही, म्हणावीत प्रेम गाणी  मनात वाटेवरील , सुंदर भरूयात आठवणी  क्षण क्षणात बदले वाट, कधी कुठं येईल घाट  रस्ता वळणांचा सारा,कधी वाटतो शुकशूकाट  प्रवास हा असाच सारा, भरभर वाहतो वारा  मन चोहीकडे फिरे, कधी घेऊ थांबा जरा. वाटा साऱ्याचं वेगवेगळ्या, पण पोहचतात सगळ्या    आपल्या गंतव्य ठिकाणी ,देऊन वाटेवरच्या आठवणी वेगळ्या . प्रदीप पाटील  गणपूर जळगाव  मो. 9922239055

कामगार ✍️

Image
 कामगार  कष्ट करी फार, त्यावर संसार  घाम गळे सारा, हृदयात हो वार  एक माणुस तो दुःख त्या अपार  धन्या साठी राबे रात्री काढी जागे  अंग खिळखिळे शांत झोप लागे  सांगतो कष्टाला फळ गोड लागे  जीवन संघर्ष तरी उरी हर्ष  नित्य क्रम सारा वेळेत हो करा  बंधन जीवन नसे कुणकुण   रममाण होई सुट्टी ला हो घरा  व्यथा त्या अंनत कोण इथं संत  कष्ट श्रम तरी नसे मणी खंत  निवृत्ती नंन्तर मिळेल विश्रांत  नुसतीच भ्रान्त शेवटीचं शांत  प्रदीप पाटील  गणपूर जळगाव  मो. 9922238055

युद्धाचे बदलते स्वरूप ✍️

Image
!! युद्धाचे बदलते स्वरूप!! काळ नुसार युद्ध स्वरूप बदलते. आपण प्राचीन काळ पासून आजपर्यंतचा जसा मानव क्रांती प्रवास तसाच लढण्याचा प्रवास. टोळी युद्धा पासून सुरु झालेलं युद्ध. सुरवात पहिलं मोठं युद्ध रामायणात राम रावण युद्ध. रामायणात राम सोबत पशु, पक्षी, वानर सेना युद्ध लढली मानव विरुद्ध वानर सेना असं युद्ध झालं. म्हणजेच प्राणी, पशु,पक्षी एकमेकांना साथ तत्त काळी दयायचे. भाषा समजायचे असो तो मुद्धा येथील नाही. नंन्तर महाभारतात तसं पाहिलं तर जागतिक पहिलं युद्ध महाभारतात जगातील पहिलं महायुद्ध असंच मी म्हणेल. का तर जगातील सर्वच राज्यांनी आपल्या आपल्या सेना कुरुक्षेत्रावर कौरव पांडव यांच्या साठी युद्धात पाठवल्या होत्या. म्हणूनच जगातील सर्व राजेशाही जर आपली सेना युद्धात उतरवत असेल तर तेच पहिलं जागतिक युद्ध महाभारतातील. भारत भारतीय जनता सोडून ईतर जनता ते मान्य करणार नाहीत पण . पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आधुनिक काळातील आपण बघितलीत. त्या पूर्वी राजे महाराजे याची युद्ध आपण वाचलीत कश्या पद्धतीने होतं होती. तलवारी ते तोफगोळा पर्यंत हत्यार आलीत. दगडाचं हत्यार वापरून सुरु झालेला प्रवास मिसाईल,ड्रोन ...

सण ग्रामीण पण झाला शहराचा ✍️

Image
 सण ग्रामीण पण झाला शहराचा. सण दिवाळी खूप जोरात उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीने साजरा होणारा सण. भव्य दिव्यांची रोषणाई. आकाश कंदील,लाइटिंग ने सजलेलं शहर.असं चित्र चोहीकडे. दिवाळी आली कि दिसतं. सुका मेवा, मेवा, लाडू, मिठाई,पंचपकवांन्य, विविध तेलात, तुपात तळलेले शेव पासून ते चकली पर्यंत विविध अंनत गोड ते तिखट आंबट सारी फरसाण. या साऱ्यांची रेलचेल. आनंद साजरा करण्याचा सण. पूर्वी दिवाळी परंपरा या लेखात कुणब्यांची खरी दिवाळी सुरवात अन उत्सव मी लिहले होते. त्या लेखात सारे बाराबलुतेदार खरे दिवाळी सूत्रधार. कुणब्यांच्या वरती आधारित बलुतेदारी चाले. शेतकऱ्यांनी पिकवलं ते गाय गोरस च्या दिवशी गाईला पहिल्या कणसातील धान्य किंवा रास पुजन झाल्यावर पहिलं दळणं आपल्या गाईला आणि गोऱ्याला पूजा करून दिवाळी पहिला दिवस उत्साहात साजरा करायला सुरवात करायचीत मग नंन्तर आलेल्या धान्य मधून ईतर फराळ बनवतं. नंन्तर इतरांना देत असत तीच परंपरा सुरु आहे. पण फरत इतका झाला शेतकरी शिल्लक राहिला फक्त सण करणं विसरून गेला नव्हे विसरत चालला. बलुतेदार त्याला एक एक करून सोडून गेलेत.आधुनिक काळात सर्वांनी शहर जवळ केलं अन बलुते...

पक्ष्यांची शाळा ✍️

Image
 पक्ष्यांची शाळा  पक्षी झाले सारी गोळा  चिमणी सांगे वेळ झाली पळा शाळेत भरला सोहळा  पोपटाने काढला गळा  रान गित म्हणु लागले  स्वर कर्कश घुमून गेले  कबुतर सांगत शांती धरा  मोर फुलवी आपला पिसारा  बगडा शुभ्र स्वछता करे  कावळा काळ्या रेघोटया मारे  घार सांगे आकाश बरा  शहामृग डोले सुंदर हि धरा  राजहंस मुख्याध्यापक आले  मैनेला शिकवा सांगुन गेले  खंडया, टिटवी, गिधाड, सारस  सुतार, घुबड, गरुड शांत झाले. प्रदीप पाटील  गणपूर जळगाव  मो. 9922239055

पती साठी गित ✍️

Image
 पती साठी गित  आता नको राया, आरोळी देतं कोंबडे  पहाट झाली फार आता झो्प ना गडे!!धृ!! लग्ना पासून माहित तु दांडगा गडी  वय झालं आता नको सोडु साडी  अती नको घाई लागते तुला रं आता गोळी  पहाट झाली फार आता झोप ना गडे!!1!! धुंद मिलन साठी पहाट उरली थोडी  हर्ष उल्हास मस्तीची तुझीच लागली गोडी  जोर तुझा वाढतो करतो रं मला वेडी  पहाट झाली फार आता झोप ना गडे!!2!! खूप झालाय खेळ लै झाला रं वेळ  अजूनहि वाढतं प्रेम नको करुस अजून भेळ  प्रित संगम असाच भिजूदे चिंब बसला मेळ  पहाट झाली फार आता झोप ना गडे!!3!! प्रदीप पाटील  गणपूर जळगाव  मो. 9922239055

वर्तुळ ( शून्य )✍️

Image
 वर्तुळ (शून्य ) पूर्ण गोल रेषा जुळे  वर्तुळ त्यातून मिळे  गणितात संख्या शास्र  किंमत त्यातून कळे. बेरीज वजाबाकीत  गुणलं तरी शून्यात  संख्या पुढे मात्र याचं  पटीने हो वाढण्यात. वर्तुळ असती नेक दिसतं सारं सुरेख  आतील पोकळी सारी  रेषा करी देखरेख. आर्यभट्ट गणित तज्ञ  जगातील लोकं सुज्ञ  मानलं पूर्वी तंत्रण्य  शून्यातून चाले यज्ञ्. प्रदीप पाटील  गणपूर.जळगाव  मो. 9922238055