मी मराठी बोलतेय भाषा मी तर मी कशी बोलु शकते असं तुम्हाला वाटलं असेल माझ्या लेकरांना तुमी माझे लेकरचं आहात नं. तुमीच बोलता ना? माय मराठी असं ! म्हणुन लेकरं बोलले मी मला माहित आहे माझे लेकरं गुणी आहेत. मला वाढवण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी खुप लिहले बोलले माझ्या बद्धल ग्रंथ, पुस्तकं, कथा, कादंबरी , अभंग, पोवाडे, शाहिरी, नाटकं, बोलपट ( चित्रपट) इतकं साहित्य माझ्यावर माझ्यात झाले कि सर्वगुण संम्पन्न झाले मी... लावणी तर कुठच नाही माझ्यातचं बोलली जाते लावणी चे नाव घेतलं तर बघा तुमची कशी कळी खुलली ना? तुमची कळी खुलावी उत्साह यावा आयकतांना मुध्दाम लावणी विषय काढला.... बोर व्हायला नकोत तुमी. अधुन मधुन कीर्तनकार जसं चुटकुले सोडतं असतो तसं त्यांना माहित असते तुम्हाला चांगले उपदेशाचे डोस अभंगातून नीट पटणार नाहीत आयकून झोप यायला नको म्हणुन तसं मी लावणी सांगितली बरं बाळांनो...राजे महाराजे कवी संत साहित्यिक. खुप लिहलं मराठीत रुजवली वाढवली अलीकडे तर माझ्या साठी काही साहित्यिक तर मराठी साहित्य संमेलन पण विदेशात भरवुन आल...