गुढी पाडवा. ✍️

 गुढी पाडवा.

उत्सव थांबवून नवं पर्वास  मशागत सुरवात करण्याचा दिवस.

होळी पासून सुरु होणारा सण गुढी पाडव्याला मुहूर्त साधण्या साठी सर्वांचा आटापिटा असतो. आपण अगोदर होळी सुरवात पाहु.होळी सण थंडी जाऊन तप्त ऊन पडण्यास प्रारंभ होण्याचा सुरवातीचा काळ. थंड वातावरण जाऊन. उन्हाळा सुरवात आरंभ वेळ. होळी सण निमित्त अनेक कथा दंतकथा आहेत. त्यात आपल्याला पडायचं नाही. पण सणा विषयी माहिती जरूर घेऊ. पावसाळा नंन्तर मातीतील ओलाव्यात येणारी पिकं काढणी सुरवात होण्याचा काळ होळी. पेरलेली कणसं भरून गेलेली असतात. ज्वारी ,गहु, हरभरा ई सर्व पिकं यांची कापणी सुरवात होण्याचं पर्व नंन्तर उन्हाळा लागणार असतो. म्हणून पिकं चांगली येऊन साठवण करून आनंद साजरा करण्याची वेळ. वृक्ष्यांनी पण जुणी पालवी सोडुन नवं पालवी अंगिकारली असलेला काळ. आबे व निंब  तत्सम वृक्ष यांचा मोहर बहर येऊन गोड कडु सुरवात होण्याचं पर्व. तसेच पशु पक्षी आपली आपली रानात. खोपा बनवण्याची सुरवात करून उन्हा पासून संरक्षण करण्यासाठी खोपा बनवून उन्हाळा पुढे चालून येणारा पावसाळा या मधील काळात जीव वाचवून दुसरा जीव वाढवून संगोपन करून पावसाळा टिपे पर्यंत काळजी घेत असतात. सारीकडं जीव सृष्टी चक्रात लगबघ सुरु असते. चिंच,बोरी, डांगर टरबूज काकडी गिलकी विविध हिवाळ्यात सुरवात होऊन येणारी फळं उन्हाळ्यात कामी पडण्या साठी असतात.तोच आनंद व्यक्त करण्यासाठीचा सण असंच मी म्हणेल. आता कामं सपंलीत नवीन कामाला सुरवात होण्या अगोदर उत्सव साजरा करूयात.वनराई ला नवा बहर आलाय. पळस फुलं उमलली तत सम ईतर रंग देणारी वृक्ष यांची फुलं रंगी बेरंगी फुलं फळं त्यांचा सुगन्ध. रंग गन्ध उधळण्या चा सण म्हणजे होळी पौर्णिमा आणि मुहूर्तमेढ गुढी पाडव्याची . पळस सारखी वृक्ष सांगतात कुठं पण जा पळसाला पानं तीनच असतात.यावरून बोध घेत जावे आणि दुःख सारं विसरून नवं निर्मिती सुरवात सृष्टी सारखी करूयात. असाच आनंदी सण म्हणजे होळी. सृष्टी ने जो पालापाचोळा अंगावरून उतरवून टाकलाय तो काही प्रमाणात जाळुन टाकून उरलेली राख आणि उरलेला पालापाचोळा हा नवं सृष्टी नवं पावसाळ्यात उगवणारी नवं बीज साठी तरतूत करूयात असंच यातून संदेश मला वाटतो. त्यांच प्रमाणे मानवाने पण होळी पेटवून मुलं मुली यांची पसंती करून जोडया जमवून नवं दांपत्य सुरवात करण्यासाठी सोहळा यात्रा बाजार भरवला जातो असंच माझं प्रदिपचे मत. नवीन या सणात आदिवासी नव्हे पूर्वी सारी मानवजात हि पण आदिवासी वनवासीच होती.नर मादी नव्हे स्त्री पुरुष आवडीचे जोडीदार निवडून आनंद व्यक्त करतं नाचत गात पुढे लग्न सोहळा भरवत. तीच प्रथा होळी पर्वात सांगते. उन्हाळ्यात सारी कामं उरकवून घेऊ पावसाळ्यात फुरसत मिळणार नाही. म्हणून आनंदी आनंद साजरा करतं उत्सव मनवला जातो. वृक्ष जसं कात टाकून नवं सुरवात करतात अगदी तसंच मानवाने बोध घेऊन जुनं सोडतं नवं अंगीकारत रंग उधळत सण साजरा करतात. नवं निर्मिती ईतर वृक्ष पशु पक्षी प्राणी सारखीच मानवाने पण सुरवात करण्याचा काळ त्याची आरोळी ठोकत. नाचत बागडत खेळत उत्सव साजरा करतात. लोकं पूर्वापार करतं असली पाहिजेत नव्हे पूर्वापार करताय. होळी पासून सुरु होणारा आनंद उत्सव आता संम्पवून आपली आपली जोडीदार निवडून. पावसाळा येण्या अगोदर ची कामं प्रारंभ करण्याचा मुख्य सण हा गुढी पाडवा.या सणाला शेती मशागत करण्या ची मुहूर्त मेड करण्याचा दिवस. गुढी उभारून नवं पर्व सुरवात करण्यासाठी नवीन बीज पेरण्याची तयारी सारी सृष्टी करतं असते. त्याचा आरंभ म्हणजे गुढी पाडवा.या दिवशी सारी सृष्टी मधील सारी पशु पक्षी प्राणी आप आपली कामं आटोपून नवीन पुन्हा बीज पेरणी ला सुरवात करण्यासाठी मशागत सुरवात करूयात म्हणून हा सण साजरा करतात. आपण म्हणाल जीव सृष्टी सुरवात करते असं का म्हणताय. तर माझं ठाम मत आहे. पृथ्वी वरील सारी जीव त्यांची. राहणीमान राहणी वागण्या पद्धत माणसा प्रमाणे बऱ्याच अशी आहे. मला तशी दिसते. नव्हे सर्व प्राणी मात्राची आणि चल अचल सृष्टी ची सारखीच पद्धत आहे. पण जगण्याची राहण्याची रीत वेगवेगळी आहे. सृष्टी चक्र एकसारखं आहे. म्हणून सृष्टी चक्रातील  प्राणी मात्रा यातील राहण्या पद्धत वेगळी असली तरी त्यातील बरीच नव्हे खूपच पद्धत सारखीच आहे मला तशीच दिसते. सारे आपल्या आपल्या परीने जगत असतात. पण ऋतुमान,वर्ष चक्र, सारखंच असतं. पृथ्वी भ्रमण करतं असते. वातावरण सारखंच साऱ्या जीवांच्या साठी. म्हणून चल अचल जीव पण सारख्याच पद्धतीने जगत असतात असंच प्रदिपच मत. वृक्ष आपली पालवी सोडुन नवं पालवी आणतात. नवं बहर येतो त्यांना ह्या वेळेत. नवं बीज निर्मिती सुरवात त्यांच्या कडून होते. पावसाळा येई पर्यंत आपलं आपलं प्रजनन करून. आलेली फुलं फळ बीज साठा करून नवीन वृक्ष रुजण्या साठी पोषक वातावरण. पावसाळ्यात असतं. त्या साठी आता आलेला बहर त्यातून होणारी फळांची उत्पादन उत्पती सुरवात या दिवसा पासून होतं असली पाहिजे. मोहर फुलांचा त्यातून फळ निर्मिती कडे वाटचाल सुरवात काळ तो हाच. उन्हाळ्यात बीज वाळवून त्यावर प्रक्रिया करून पूर्वी सृष्टी आपल्या आपल्या परीने करतं असे. सारे पशु,पक्षी, प्राणी, वृक्ष,सारी वनराई आपलं आपली पुन्हा निर्मिती प्रजनन  सदैव करतं असते. त्यांनां मिळालेलं आयुष्यमान नुसार ते ते आपल्या जीवन जगण्याचा प्रयत्न करतं असतात. आपण माणसं आहोत. माणसं सुद्धा पूर्वी पावसाळ्यात आपलं बीज शेतात आणि मादीच्या पोटात पावसाळ्यात टाकत असे. मादी या सणात निवडून बीज प्रक्रिया पावसाळ्यात करतं असे असंच माझं मत. पूर्वी केलेलं निर्माण या दिवसात संगोपन जोपासना वाढ काळजी घेऊन.ह्या काळात पावसाळ्यात बीज पेरलेलं सृष्टी त्या त्या पशु, पक्षी, प्राणी, फुलं, फळं, चल, आणि अचल जीव हि तत समई उगवलेलं आपली आपली उत्पादन उत्पत्ती वाढ झालेली असते. या दिवसा पर्यंत.अगदी माणसाची मादी सुद्धा जुन ची पेरणीचं फळं आता सृष्टी मध्ये घेऊन आलेली असते. या प्रमाणे सारी सारी सृष्टी आपलं आपलं कार्यकाळ नुसार किंवा मिळालेल्या आयुष्यमान नुसार सारं करतं असते. भले हि काही जीव एक दिवसाचं का आयुष्य घेऊन येवोत किंवा शंभर वर्ष्याचं. पद्धत सारखीच. सारी जीव एकसारखं जगत असतं. असतात. मी का म्हणतोय त्यांच उदा. सांगतो मदमाशी, बीळ करणारी मुंगी, या प्रमाणे ईतर प्राणी पशु पक्षी यांचं जीवन पद्धत सारखीच. त्यांच प्रमाणे मानवाची सुद्धा होती. पूर्वी मानवाची राणी मादी हि राज्य करतं असे. आणि तिच्या इच्छे नुसार सारं चालतं असे. जसं मधमाशी जीवन पद्धत आहे तशीच पद्धत मानवाची सुद्धा असली पाहिजे नव्हे होतीच असं माझं ठाम मत आहे. नंन्तर मानव नर याने ती पद्धत मोडीत काढून आज आपण पाहतो तिथपर्यंत येऊन पोहचलो. पण ईतर प्राण्यांनी ती पद्धत सोडली नहीं आज आपण बघितलं तर सोडली सारं तंत्र बिघडवून फक्त आणि फक्त मानवाने टाकलंय असो बाकी विषय यात सांगतं नहीं. गुढी पाडवा हा मानवाने आणि सृष्टी ने नवं निर्मिती साठी मशागत, , बीज प्रक्रिया सुरवात साठवण, संगोपन.वाळवण करण्या सुरवात पर्व कडु गोड काळ.तप्त उन्हात बीज संगोपन प्रक्रिया मशागत सुरवात म्हणून कडु. पुढे यातून उत्पादन येणार म्हणून गोड पर्व सुरवात. तसंच आयुर्वेद मध्ये कडु गोड औषधं सुद्धा यातून बनतात. म्हणून जीवनक्रम भाग. त्याचं पुजन करण्या चा दिवस. नवं वर्ष सुरवात म्हणजेच गुढी पाडवा. प्रदीपच्या मताशी सहमत असावं असं  वाटतं. आज पाडव्याच्या लेख वाचन करणाऱ्या सर्वांना आणि साऱ्या मानव जातीला सृष्टीला नवं पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

 थोडक्यात पण माझ्या आकलन शक्ति नुसार सुचलेलं   वर्णन.©️®️

प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तालुका चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे