भाद्रपद ✍️
भाद्रपद
भाद्रपद श्रावण नंन्तर येणारा मराठी महिना . श्रावण महिना हा सृष्टी निर्माण करणाऱ्या पूर्वज यांचा महिना असं म्हटलं तर वावगं ठरू नये. श्रुष्टी निर्मिती करणारे देव यांच्या पूजनाचा महिना. लागता भाद्रपद सुरवात गणेशाय नमः करतं गणपती श्री गणेशाचं यांचं आगमन या महिन्यात होतं. याच महिन्यात सृष्टी निर्मिती करणारे देवी देव महादेव यांची अर्धांगिनी माता पार्वती यांनी आपला पहिलं बाळ गणेश रूपाने जन्मला घातलं. गणपती जन्म कथा आजपर्यंत आपण अनेक वाचल्या लिहल्या पहिल्या आयकल्या असतील पण माझ्या मनातील गणपती जन्म कथा मनात आहे ती कागदावर यायची बाकी आहे. मी जी कथा लिहणार आहे. त्यातून कदाचित सृष्टी निर्माण कार्याचं सूत्र कदाचित संशोधक यांना मिळून जाईल माझ्या लिहियचं बाकी असलेल्या पुस्तकातून असो. चला तर आराध्य दैवत "गणपती" यांच्या आगमन सोहळ्या नंन्तर. आपणास ज्यांनी सृष्टी दाखवली त्यांची आठवण काढण्यासाठी श्राद्ध पक्ष येतो. आपल्या पूर्वज्यांची आठवण करतं आपला हा महिना संपतो असं वाटतं. या महिन्यात आपण जसं जेष्ठ महिन्यात म्हणजे "जुन महिन्यात " बीज पेरणी हंगाम सुरवात करतो तशी सुरवात. आपल्या आजूबाजूला असणारी प्राणी आता ह्या महिन्यात करतात असं वाटतं नव्हे तेच सत्य आहे. जुन महिन्यात पहिला वळीवं पाऊस पडला की सृष्टी मधील सारी जीव सृष्टी बीज आपलं निर्मिती कार्य सुरु करतं असतं. तप्त झालेली धरणी चैत्र पालवी पासून तग धरून असलेली सारी सृष्टीतील सारी किट, कीटक, किटाणू पासून ते मोठी पशु, पक्षी मानव प्राणी ते चल जीव ते अचल बीज सारी सजीव सृष्टी निर्मितीला सुरवात करतात. असा जुन महिन्या नंन्तर ऑगस्ट च्या शेवटी सप्टेंबर चा पंदरवाडा हा काळ भाद्रपद. श्रावण महिन्यात तुरळक असा सदैव नव्हे बऱ्याचं दिवस ढगाळ वातावरण असलेला श्रावण महिना. क्षणात ऊन पावसाचा खेळ असाच श्रावण नंन्तर आलेला भाद्रपद. या महिन्यात कडक ऊन पडतं असतं. पावसाळ्यात आलेली ओल अतिजलद कोरडी करतं असलेलं ऊन. वातावरणात पाण्याची आद्रता असते आणि कडक तप्त उन्हात अंगाची लाही लाही होतं असते. यात उत्सव सुरु असतात.शेतकरी शेती मध्ये आपल्या कामात मग्न असतो. गणपती आगमन झालेलं असतं. देवाच्या आगमन नंन्तर आपल्याला पृथ्वी सृष्टी दाखवणारे आपले पूर्वज यांचा पितृपक्ष पंदरवाडा याच भाद्रपद महिन्यात येतो. आराध्य देव नंन्तर आपले आराध्य देव यांची आठवण काढण्याचा सोहळा म्हणजे श्राद्ध. श्राद्ध करावं श्रद्धेनं असं मी मागील वर्षी या महिन्यातच लेख लिहला म्हणून त्यावर बोलतं नाही. खान्देश मध्ये भाद्रपद महिन्याच्या सुरवातीला "भालदेव " पुजन होतं असतं. भालदेव आपणास फक्त आणि फक्त जगात खान्देश मध्ये होतं असलेला सण. या व अश्या सणा साठी प्रसिद्ध असलेला महिना तो हा महिना. या व्यतिरिक्त या महिन्यात कुत्रं, मांजर, या सारख्या प्राण्यांच्या बीज पेरण्याचा हा महिना असंच मला वाटतं. सृष्टी निर्मित्यांनी प्रत्येकाला कालावधी दिला होता आहे. मानव सोडुन आजपर्यंत सुष्म किटाणू ते पशु, पक्षी, प्राणी, आपला आपला प्रजनंन काळ येतो तेव्हाच प्रजननं बीज पेरण्यास सुरवात करतं असतात असंच आहे. तसं पाहिलं तर पावसाळी बीज निर्मिती प्रक्रियेतील हा शेवटचा महिना असावा. नंन्तर पुढील महिन्या पासून हिवाळी बीज निर्मिती प्रक्रिये कडे येथून वाटचाल सुरु होतं असावी असो. ह्या महिन्याच्या शेवटी शेती कामं उरकलेली असतात. आणि आश्विन महिन्यात दिवाळी चाहूल लागलेली असते. देवपूजा, पूर्वजपूजन नंन्तर आनंद उत्सव मानवण्या साठी दिवाळी आनंद या महिन्या शेवटी चाहूल देऊन जातो. असा हा भाद्रपद थोडक्यात माझ्या प्रदिपच्या आकलन शक्ति नुसार वर्णन केलं. ©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment