आईची माया
आईची माया
आई तुझी शक्ति, अगाध वाटली
उठे तु गं केव्हा, नाहीच दिसली
झोपली सांग गं, नाही आठवली
रात्रनं दिवस, कष्टात भासली
संसार करता, तुचं गं झिजली
दळणं सूपात, धान्य निवडली
माया ममतेनं, पोरं वाढवली
हसणं गाण्यात, दळता दिसली
जात्यावर ओव्या, तुचं हो म्हटली
संस्कार संस्कृती, अंगणी रांगोळी
देव्हार्यात देव, पूजता दिसली
तुळशी सजली, मा देवी भेटली.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment