रिकामं मन.✍️

        माणुस कामा व्यतिरिक्त रिकामा झाला  काही कारणाने बेचैन असला तर त्याच्या मनात असं म्हटलं जातं शैतान घर करतो.  हि संकल्पना जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर  यांनी मांडली.  सांगितलं लिहले म्हणुन जगप्रसिद्ध झालं.   काय असतं एखादया प्रसिद्ध  माणसाने सांगितलं की सारं आपण मानतो आणि मानलंही पाहिजे. त्यांच मतं तसं पाहिलं तर योग्यच आहे. त्यांनी  त्यातून हाच संदेश दिला.  रिकामं मन ठेवु नका कामात गुंतवुन ठेवा असंच. हिच भूमिका मांडलीय पण अशी विरुद्ध बाजूची भूमिका मांडून त्यांनी संदेश दिला.   शैतानाचं नाव कश्याला घ्यायचं चांगल्या कार्यात चांगले विचार रूजवतांना असं मला वाटतं .  मी म्हणतो तसा संदेश सकारात्मक. वाईट मधुन चांगलं सांगण्या पेक्षा चांगलंच सांगून छान संदेश जातोचना  .   माझ्या मताने बघितलं तर" रिकामं मन हे देवाचं घर असते नवनिर्मिती खाण असते" असं आहे. हि त्यांच्या मता  विरोधी मतं दुसरी बाजु. त्यांनी सांगितलं तेही खरं पण मी सांगतो तेही खरंचं आहे. जेव्हा माणुस उदास होतो तेव्हा असं म्हटलं जातं वाईट विचार जन्माला येतात. पण तसं नाही त्याच वेळी देवाचं नाव घेतलं तर मानसिकता बदलेल बदलते अगदी आत्महत्या करणाऱ्याची सुद्धा कारण सकारात्मक विचार करणारा तसा विचारच मनात आणत नाही.  पण त्याच्या मनात हे  रुजवलं पाहिजे.  आपली मानसिकता सकारात्मक असली तर त्यात अप्रतिम चांगले विचार जन्मतात. मी पाहिलं आहे अनेक संशोधक हे जेव्हा ज्या कल्पनेने संशोधन करत असतात. ती अथक प्रयत्नाने सफल होतं नाही तेव्हा ते निराश किंवा हताश होऊन थांबतात तेव्हा शांत मनाने विचार करतात तेव्हा नवीन शोध किंवा मनातील कल्पना पुर्ण होते. असं अनेक संशोधक डॉक्टर, वकील साहित्यिक,   मॅकेनिक ई.  सारे कामकर्ते नवनिर्मितीकार यांच्या बाबतीत दिसतेय. 
नवंनिर्मिती हि रिकाम्या मनातूनच येते मी पाहिलं आहे. जेव्हा माणुस आज उपलब्ध असलेले ज्ञान या व्यतिरिक्त काही नवीन संकल्पना मांडतो तेव्हा त्यास लोकं वेड्यात काढतात. जेव्हा लहान मुलाने पक्षी उडतांना पाहिले तेव्हा त्यास वेड्यात काढले नंन्तर त्यानेच विमान निर्माण केलं. जेव्हा झाडाखाली शांत बसलेल्या न्यूटन यास फळ खाली पडतांना दिसले.  तेव्हा गुत्वाकर्षण शोध लागला याचा अर्थ शांत निवांत रिकामं मनातुन कल्पकतेतून नवनिर्माण होते असंच. 
   मन बेचैन असेल तेव्हा देवाचं नामस्मरण करून. आता काय करायचं या विवनचनेत असतांना. नवीन काहीतरी करावं लागेल हा विचार मनात आणला.  करण्यास सुरवात केला.  तर मनात मानसिक सकारात्मक  ऊर्जा निर्माण होईल पुढील वाटचालीस  प्रोसाहन मिळेल. आज पाहतोय लोकं घरीच आहेत जी कामकरी कष्टकरी आहेत ते या अवस्थेत बेचैन आहेत. काय करावं कसं जगाव पुढील भविष्य काय. त्यांनी आजच उदया घरा बाहेर पडून काय नवीन करायच हा विचार केला आणि  कसं पुढे निघायचं. आलेले  कोरोना  संकट सोबत कसा मुकाबला करायचा. याची रूपरेषा तयार केली तर नखींच मार्ग सापडेल आणि उन्नती होईल.  घरात बसुन काहीतरी केलं शांत मनाने नीट विचार केला  तर नवीन कल्पना संकल्पना सुचेल अभ्यास वेतिरिक्त  लहान  मुलं गाणं म्हणणं,  लिहणं,  चित्रं काढणं, जुन्या वस्तू पासुन स्वतः खेळण्या साठी खेळणी बनवत आहेत. त्यांना सुचतंय मोठ्यांना पण सुचतंय काही जण करताय काहीतरी नवीन. कोणी लिहतंय बाकी वाचताय. नवं नवीन शोध, लस उपलब्ध करण्यात काही प्रयत्न करताय.  बाकी देव नामस्मरण करताय. खुप चांगलं दिसतंय माझ्या मताने रिकामी झालीत लोकं म्हणून असं वाटतं. दुसरी बाजु जी  शेक्सपियर सांगतात तशीच दिसते. एक सर्वे नुसार निरोध तुटवडा भासतोय.हि  वाईट बाजु  मोठी घरं अफाट संम्पत्ती लोकं मरत आहेत. आणि हे आनंद उपभोगण्यात गुतलीय असं. हेही तितकंच खरं पण अशी जगात फक्त बोटावर मोजण्या इतकी लोकं आहेत. 80% लोकं चांगल्या विचाराची भविष्यात काय करावं या विवनचनेत आहेत. अंधाऱ्या रात्री नंन्तर उषकाळ येणार आहे निर्विवाद सत्य मग आपण रात्री चा विचार करत बसण्या पेक्षा उगवणारा काळ चांगला येणार हेच गृहीत धरून रात्री फक्त शांत झोप घेतली सकारात्मक ऊर्जा देव नामस्मरण केलं तर उदया आपण काहीतरी साध्य करू शकतो. मला वाटतं सर्वानी माझी म्हण सर्वी कडे रुजवली पाहिजे. वर दिलेली  चांगलं रुजवलं गेलं पाहिजे. बघा आज  जी लोकं बंद असतांना अहोरात्र झटत आहेत त्यांच् महान कार्य आहे. तेच देव कार्य त्यांच मन लोकं कशी वाचतील यात आहे. सतत मनात सकारात्मक विचार करत आहेत. यातुन चांगलंचं  होईल असा विचार करताय ...या  दुनियेत सद्विचार आचार अजुन जिवंत आहेत असंच... काहीजण म्हणतील काम नं करता देवाचं घर बनवु तसं कधीच होत नाही. नुसतंच देवदेव करून देवाचं घर बनवुन पण चालत नाही. देवाचं घर माझ्या मताने कार्य करत असतांना असं कार्य काम असावं छान उत्कृष्ट  जे लोकं उपयोगी समाजाला, देशाला, घराला  उपयुक्त असं.   कार्य असं  हवं जे देवकार्य सारखं वाटलं पाहिजे.सामान्य जीवनात असं जगलं पाहिजे लोकांनी सदोदित नाव काढलं पाहिजे चांगला देव  माणुस तेंच देवकार्य. वैचारिक किंवा शारीरिक कार्य करत असतांना मिळालेली उसंत... आज आपल्याला जीवन जगतांना मिळालेली विश्रांती नवनिर्माण साठी वापरु  देवाचं घर  बनवु. 
लिहलेल्या मताशी सहमत असावं असं नाही. पण बघा कामं करतांना जगतांना   सत्य, सद्विचार,  देव नामस्मरण,  दान, पुण्य अंगीकारून... 



प्रदिप पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव  ©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे