आई

लेखक :-प्रदीप मनोहर पाटील... 

    आई म्हटले कि आपल्या डोळ्या समोर उभी  राहते मायेचा सागर वात्सल्य करुणा मूर्ती  आज मी आपल्या समोर आई या विषयी लिहणार बोलणार आहे. तसं पाहील तर आई वर सर्वांचे खुप बोलुन झाले आता पर्यंत जगात खुप काही लिहिले बोलले गेलंय सर्व सांगुन झालंय. मला लिहण्या साठी काहिच उरले नाही असं वाटते  पण विषय निघाला म्हणुन लिहतोय खांदेश कवियत्री स्वर्गीय  बहिणाबाई   या खुप वर्षा पूर्वी म्हटल्या, " माझी माय सरस्वती " आपण आज जे आहोत ते सार आई ची देण आहोत आपल्या जवळ असलेली विद्या,  संस्कार हे आई चेच देण आहे... विश्वरूप आई या विश्वाची जननी माता म्हणजे आई. विश्व निर्मिती होतांना आई चं योगदान खुप मोठं आहे पित्या बरोबर सम्पूर्ण पणे एकरूप होऊन माता पिता यांनी या सुंदर विश्वाची निर्मिती केली. मातापिता  तसं पाहिलं तर एकच आहे पण अंग भिन्न असल्या मुळे रूप वेगवेगळे दिसते एक शिवाय दुसऱ्याच अस्तित्व नाही अगदी तसंच  आहे आणी दिसते  म्हणजे एक नाणे त्याच्या दोन बाजु आहेत. एक दुसऱ्या विना अधुरं दोघे देव रूप एकाच अस्तित्व दुसऱ्या शिवाय पुर्ण होत नाही असंच... असो आज आपण  फक्त त्या नाण्याची एक बाजु  वर बोलु दोघांची  महंती अघाद  आहे. म्हणुन लिहायला अंनत ग्रन्थ अपूर्ण पडतील पडत राहतील तरी आज फक्त आई विषय निवडला एकच अंगाचा विचार करू..... पिता हा जसं  विश्वात शेतकरी जसं साऱ्यांना पोसतो पोट भरण्या साठी अन्न पुरवठा करतो दुनिया त्यावर सुरु आहे भुक भागवतो. सर्वांना शेतात पिकवून कच्चे मट्रियल पुरवठा करतो आणी त्या वर कच्या माला चं पक्क मट्रियल तयार करून सर्व जीवन जगत असतात आणी आहेत. जगात शेतकरी हा जगाचा कणा आहे  पण उपेक्षित आहे. फक्त  म्हटले जातं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे  .. अगदी तसंच आई या संसारा चा कणा आहे. पण सर्व लोक तिची कीर्ती महंती नुसतं सांगता पण ती तरी शेतकऱ्या सारखी उपेक्षित सदैवं आहे... सोशिक आहे. म्हणुन सोसण्यास भाग पाडता जसं नाण्याची एक बाजु वरून नाण्याची किंमत ठरत असते हे नाणे किती किमती चं आहे.. पण मागील बाजु ज्याला आपण छापा म्हणतो त्या शिवाय त्या नाण्याला काहीच किंमत नाही पण त्या छाप्याच कोणच नाव काढत नाही पुढल्या आकड्याला किंमत असते आणी आहे..पण छाप्याच काय तोच तर किंमत ठरवतो   अगदी तसं आई हि उपेक्षित असली मागे असली तरी आई शिवाय आपली किंमत नाही असंच.. असं सांगितलं जात स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी... असं का म्हटले गेले तर देवाने निमिर्ती करताना देव म्हणजे विश्वाचं मूळ सोबत देवी घेतली आणी निर्मिती केली तर त्याला आईच नाही म्हणुन म्हटले गेले असेल कदाचित असो सुष्म रूपातुन आई हि सार विश्व चं   निर्मिती करते... मुल गर्भात वाढवताना आपलं रक्त आटवून रक्तातुन  पोटात वाढणाऱ्या बाळास अन्न भरवते. लहान पणी मुला साठी रक्तच रूपांतर मायेन दुधात करून मुलास दूध पाजून वाढवते जगात अशी कोण आहे जो आपल्या अस्तित्वातून दुसरं अस्तित्व निर्मिती करू शकेल असं कोणीच नाही फक्त नी फक्त  आईच आहे आई. आई हे असं करणार अजब रसायन ..सर्व  जीवास  आनंद सोहळा दिला ती आई.

 "गुण किती गाऊ  आई. तुझं वीण जग नाही. लेकरु  तुझ  वर्णन करीत थकून जाई. सार आयुष्य सांगण्यात  संम्पुन जाई. म्हणुन येथेच थांबुन घेई"..... 





प्रदिप मनोहर पाटील 
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव  
  ©®

Comments

  1. आई संसाराचा कणा. सुंदर...
    तसेच एका नाण्याची दुसरी बाजू.. त्यावरून नाण्याची किंमत ठरते... छान शब्दात मातृमहिमा प्रदीप भाऊ... लिहीते आहात... लिहिते राहा.. शुभास्ते पंथान: !
    विलास पाटील सर ,चोपडा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद सर... असंच आपले सहकार्य प्रेरणा मिळो मिळतं राहो...

      Delete
  2. 'आई ' सर्मपक शब्दात वर्णन केली आहे
    Very nice

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद आभार

      Delete
  3. मनःपूर्वक धन्यवाद...

    ReplyDelete
  4. आई ही आई असते...शब्दच नाहीत सर इतक छान लिहिलय तुम्ही...लिहित राहा...

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद आभार

      Delete
  5. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद आभारी आहे आपला

      Delete
  6. छानच लिहतोस तू

    ReplyDelete
  7. आईवडील लेख. अप्रतिम झाला आहे हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. हेच खरे.

    ReplyDelete
  8. आई हा विषय हृदयाला भिडणारा आई म्हणजे निरंतर वाहणारा मायेचा झरा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

चला जाऊया खेड्याकडे